Indian Post Recruitment 2025 : दीर्घकाळानंतर भारतीय पोस्ट विभागात हजारो पदांची बंपर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे.भारतीय पोस्ट डिपार्टमेंट रिक्रुटमेंट 2025 भरती प्रक्रियानुसार भारतीय डाक सेवेत 25 हजार 200 पदांवर उमेदवारांची निवड करून सरकारी नोकरीत नियुक्ती केली जाणार आहे. I
Indian Post Department. भारतीय डाक सेवेत आता हजारो पदांसाठी होणाऱ्या या नोकरभरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिट आधारावर होईल.त्यामुळे शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी भारतीय टपाल विभागाची ही भरती प्रक्रिया आनंदाची वार्ता आहे.
नुकतेच भारतीय टपाल विभागाकडून ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचनाही जाहीर करण्यात आलेली आहे.या अंतर्गत एकूण 25 हजार 200 पदांसाठी भरती होणार आहे.
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा भारतीय डाक विभागाकडून घेण्यात येणार नाही हे महत्त्वाचे आहे.तर डाक विभाग या भरतीमध्ये ईच्छुक अर्जदार उमेदवारांची निवड ही मेरिट Merit List आधारावर होईल हे या भरतीचे वैशिष्ट्य आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेळापत्रक जाहीर.
भारतीय डाक विभागाच्या या हजारो पदांच्या भरतीसाठी 3 मार्च 2025 पासून भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर indiapostgdsonline.gov.in वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी या वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावे,असा सल्ला टपाल विभागाकडून देण्यात आला आहे. कारण उशिरा करण्यात आलेले अर्ज टपाल विभागाकडून स्वीकारले जाणार नाहीत.अशा या अधिसूचनेत म्हटलेले आहेत.
उमेदवारांसाठी ही असेल शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा.
भारतीय टपाल विभागाकडून रिक्रुटमेंट 2025 नुसार 25 हजार 200 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी टपाल विभागाकडून इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
यानुसार या भरतीत सामील होणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे .अनुसूचित जाती जमाती (एससी/ एसटी) उमेदवारांना 5 पाच वर्षे,तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना 10 वर्षांची वयोमर्यादित सवलत दिली जाणार आहे.
भरती प्रक्रियेत अर्ज करताना इतके भरावे लागेल अर्ज शुल्क?
भारतीय डाक विभागाकडून सुरू झालेल्या या पदभरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.यानुसार सामान्य Open Category,ओबीसी OBC आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी अर्जासह 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
तर अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) महिला आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांसाठी या भरतीसाठी अर्ज करताना कोणताही अर्ज शुल्क लागू राहणार नाही.
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा
आकर्षक वेतनश्रेणी मिळणार.
या पदभरतीत सामील झालेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारांची भारतीय डाक विभागात शासकीय नोकरीत निवड झाल्यानंतर विविध पदांसाठी मूळ वेतन आणि इतर भत्ते दिलेले जाणार आहे.डाक विभागात नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 10 हजार रुपये मासिक वेतन मिळणार असून,याशिवाय इतर भत्तेही मिळतील.
भारतीय टपाल विभागाच्या या पद भरती संबंधात अधिकृत माहिती आणि या संबंधात अपडेट्स घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट आणि अधिसूचनेकडे लक्ष देऊन निर्धारित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी,असे आव्हान भारतीय डाक विभागाकडून करण्यात आलेले आहे.