Income Tax Rule : रिझर्व बँकेकडून आता सर्वसामान्य नागरिकांच्या बँक सेविंग अकाउंट मध्ये पैसे जमा करण्याची आणि काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.Saving Bank Account Debit/Credit Limit.इन्कम टॅक्स चे नियम पाहता आरबीआय ने सेविंग अकाउंट मध्ये पैशांचे क्रेडिट आणि डेबिट मर्यादा बनविली आहे.
त्यामुळे आता सेविंग अकाउंट मध्ये निश्चित मर्यादेत पैसे जमा करणे आणि काढण्यापूर्वी याची माहिती असणे गरजेची असेल.या मर्यादांचे पालन न केल्यास असे सेविंग बँक अकाउंट धारक इन्कम टॅक्स नियमानुसार नोटीस आणि दंडात्मक कारवाईस पात्र ठरणार आहेत.
देशात सध्या डिजिटल बँकिंग सिस्टम सुरू आहे.आणि बँकिंग सेक्टर तसेच बँक ग्राहकांमध्ये नियमितपणे आर्थिक व्यवहार होतात.यात विविध प्रकारचे बँक खाते असतात.देशात अनेक लोक बँक अकाउंट मध्ये आपले पैसे सेविंग मध्ये ठेवण्यासाठी Saving Account ला प्राधान्य देतात.
यासाठी सेविंग बँक अकाउंट उघडले जातात.सोबतच सेविंग अकाउंट हे सर्वांसाठी सोयीची आणि सुरक्षित असते. आतापर्यंत Saving Account मध्ये किती पैसे काढावे किंवा जमा करावे याची निश्चित मर्यादा नव्हती.
मात्र आता आरबीआयकडून Incom Tax नियम पाहता यासाठी गाईडलाईन निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सेविंग अकाउंट मध्ये किती रक्कम जमा होईल आणि किती विड्रॉल होऊ शकेल.आणि याबाबत इन्कम टॅक्स चे नियम काय आहेत हे जाणून घेऊया….
भारतात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक बँक अकाउंट मध्ये सेविंग अकाउंट उघडतात यात,आपला पैसा बँकेत सेव करण्यासाठी अशा अकाउंटचा वापर होतो.मात्र सेविंग अकाउंट मध्ये किती रक्कम जमा केली जाऊ शकते हे माहिती असणे महत्त्वाचे आहे.
इन्कम टॅक्स नियमानुसार एका आर्थिक वर्षात सेविंग बँक अकाउंट मध्ये एकूण रोख रक्कम जमा करण्यासाठी किंवा पैसे विड्रॉल करण्याची मर्यादा आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे.या मर्यादेचे पालन करणे आता गरजेचे आहे.
त्यामुळे भविष्यात कोणत्याही दंडात्मक किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
- आरबीआय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या या नव्या नियमानुसार आता सेविंग बँक अकाउंट मध्ये व्यवहारांवर लक्ष देणे आवश्यक झालेले आहे.
- निश्चित मर्यादेत रक्कम डेबिट क्रेडिट न झाल्यास इन्कम टॅक्सची नोटीस.
- विविध राष्ट्रीय बँकेमध्ये असलेल्या सेविंग अकाउंट मध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम वार्षिक स्वरूपात जमा करता किंवा काढता आली,तर अशा सेविंग बँक अकाउंट धारकांना आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे नोटीस मिळणार आहे.
- जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या या कारवाई पासून वाचायचे असेल तर खालील नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
- आपल्या आर्थिक गरजा पुरविण्यासाठी दररोज बँकेतून पैशांचे व्यवहार होतात.त्यामुळे आता सेविंग अकाउंट मध्ये एका दिवसात रोख व्यवहाराची मर्यादा किती आहे हे इन्कम टॅक्स अॅक्ट डिपार्टमेंटच्या कलम 269 ST नुसार ठरविण्यात आली आहे.यानुसार कोणत्याही व्यक्तीला एका दिवसात आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करण्याची परवानगी नसेल.
सर्व सेविंग अकाउंट मध्ये एका आर्थिक वर्षात एकूण दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली तर संबंधित ग्राहकांची संबंधित सेविंग बँक खात्यामधील आर्थिक व्यवहारांची माहिती बँकेकडून इन्कम टॅक्स विभागाला देण्यात येईल.
अगदी ही रक्कम जर वेगवेगळ्या खात्यामध्ये जमा केली असली,तरीही याची माहिती आधुनिक प्रणालीमुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला कळेल.
आयकर विभागाच्या कलम 114 B नुसार बँक आणि इतर वित्तीय संस्थांना सेविंग अकाउंट मध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास, त्याची माहिती तात्काळ इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागते.
जर एका आर्थिक वर्षात 10 लाखापर्यंत पेक्षा जास्त रक्कम जमा होत असेल,तर आरबीआय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून ही रक्कम हाय व्हॅल्यू ट्रांजेक्शन या श्रेणीत गणली जाते..
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करून अशा रकमेचा उपयोग उत्पन्नाचे योग्यरीत्या निरीक्षण करण्यासाठी आणि टॅक्स चोरी रोखण्यासाठी Tax Evasion.करण्यात येते. यातून इन्कम टॅक्स विभागासमोर अशा बँक खात्यांमध्ये पैशांचे स्त्रोत काय आहे, या पैशांचा वापर कशासाठी केला जात आहे?हे स्पष्ट करणे आवश्यक ठरते.
याशिवाय जर एका दिवसात फक्त 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा होत असेल,तर यासाठी सेविंग बँक अकाउंट धारकाला त्याचा पेन नंबर PAN Numbers बँकेला द्यावा लागेल जर अकाउंट धारकाकडे पॅन नंबर नसेल तर पर्यायी स्वरूपात फॉर्म 60/61 भरावा लागेल.
कारण अशा परिस्थितीत जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट संबंधित सेविंग बँक अकाउंट धारकाला 10 लाख रुपयांचे ट्रांजेक्शन एका दिवसात झाल्यास हाय व्हॅल्यू ट्रांजेक्शन साठी नोटीस पाठवते.त्यासाठी उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक असते.
- अशा पुराव्यामध्ये बँक स्टेटमेंट.
- इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड.
- वारसा हक्काशी संबंधित कागदपत्रे
- अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स विभागासमोर सादर करावे लागते.
सेविंग बँक अकाउंट मध्ये वार्षिक 10 लाख किंवा गरज भासल्यास एका दिवसात 50 हजार किंवा जास्त रक्कम डेबिट/क्रेडिट झाली,तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोटीस मिळविणे टाळायचे असेल,तर आपल्या बँक व्यवहारांवर योग्य नियंत्रण आणि संबंधित आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवून कारवाई पासून वाचू शकता.यामुळे सेविंग बँक अकाउंट मध्ये पैसे डेबिट क्रेडिट करण्याच्या मर्यादांचे पालन करणे फायदेशीर ठरू शकते.