Headlines Yavatmal

Headlines Yavatmal

Headlines Yavatmal

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सोयाबीनची गंजी पेटविली.

पुसद :अंतर्गत येणार्‍या चिलवाडी शिवारातील शेतामध्ये सोयाबीन काढून त्याची गंजी लावून ठेवली असता १७ ऑक्टोबर रोजी अज्ञात आरोपीने गंजीला आग लावली. या आगीत शेतकर्‍याचे ६५ हजार रूपयाचे नुकसान झाले. बापूराव भीसे यांच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला

जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू.

वडगांव  : दहेली ते सायखेडा रोडवर १४ ऑक्टोबर रोजी वाहनाची दुचाकीला धडक लागून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दत्ता मिनराम गाडेकर (२७) रा. येळाबारा असे मृतकाचे नाव आहे.अपघातातील मृतकाच्या जखमी बहिणीवर व भाच्यावर उपचार सुरू आहे.याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

दुचाकी अपघातात युवक जखमी.

कळंब : येथून वर्धा रोडने जात असलेल्या दुचाकीला दुसर्‍या भरधाव दुचाकीची धडक लागल्याने दुचाकीवरील युवक जखमी झाला. हा अपघात १४ ऑक्टोबर रोजी घडला. याप्रकरणी पियूश गणपत चौधरी रा. महिला आश्रम परिसर सेवाग्राम रोड वर्धा याच्या तक्रारी वरून दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला

बसस्थानकावर पाकीट मारले.

वणी : येथील बसस्थानकावर उभ्या असलेल्या गडचांदूर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने खिशातून पाकीट काढून त्यामधील २८ हजार रूपये चोरून नेले. ९ जून रोजी ही चोरी करण्यात आली. मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील मनोज रमेश आसूटकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

जीवे मारण्याची धमकी.

राळेगाव : गाईला दगड फेकून मारताना ता गाईला लागण्या ऐवजी घराबाहेर बसून असलेल्या महिलेला लागल्याने ती जखमी झाली. त्यामुळे तिच्या सुनेने जाब विचारला असता सुनेसोबत वाद करून जीवे मारण्याची धमकी दिली.ही घटना १७ ऑक्टोबर रोजी बारीपूर्‍यात घडली. सुभद्राबाई लक्ष्मण कुंभारे हिच्या तक्रारी वरून इंदुबाई किसन दारव्हेकर विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला

वाहनाची बालिकेस धडक.

महागाव : कुटूंबासह माहूर येथील रेणूका मातेच्या दर्शनासाठी जात असतानाच फुलसावंगी गावाजवळ पाणी पिण्याकरीता वाहनातून उतरलेल्या ९ वर्षीय बालिकेस विना क्रमांकाच्या भरधाव वाहनाने धडक दिली. यात ती जखमी झाली. जानवी पतंगे रा. मानकेश्वर असे तिचे नाव आहे. वडील राजू पतंगे यांच्या तक्रारी वरून संदीप पंडागळे रा. नारळी याच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

रेती चोरीचा प्रयत्न.

मुकूटबन : पैनगंगा नदीच्या पात्रामधील दोन ब्रास रेती अर्धवट नंबर असलेल्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या नेत असताना १७ ऑक्टोबर रोजी दुर्भा ते झरी दरम्यान आढळून येताच रेती खाली करून चोरटे पळून गेले. तलाठी राजू बळवंतराव मोरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यावरून एमएच २९ बीव्ही ७५३३ क्रमांकाचा ट्रॅक्टरचालक व अन्य एकाविरूध्द गुन्हे नांंद करण्यात आले.

कमी मजूरीवरून वाद.

मुुकूटबन : कमी पैशामध्ये कामावर नेत असल्याच्या कारणावरून शिविगाळ करीत वाद करण्यात आला. तसेच डोक्यावर दगडाने मारून जीवे मारण्याची धमकी दिली. १६ ऑक्टोबर रोजी वणी तालुक्यातील शेजापूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी बंडू नामदेव माशिलकर रा. तेजापूर याच्या तक्रारी वरून व्यंकटी मुद्देलवार व अन्य दोघाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

दगडाने मारून जखमी केले.

वणी : नातीला शिविगाळ का केली असे विचारले असता वाद करून दगडाने डोक्यावर मारून जखमी केले तसेच शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. येथील रंगनाथ नगरात १७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.
धनराज माधव किनाके यांनी दिलेल्या तक्रारी वरून आकाश नामक आरोपीविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आल

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × three =