Home Remedies For Dry Lips : उन्हाळ्याच्या दिवसात वातवरण गरम असते.वाढलेले तापमान आणि कडक उन्हामुळे विविध त्रास आणि शारीरिक समस्या निर्माण होतात.कडक उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते.यामुळे शरीराची त्वचा कोरडी पळणे आणि इतर खूप लक्षने दिसून येतात.
यात ओठ कोरडे पडल्याने अनेक लोकांना ओठांची त्वचा नम करण्यासाठी त्याच्यावर जीभ फिरविण्याची सवय,असते किंवा दाताने ओठेची सुकलेली त्वचा कुरतडण्याची सवय असते.
मात्र उन्हाळ्यात असे झाल्यास,ओठांची त्वचा कधीच चावू नका.हे घरगुती सरळ उपाय केल्यास ओठ सुकण्याची समस्या नाहीशी होण्यास मदत मिळते.
कोरडे पडलेले ओठांना आराम देण्यासाठी हे उपाय फायदेशीर.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमी झाल्यास किंवा शरीराचा तापमान वाढल्यास ओठ कोरडे पडणे,ही सर्वसामान्य समस्या आहे,त्यापासून आराम मिळविण्यासाठी आपण हे उपाय करू शकतात.
मार्च महिना सुरू झाला की, तापमान वाढ सुरू होते.त्यामुळे शरीराला पाण्याची जास्त गरज असल्याने,सारखे पाणी प्यावे असं वाटते.शरीरातून घाम निघत असल्याने शरीराने चेहरा सुकल्यासारखे वाटते,घशात कुरड पडणे,आणि ओठ सुकून जाणे,यासारखे लक्षण दिसते.
ओठ सुकून त्यांचे फुटणे,त्यातून त्वचेच्या पांढऱ्या रेषा बाहेर निघाल्याने कोणीही नकळत त्याच्यावर आपली जीभ फिरवते,सोबतच ओठांवर वर आलेली सुकलेली त्वचा आपल्या दातांनी नकळतच चावली जाते,मग तेथील त्वचा आणखी बाहेर निघून त्यातून रक्त निघण्याचे प्रकार सुद्धा होतात.मात्र अशा समस्येवर घरगुती पद्धतीने खूप सोपे उपाय आहे.यांचा वापर करून आपण आपले ओठ मऊ आणि नर्म ठेवू शकतो.
ओठांच्या निगा राखणाऱ्या उत्पादने घेताना सतर्कता बाळगणे जरुरी
हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ओठांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात अनेक क्रीम्स आणि इतर उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.अनेक कंपन्या ओठांसाठी केअर करण्यासाठी विकत असलेल्या आपल्या प्रॉडक्ट बाबत ते आयुर्वेदिक असल्याचा दावा करतात.पण याची काही खात्री नसते.त्यामुळे बाजारामध्ये मिळणाऱ्या ओठांच्या निगा राखणाऱ्या उत्पादने घेताना सतर्कता बाळगणे जरुरी आहे.
- कोरडे पडलेल्या ओठांना मऊ ठेवण्यासाठी बाजारात मिळत असलेले Lip Product विकत घेताना विचारपूर्वक त्याची खरेदी करा.फक्त स्वस्त मिळत आहे,म्हणून त्याची खरेदी न करता चांगल्या कंपनीचा Lip Balm वापरा.
- रात्री झोपताना आपल्या ओठांना गाईचे शुद्ध तूप लावा.उन्हाळ्यात कितीही ओठ सुकले,किंवा फुटले तरी अशा तुपाने ते ओलसर आणि मऊ राहतात.
- घरातील खोबरेल तेल आपल्या सुकलेल्या ओठांना लावल्याने ओठाच्या त्वचेला ओलावा मिळून कोरडापण नाहीसा होते.
- उन्हाळ्यात अतिशय तिखट पदार्थ खाण्याचे टाळा.यामुळे शरीरात पाण्याची कमी होऊन ओठांवरील त्वचा फुटुन काहीही तिखट पदार्थ खाल्ल्यास ओठ मोठ्या प्रमाणात झोम्बतात,यामुळे ओठ पुन्हा जास्त फुटतात.
- दिवसात कधीही आणि रात्री ओठावर गुलाब पाणी{Rose Water}ने भिजलेला कापूस फिरविल्याने ओठाची त्वचा मऊ होते.
Home Remedies For Dry Lips : ओठांसाठी हे उपाय खूप फायदेशीर.
- हायड्रेशन
तुमचे ओठ कोरडे पडू नयेत यासाठी भरपूर पाणी प्या.आपले ओठ चाटणे टाळा, यामुळे ते कोरडे आणि अधिक चिपचिपे होऊ शकतात.
- एक्सफोलिएशन
ओंठावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि त्यांचे स्वरूप सुधारण्यासाठी आपले ओठ हळूवारपणे एक्सफोलिएट करा.यासाठी आपण ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल आणि साखर यांचे घरगुती मिश्रण वापरू शकता.
- लिप बाम.
उन्हाच्या तडाख्यापासून आपल्या ओठांचे संरक्षण करण्यासाठी {SPF सह} लिप बाम वापरा.उन्हात बाहेर जाण्यापूर्वी किमान 20 मिनिटे लिप बाम लावा.लिप बाम कोरड्या हवा आणि वाऱ्यापासून ओठांचे संरक्षण करण्यास देखील मदत करू शकते.
- इतर टिप्स
- आपले ओठ उचलणे टाळा.
- हायड्रेटिंग पर्यायांसाठी मॅट लिप उत्पादने स्वॅप करा.
- लिप मास्क वापरा, जे तुमच्या ओठांचे आरोग्य आणि स्वरूप सुधारू शकतात.
- अत्यंत गरम आणि कोरड्या दिवसात भरपूर पाणी प्या.