IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये होणार 456 अप्रेंटिस पदांची भरती!! जाणून घ्या पदभरती प्रक्रिया ?

IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) या सरकारी तेल कंपनीमध्ये अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांची मेगा भरती होणार आहे.नुकतेच IOCL रिक्रुटमेंट 2025 नुसार इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पद भरतीसाठी घोषणा करण्यात आली असून यासाठी IOCL अधिकृत जाहिरात प्रकाशित केलेली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पंजाब, चंदीगड, दिल्ली ,हरियाणा, जम्मू आणि काश्मीर,हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश,उत्तराखंड,राजस्थान या राज्यांमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी 456 अप्रेंटिस पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड देशातील सर्वात मोठा पेट्रोलियम पदार्थांचा निर्माण आणि पुरवठा करणारा सरकारी उपक्रम आहे.IOCL ने या पदभरतीत अनेक राज्यांमध्ये ट्रेड,टेक्निशियन,आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र सुशिक्षित उमेदवार येत्या 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत IOCL च्या अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.अंतिम मुदतीनंतर प्राप्त ऑनलाईन अर्ज विचारात घेतले जाणार नाही,असे IOCL ने स्पष्ट केलेले आहे.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

उल्लेखनीय म्हणजे सध्या देशात IOCL आपल्या पद भरती मुळे गुगलवर ट्रेंड होताना दिसत आहे.गेल्या 24 तासांमध्ये गुगल ट्रेंडमध्ये नोकरी आणि शिक्षण कॅटेगिरी मध्ये IOCL हा तिसऱ्या क्रमांकावर ट्रेड होताना दिसला.

या सरकारी कॉर्पोरेशन मध्ये पद भरती सुरू होताच सुशिक्षित बेरोजगार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरसावले आहे.

तर चला जाणून घेऊया…..IOCL Apprentice Recruitment 2025.मध्ये पद भरतीची प्रक्रिया काय आहे,आणि यासाठी कसा अर्ज करावा लागेल.

IOCL Recruitment 2025 रिक्त पदांची ही आहे माहिती.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे वरील राज्यांमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल भूमिकांसाठी एकुण 456 Apprentice पदांची भरती करणार आहे.

उमेदवारांसाठी पात्रता आणि निकष

  • या पद्धतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस भूमिकेसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी संबंधित विषयात पूर्ण वेळ तीन वर्षाचा डिप्लोमा आवश्यक असेल
  • पदव्युत्तर अप्रेंटिस पदासाठी किमान 50 टक्के गुणांचा पूर्णवेळ पदवी (BBA/BA/B Com/Bsc/) असणे आवश्यक.

इच्छुक उमेदवारांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पद भरती मध्ये अर्जासाठी तपशीलवार पात्रता,आणि अटींसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना अवश्य पहावी.
https://iocl.com/latest-job-opening

उमेदवारांसाठी वयोमर्यादा.

  • IOCL मध्ये वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
  • 31 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • यात सरकारी नियमानुसार राखीव शरीरातील उमेदवारांसाठी वयात निर्धारित सूट लागू राहणार आहे.

अशी होईल उमेदवारांची निवड प्रक्रिया.

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये वरील पदांसाठी निर्धारित निवड प्रक्रिया होणार आहे. यानुसार पद भरतीत उमेदवारांची निवड करण्यासाठी, खालील प्रमाणे प्रक्रिया असेल.
  • या पदांवर निवड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

उमेदवारांची निवड ही पूर्णपणे त्यांच्या गुणवत्तेवर आधारित राहणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना बारा महिन्यांचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांना लवकर अर्ज करण्याचा आणि सर्व पात्रता निकष पूर्ण झाल्याची खात्री करण्याचा सल्ला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

इच्छुक उमेदवार IOCL मध्ये निघालेल्या पद भरतीसाठी अधिसूचना आणि जाहिरात खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकतात.
https://iocl.com/admin/img/Apprenticeships/Files/9cedf55da8134200833d0ef9c257df0e.pdf

यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी इच्छुक उमेदवार IOCLच्या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करून भेट देऊ शकतात.
https://iocl.com/latest-job-opening

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

three × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.