इज्जतगांव येथील गावालगद च्या विटभट्या हटवा – परमेश्वर पाटिल डोईफोडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.
*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*
नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगांव ता.नायगांव जि.नांदेड येथील गावालगत असलेल्या पांगरीकर आणि मियाॅंशेढ यांच्या विटभट्या हटवा अशी मागणी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटिल डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे. सदरील विटभट्या गावालगत असल्यामुळे त्यांच्या प्रदुषणाचा त्रास गावकऱ्यांना होत आहे, श्वसनाचे आजार वाढत आहेत.
विटभट्यांच्या प्रदुषनयुक्त धुवामुळे पिकाचे नुकसान होत आहे, विटभट्यासाठी कामगार वेगवेगळ्या भागातून येऊन तिथे राहतात त्यांच्यामूळे कारखानाच्या बाजूच्या शेतीमध्ये प्लाॅस्टिक कचरा, वातावरण दुषित होत आहे. सदरील विटभट्यानी गावात येणाऱ्या मुख्यः डांबर रस्त्यावर अतिक्रम केले असल्यामूळे अपघात होऊ शकतो याला जिम्मेदार कारखानदार असतिल, असे निवेदनात म्हणटले आहे.
ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंद्यांना पाठबळ देऊ नये. २४ तास हे कारखानादार विजेची चोरी करतात तरी महावितरण याकडे दुर्लक्ष करते ही गंभीर बाब आहे. प्रशासनान याकडे लक्ष देऊन सदरील विटभट्या गावापासून किमान १ कि.मी अंतरावर हलविण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषणास बसावे लागेल असे महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर व्यंकटराव पाटिल यांनी निवेदन देताना म्हणटले आहे.
निवेदनावर गावातिल मा.सरपंच संजिव दिंगबरराव पाटिल, ग्रा.पं.सदस्य चंपतराव पा. डोईफोडे ,ग्रा.पं.सदस्य गोविंदराव पा.डोईफोडे, ग्रा.पं.सदस्य बालाजी टोकलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव पा.डोईफोडे , दत्तराम माधवराव पोलीस पाटिल, शिवाजी पा. डोईफोडे सेवा.सह.सो.चेअरमन, नुकसानग्रस्त शेतकरी व्यंकटराव पा.डोईफोडे, संभाजी पा. डोईफोडे, बालाजी डोईफोडे, दिंगाबर डोईफोडे आदी लोकांच्या सह्या आहेत.