ज्ञानेश आश्रम भैरवगड येथे बालसंस्कार शिबिरार्थीची आरोग्य तपासणी.
अकोला प्रतिनिधी : गुलाम मोहसीन
वारी भैरवगड- “ज्ञानेश अlध्यात्मिक आश्रम”वारी भैरवगड येथे नियमितपने “बाल संस्कार शिबिराचे आयोजन” ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे वतिने करण्यात नियमितपने करण्यात येते या बालसंस्कार शिबिरामध्ये सामाजिक,अध्यात्मिक,धार्मिक तसेच दैनंदिन जीवनातील जीवनशैली कशी असावी याची शिकवण महिनाभर चालणाऱ्या शिबिरात शिबिरार्थी बालकांना देण्यात येते बाल संस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी मे महिन्यात करण्यात येते बाल संस्कार शिबिरात सहभागीशिबिरार्थीं तसेच सेवेकरी यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार कर्ता हनुमान मंडळ अकोला व सत्य साई सेवा समिती अकोला जिल्हा माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने श्री किशोर रत्नपारखी डॉ अशोक ओळबे यांच्या वतीने दरवर्षी करण्यात येते.
दिनांक १२ मे रविवार रोजी आयोजित आरोग्य शिबिरात ५०० च्या वर गरजवंत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. आयोजित आरोग्य शिबिरात भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,डॉ तेजराव नराजे यांनी बालकांची तपासणी केली तर गजानन धरमकर ज्ञानदेव बदरखे अरुण वाकोडे सौ संगीता ओळबे यांनी औषधीचे वितरण केले.यावेळी आश्रमातील महाराज मंडळी व पालकांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.