GBS (Guillain Barre Syndrome) आजाराने महाराष्ट्रात हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केलेली आहे पुणे कोल्हापूर मध्ये या आजाराने बाधित रुग्ण आढळून येत असताना सांगली जिल्ह्यातही याचा शिरकाव झाला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण हे तिन्ही जिल्हे मिळून 127 जणांना GBS ची लागण झाली असल्याची माहिती गुरुवारी समोर आली.दरम्यान राज्य सरकारने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केली आहे.
सांगली शहरातील चिंतामणी नगरात याचा रुग्ण आढळून आल्यानंतर, सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील एकूण 600 घरांचे सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे.
Guillain Barre Syndrome Outbreak दरम्यान केंद्र सरकारने महाराष्ट्रात जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांवर देखरेख आणि व्यवस्थापन करण्यासाठी आणि राज्याला आरोग्याविषयी मदत करण्यासाठी तज्ञांची सात सदस्यीय टीम तैनात केली आहे, असे अधिकृत सूत्राने नवी दिल्लीत सांगितले.
काय आहे GBS {Guillain Barre Syndrome}
वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञ आणि आरोग्यसंबंधी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते Guillain Barre Syndrome GBS हा एक दुर्मिळ असा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे,याचे जिवाणू शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा चुकवून मज्जातंतूंवर हल्ला करते, ज्यामुळे शरीरातील बहुतांश स्नायू कमकुवत होतात आणि GBS च्या गंभीर प्रकरणांमध्ये पक्षाघात होण्याचाही धोखा वाढतो. मात्र तात्काळ वैद्यकीय सेवा मिळाल्यास यावर नियंत्रण मिळविता येते.
कोल्हापूरमध्ये याचे 2 रुग्ण आढळले.
जीबीएस आजाराच्या पुण्यात उद्रेक होत असतानाच यानंतर कोल्हापूरमध्ये याचे 2 रुग्ण आढळून आले होते.त्यानंतर बुधवारीच सांगलीमध्येही जीबीएस आजाराचा शिरकाव होताना दिसला.सांगली शहरात ग्रामीण भागात मिळून एकूण 6 गुईलीन बैरी सिंड्रोम GBS रुग्ण आढळले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आले होते.
सांगली शहरात सर्वप्रथम चिंतामणी नगरामध्ये एका रुग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली त्यानंतर त्याला आधी खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले यानंतर सांगली जिल्ह्यात एकूण सहा जीबीएस चे संचत रुग्ण आढळले असल्याची माहिती सांगलीचे जिल्हा सिव्हील सर्जन डॉ.विक्रमसिंह कदम यांनी दिली.
सांगलीत आढळलेला पहिला रुग्ण हा नुकताच आग्रा आणि अजमेर या ठिकाणी जावून आला असल्याने तेथेच त्याला GBS ची लागण झाल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली.सांगली शहरातील ज्या चिंतामणी नजरात पहिला रुग्ण आढळून आला या भागात 600 घरांचे महानगरपालिका आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून नागरिकांची जलद तपासणी प्रक्रिया सुरू केली.
आरोग्य विभागाने केले आवाहन.
दरम्यान जीबीएस चे संशयित रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याने नागरिकांनी या आजाराने घाबरण्याची काहीच कारण नाही या संदर्भात आरोग्य विभागाने आवाहन केले आहे की नागरिकांनी पाणी सोबतच स्वच्छतेबाबत दक्षता बाळगावी.
जीबीएसची लागण झाल्यावर हातापायात गोळे येवून, मुंग्या येणे, शरीरात अशक्तपणा जाणवणे बोलताना आणि अन्न गिळताना अडचण आल्यास घाबरून न जाता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावा,असा सल्ला देण्यात येत आहे.
पुण्यात GBS चा पहिला बळी.GBS मुळे 2 लोक मृत
महाराष्ट्रात जीबीएस आजाराचा शिरकाव झाल्यानंतर या आजाराने बाधित 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.यात एका रुग्णाचा पुण्यात आणि दुसऱ्याचा सोलापुरात मृत्यू झाला आहे.
पुणे येथील सिंहगड भागातील नांदोशी येथील एका 56 वर्षीय कॅन्सर पीडित महिलेला GBS ची लागण झाल्यावर तिला पुण्यातील ससून इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
उपचार होत असताना या महिलेची श्वसनतंत्रिका निकामी झाल्याने आणि फुफ्फुस आणि श्वसन नलिकेत संसर्ग झाल्याने तिचा मृत्यू झाला.दरम्यान बुधवार पर्यंत पुण्यात GBS संशयित 16 रुग्णांची भर पडून रुग्ण आकडा 127 वर पोहोचला होता.
पुण्यातील सिंहगड GBS hotspot असल्याचा संशय.
दरम्यान केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी पुण्यात महापालिकेच्या सर्वेक्षण पथकांकडून GBS (Guillain Barre Syndrome) संशयित रुग्णांचे पुन्हा तातडीने सर्वेक्षण करून घेतले. रुग्णसंख्या वाढीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आहे.
पुणे शहर परिसरात आढळून आलेल्या जीबीएस (Guillain Barre Syndrome) रुग्णांपैकी जवळपास 80 टक्के रुग्ण हे पुण्यातील सिंहगड रस्ता या परिसरात आढळून आले आहेत.
त्यामुळे पुण्यातील सिंहगड GBS (Guillain Barre Syndrome) hotspot असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली.या भागात वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकांनी,उलट्या,अतिसार, अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने पुन्हा या रुग्णांचे तातडीने सर्वेक्षण केले. या भागात रुग्णसंख्या वाढीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी हा सर्वे करण्यात आला.