Indian Old Note Sale : 56 लाखात विकल्या गेलेली ती 100 नोट कोणती ?

Indian Old Note Sale : 56 लाखात विकल्या गेलेली ती 100 नोट कोणती?

अबब!! फक्त 10 रुपयांच्या नोटेची 12 लाखात विक्री

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

जाणून घ्या लाखोत विकलेल्या दोन नोटांचा इतिहास आणि रहस्य?

जगातील प्राचीन आणि पुरातन शिक्के, नाणी आणि वस्तू संग्रह करण्याचा अनेक लोकांना खूप छंद आणि शौक असतो.जर याचा जास्त छंद आणि जवळ भरपूर पैसा असला तर असे छंदबाज लोक अँटिक वस्तू आणि शिक्के आणि नोट खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी ही मागेपुढे पाहत नाही, कारण त्यांच्यासाठी “शौक ही बडी चीज”असते. आणि असाच एक छंद पूर्ण करून आणि आपला पुरातन चलनी नोट संग्रह पूर्ण करण्यासाठी कमी किमतीच्या पण ऐतिहासिक महत्व असलेल्या 2 नोटा लाखो रुपये अदा करून खरेदी करण्याचा एक लिलाव नुकताच लंडनमध्ये झाला आहे.

‘हज नोट’ नावाने प्रसिद्ध  सिरीज नोट.

ओल्ड नोट सेलिंग Old Note Selling मध्ये लंडन येथे शंभर रुपयांची 1 भारतीय नोट भारतीय चलन किंमत 56 लाख 49 हजार 650 रुपयांमध्ये विकल्या गेली आहे.ह्या सिरिजच्या नोटा भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सन 1950 मध्ये भारतात छापून आखाती देशामध्ये चलनासाठी छापली आणली होती. या शंभर रुपयांच्या नोटेचा क्रमांक हा खरेदी करणाऱ्यासाठी विशेष असा HA 078400 आहे.

ही नोट प्रदर्शनीमध्ये आल्यानंतर सर्वांचा आकर्षणाचा विषय होती आणि याला लाखो रुपये खर्च करून एका शौकिनाने खरेदी केले आहे. ही शंभर रुपयांची 1950 वर्षाची नोट रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून त्यावेळी ‘हज नोट’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सिरीजचा एक भाग होती.तर या नोट सेलिंग आणि प्रदर्शनीमध्ये दुसरी अशी दहा रुपयांची भारतीय चलनाची नोट येथे 12 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली आहे.

या महिन्यात इंग्लंडमधील लंडन शहरात मोठा असा ओल्ड नोट सेल आयोजित करण्यात आला होता, यात जगभरातील विविध काळातील चलनी नोटांचा संग्रह प्रदर्शनी आणि विक्रीसाठी ठेवण्यात आला. यात अगदी प्राचीन काळातील चलनी नोटा सुद्धा सेलिंग प्रदर्शनीमध्ये सामील करण्यात आले होते.

पण सर्वांसाठी या सेलिंग मध्ये 19 व्या शतकाच्या मध्यात भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने विशेष करून सौदी अरब मध्ये हजयात्रेसाठी जाणाऱ्या भारतीय हजयात्रेकरूंसाठी विशेष भारतीय चलनी नोटा छापल्या होता. सौदी अरब मध्ये कमी भावाने सोन्याचे विक्री होत असल्याने तेथून सोने खरेदी करून भारतात आणण्यावर रोख लावण्यासाठी ह्या नोटा छापल्या होत्या.

HA लिहिलेले असल्याने नोटा सहज ओळखल्या जात होत्या.

भारत सरकारने हज यात्रेसाठी जाताना आणि परत दरम्यान भारतात येत असताना सौदी मधून बेकायदेशीर सोने खरेदी होऊ नये, आणि अश्या प्रकारावर मज्जाव घालण्यासाठी यावर्षी हज यात्रेसाठी विशेष नोटा छापण्याचा निर्णय घेतला होता. या नोटांवर ‘HA’, असे लिहिले होते त्यामुळे ह्या शंभरच्या नोटा ‘हाजी सिरीज नोट’ या नावाने नंतर प्रचलित झाल्या.

भारतात छापलेल्या या नोटा फक्त त्यावेळी सौदी अरब आणि इतर काही आखाती देशांमध्येच वैध करण्यात आल्या होत्या या नोटांचा रंगही इतर भारतीय चलणी नोटांपेक्षा काही वेगळा होता. या नोटा भारतात नव्हे तर सौदी अरब,बहरीन, कुवेत,कतर आणि ओमान या देशात हज यात्रेकरू त्या देशात चलनात आणत होते. त्यावेळी भारतासोबत झालेल्या करारानुसार हे आखाती देशही आपल्या देशात हे भारतीय नोटा चलनात स्वीकारत होते.

का झाल्या ह्या भारतीय नोटा दुर्मिळ?

भारतात भारतात 1950 मध्ये आरबीआय ने हा यात्रेकरूंसाठी जे HA सिरीजचे जे नोट छापले होते ते त्यावेळी आखाती देशात  चलनात  होते यानंतर या नोटा हळूहळू दुर्मिळ होत गेल्या.याचे मुख्य कारण म्हणजे या नोटा खूप सीमित मात्रेमध्ये छापण्यात आले होत्या. यानंतर कुवेत या देशानेही 1961 मध्ये स्वतःचे चलनी नोटांची चलन सुरू केले. यानंतर आणखी काही आखाती देशांनी असे चलन सुरू केले होते. विशेष म्हणजे यापूर्वी कुवेत या आखाती देशात फक्त भारतीय चलनी नोटा वापरात होत्या.

नंतर याचा असा परिणाम झाला की 1970 च्या दशकात भारताने हाजी नोटा छापणे आणि  यात्रेकरूंना त्या देणे बंद करण्यात आले. नंतर या नोटांचा खूप तुटवडा झाला आणि आता या हज सिरीजच्या नोटा दुर्मिळ आहे. त्यामुळे प्राचीन आणि दुर्मिळ सिक्के आणि दुर्मिळ नोटांचा Collection करणाऱ्यांसाठी या नोटा खूप मौल्यवान आहेत.

दुर्मिळ नोटांचे खरेदीदार अशा नोटांची मूल्यस्थिती आणि दुर्मिळता पाहून याची खरेदी करतात.त्यामुळे लंडन Note Selling मध्ये भारतीय चलनातील 1950 वर्षातील नोट आता तेथे एका व्यक्तीने 56 लाख 49 हजार 650 रुपयांमध्ये खरेदी केली आहे.

लंडनमधील याच नोट लिलावात भारतीय चलना मधील 10 रुपयांच्या 2 जुन्या नोटांनाही खूप मागणी होताना दिसली.यापैकी एक 10 दहा रुपयाची नोटची किंमत 6 लाख 90 हजार आणि दुसऱ्या 10 रुपयांच्या नोटची किंमत या लिलावात 5 लाख 80 हजार रुपये ठेवण्यात आली होती.या दोन्ही नोटा सामान्य चलनातील नसून त्या ऐतिहासिक कालखंडाची संबंधित आहे यातील एक नोट 12 लाख रुपये किमतीत विकल्या गेली आहे.

दोन्ही नोटांचे महत्त्व काय?

या नोट सेलिंग मध्ये ठेवण्यात आलेल्या या नोटा विविध ऐतिहासिक आणि रोचक अशा स्मरणामुळे शौकिनांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. यात जे दोन 10 रुपयांच्या नोटा लिलावात ठेवण्यात आल्या होत्या त्यांचे मोठे असे ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते.25 मे 1918 साली भारतात ब्रिटिश साम्राज्य होते. त्यावेळी पहिला महायुद्धाच्या काळात इंग्रजांनी आपल्या नोट छापखान्यातून यांची छपाई करून त्यांना चलनात आणले होते.

पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांनी भारतातून एस एस शिराळा या जहाजाला पहिल्या महायुद्धासाठी समुद्रातून रवाना केले होते. यात मोठ्या प्रमाणात युद्धासाठी रसद चलनी नोटा आणि खाद्य सामग्री लादण्यात आली होती मात्र 2 जुलै 1918 रोजी जर्मनी ने आपल्या बोटीद्वारे बॉम्ब टाकून या ब्रिटिश जहाजाला उडविले होते. या हल्ल्यात हा ध्यास समुद्रात बुडाला.त्यामुळे लंडन मधील नोट सेलिंग मध्ये हे जे ब्रिटिश नोटा आहेत,त्यांचा संबंधही याच ऐतिहासिक कालखंड आणि त्यावेळच्या नोटांच्या सिरीज सोबत जुळलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

10 − 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.