Asaduddin Owaisi Akola: मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केंद्रित केले जात आहे! – खासदार Imtiyaz Jaleel

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन*

खासदार इम्तियाज जलील यांची अकोल्यात पत्रकार परिषद!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Asaduddin Owaisi Akola: खासदार Imtiyaz Jaleel यांची अकोल्याच्या सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद माहिती देताना ते बोलत होते. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी ते अकोल्यात पोहोचले असून, AIMIM चे चीप असदुद्दीन ओवेसी यांचीही सभा अकोल्यात होणार आहे. यामुळे पक्षाच्या वतीने त्यांनी पत्रकारांसमोर आपले म्हणणे मांडले.

ज्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम विदर्भातील चार जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलीआहे. तसेच पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच सध्या देशामध्ये वेगळेच वातावरण चालू आहे. एकतर तुरुंगात जा किंवा भाजपमध्ये या! असे सुरू झाले आहे. त्यामुळे या गोष्टीचा एमआय एम ला काही फरक पडत नसला तरी एमआयएमला हलक्यात घेऊ नका, असेही ते म्हणाले.

सरकारी यंत्रणांचा वापर करून जनतेला घाबरवले जात आहे!. जाती-धर्माच्या नावावर दरारा निर्माण केला जात आहे!. त्यावर मात करण्यासाठी एमआयएम निवडणुकीत मुद्दा राहणार असून, तो संपवण्याचे प्राधान्यही एमआयएमचेच राहणार आहे.अशा प्रकारे देशातील महागाई आणि रोजगारावर कोणतीही चर्चा होत नसून, केवळ जनतेला थापा देण्याचे काम होत आहे. तर दुसरीकडे जनतेला वळवले जात आहे.

अशाप्रकारे देशातील बहुतांश मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला त्यांच्या धार्मिक भावनांसोबतच लक्ष्य केंद्रित केले जात आहे!, असे खासदार इम्तियाज जलील यांनी 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.