Indian Rupee Fall Continues : जगात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रिकार्ड स्वरूपात घसरला आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आल्यानंतर केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकारे आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक टेन्शन वाढताना दिसत आहे.
कारण 1 डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात निचांक पातळीवर भारतीय रुपया पोहोचला आहे.भारतीय रुपयात नुकतीच विक्रमी घसरण पहिल्यांदा पाहायला मिळतं आहे.आता याचा थेट असर देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
त्यामुळे देशात आर्थिक मंदी आणि महागाईचा दर वाढणार असल्याची शक्यता आर्थिक क्षेत्रातील जानकारांकडून व्यक्त होत आहेत. डॉलर आणि भारतीय रुपयांमध्ये आलेला हा अंतर भारतात जीवनावश्यक वस्तू,पेट्रोलियम पदार्थ,पेट्रोल,डिझेल इंधन,आणि शैक्षणिक क्षेत्रात महागाई मध्ये संभाव्य वाढ होण्याचा धोखा निर्माण झाला आहे.
रुपयाच्या या घसरणीमुळे देशाच्या सर्वसामान्य जनतेवर खूप मोठा आर्थिक परिणाम भविष्यात होऊ शकते.असाही आर्थिक जाणकारांचा अंदाज आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 85.84 पातळीवर घसरला.
शुक्रवारी भारतीय चलन जगात सर्वात जास्त किंमत असलेल्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत फार कमी झाला.भारताचा एक रुपया 85.84 पातळीवर घसरला.याचा अर्थ 1 अमेरिकन डॉलर साठी आता 84 रुपये 85 पैसे भारतीय चलन अदा करावा लागनार आहे.
यामुळे अमेरिकन डॉलर ची किंमत भारतात वाढली तर दुसरीकडे भारतीय चलनाची किंमत अमेरिका आणि ज्या देशांमध्ये डॉलरमध्ये आर्थिक व्यवहार होतात तेथे रेकॉर्ड स्वरूपात कमी झाली आहे.यामुळे अमेरिका आणि इतर विदेशी निर्यातदारांना भारतात आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार आणि व्यापार करताना जास्त आर्थिक लाभ होईल तर भारताला रुपयाच्या घसरणीमुळे अंतर्गत नुकसान होणार आहे.
मात्र अमेरिकन अप्रवासी भारतीयांकडून भारतात डॉलर माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार, देशातून विदेशात आयात धोरणामध्ये आणि औद्योगिक आणि वाणिज्यिक आर्थिक व्यवहारांत डॉलरच्या मोठ्या प्रमाणात भारतात आवक झाल्यास भारताला हा डॉलरचा देशावर होणारा आर्थिक भार कमी करू शकतो,यावर केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आता नवे आंतरराष्ट्रीय मुद्रा धोरण बनवायची ही गरज निर्माण होताना दिसत आहे.
महाग डाळी आणि खाद्यतेल आयातीमुळे स्थानिक दरात वाढ होण्याचे संकेत.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांमध्ये झालेले घसरण मुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त जीवनाशक वस्तू जसे विविध प्रकारच्या डाळी आणि खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते.
उल्लेखनीय म्हणजे भारत मोठ्या प्रमाणात पाम तेल, आणि इतर खाद्य तेल,विदेशातून मोठ्या प्रमाणात तुर डाळ आणि इतर खाद्यपदार्थांचा आयात होत असतो.आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंचे इम्पोर्ट एक्सपोर्ट होताना,आता रुपयाच्या घसरणीमुळे भारतातील अंतर्गत बाजारपेठेत या वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते.
विदेशात शिक्षण महागणार.
भारतातून मोठ्या प्रमाणात विदेशात आणि विशेष करून अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जातात.मात्र आता डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची घसरण झाल्याने विदेश शिक्षणासाठी अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे.
याचा थेट परिणाम भारतातून विदेशात जाणाऱ्या हजारो विद्यार्थी आणि विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे.तर दुसरीकडे भारतीय रुपयात घसरन झाल्याने विदेशातून भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी येथील बाजारपेठ स्वस्त होणार आहे.याचा थेट फायदा विदेशी पर्यटकांना मिळणार आहे.
तर भारतामध्ये विविध वस्तूंचे निर्यात करणाऱ्या अमेरिकन आणि इतर देशातील निर्यातदारांना सुद्धा जास्त नफा मिळेल.प्रमुख बाब म्हणजे अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयांमध्ये अंतर आल्याने भारतात वस्तूंचे विदेशातून आणि अमेरिकेतून आयात महाग होण्याची शक्यता आहे.
यामुळे सरकारला विदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त भारतीय रुपयांचे डॉलर मध्ये रूपांतरण करणेही क्रमप्राप्त झाले असल्याने, यामुळे सरकारचा खर्च वाढणार आहे.
आरबीआयच्या आर्थिक व्यवस्थापनसाठी पुढील पावलावर सर्वांची नजर.
भारतात रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI हा आर्थिक प्राधिकरण देशात रुपयांचा व्यवस्थापन करतो. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण पाहता आता आरबीआयला तात्काळ नवे आर्थिक धोरण बनवावे लागणार आहे.
कारण सध्या रुपयाची घसरण झाल्याने देशातील सर्वसामान्य जनता आणि सरकारवर याचा ताण वाढणार हे नक्की आहे.त्यामुळे केंद्र सरकार, केंद्रीय अर्थमंत्रालय आणि आरबीआय.मिळून देशात योग्य आर्थिक धोरणांसाठी कोणते नवीन पावले उचलतात याकडे भारतीयांची नजरा रोवले आहे.