Human Trafficking: तीन वर्षाच्या मुलाची वडिलांनी केली अडीचं लाखात तेलंगणात विक्री!
यवतमाळ जिल्ह्यातील मानव तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश.
Human Trafficking: दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने अन्य तिघांना सोबत घेत स्वत:च्या मुलाची अडीच लाख रुपयात तेलंगणात विक्री केली. याची कुणकुण तीन वर्षीय बालकाच्या आईला लागताचं तिने आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना अटक केली. वडील श्रावण दादाराव देवकर(वय 32), चंद्रभान लकडाजी देवकर (वय 65, दोघेही रा. कोपरा), कैलास लक्ष्मण गायकवाड (वय 55, रा. गांधीनगर, आर्णी), बाल्या गोडंबे (रा. महागाव (कलगाव), अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
त्यांपैकी श्रावण व चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणात बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताचं पोलीस पथकाने जगटाल जिल्ह्यातील मोहनरावपेठ गाठले. बालकाला सुखरूप ताब्यात घेतले. बोलली गंगाराम राजू (वय 45, रा. मोहनराव) या महिलेने अरविंद रामय्या उसकेमवार (वय 45, रा. भाग्यनगर, आदिलाबाद) या एजंटच्या माध्यमातून खरेदी केले होते. त्यानांही ताब्यात घेतले आहे. आर्णी पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केला आहे.