Duplicate Aadhaar Card असेल तर बसमध्ये मोफत प्रवास विसरा !

Duplicate Aadhaar Card असेल तर बसमध्ये मोफत प्रवास विसरा !

ओरिजनल कार्ड सोबत ठेवणे आवश्यक, झेरॉक्स, Duplicate Aadhaar Card नकोच.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आर्वी : प्रवाशांनाही विविध योजनेचा फायदा व्हावा यासाठी एसटी महामंडळ सदैव तत्पर असते नवनवीन सेवा सुविधा महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना शासनाने स्त्रियांना अर्धे तिकीट, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, वीरपत्नी ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, दिव्यांग आदींना प्रवास भाड्यात वेगवेगळा आहेत.

या सवलतीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मात्र आता या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर ओरीजिनल आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. या सवलतीचा फायदा घेत अनेकांनी वय वाढवून घेत डुप्लिकेट आधार कार्ड तयार केल्याचे उघड झाले. त्यामुळे आता ओरीजिनल आधार कार्ड सोबत ठेवावे लागते अन्यथा संबंधित प्रवाशांना प्रवास भाड्याच्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही. प्रवाशांना भाड्याची पूर्ण रक्कम वाहकाला द्यावी लागेल.

एसटीमध्ये कोणकोणत्या सवलती?

1) महिलांना अर्धे तिकीट.

महाराष्ट्र राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना एसटी प्रवासात अर्धी सूट दिल्याने ही योजना कमालीची लोकप्रिय झाली आहे. यावर्षी सुरु करण्यात आलेल्या महिलांना एसटी बसप्रवास भाड्यात ५० टक्के सूट देण्यात आल्याने महिलांमध्ये आनंदाची लाट सुरु झाली असून एसटीत महिलाराज सुरु झाल्याचे दिसत आहे. महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

2) ज्येष्ठांना अर्धे तिकीट.

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये ५० टक्के सूट आहे. महिला सोबतच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठांनाही प्रवासात अर्ध तिकीट सोय केली आहे. महामंडळाच्या निर्णयामुळे आता ज्येष्ठांनाही अर्धे तिकीटमध्ये प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे.

3) ७५ पेक्षा जास्त वयोगटाला मोफत प्रवास.

एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील वयोगटातील जेष्ठांना चक्क मोफत प्रवाशाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ओरीजनल आधार कार्ड हवे.

अनेक जण मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन काहींनी वय वाढवून डुप्लिकेट आधार कार्ड तयार केले आहे. एसटी बसमध्ये प्रवास करताना विविध सवलती मिळत असल्या तरी त्या सवलती घेण्यासाठी आता प्रवाशाकडे त्यांचे मूळ ओरीजिनल आधार कार्ड असणे आता आवश्यक झाले आहे. ओरीजनल आधार कार्ड दाखवले तर त्यांना प्रवासाची सवलत मिळणार आहे.

वाहतूक नियंत्रक काय म्हणतात.

खरोखरच जे गरीब गरजू आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळावा यासाठी ही योजना शासनाने सुरू केली. मात्र योजनेचा दुरुपयोग होऊ नये आणि पात्र नसलेले व्यक्तीकडून या योजनेचा गैरफायदा घेतल्या जाऊ नये यासाठी ओरीजनल आधार कार्ड असणे आवश्यक झाले आहे. अनेकांनी डुप्लिकेट आधार कार्ड तयार केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे वाहकांना ओरीजिनल आधार कार्ड बघण्याचे निर्देश दिले आहे.

– चंद्रकांत कुहाटे, सहायक वाहतूक नियंत्रक तथा बसस्थानक प्रमुख आर्वी आगार

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − 8 =