Guardian Minister Disputes In Mahayuti : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळवून,आणि मोठ्या प्रयत्नातून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्रीपद,कॅबिनेट खाते आणि समोर आलेले अंतर्गत राजकीय पेच सोडविले आहे.मात्र आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री या महत्त्वाच्या पदासाठी महायुतीसमोर नवे आव्हान दिसत आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हे पालकमंत्री पदावर आपापले दावे करीत आहेत.त्यामुळे निवडणूक संपून आता दिढ महिने झाले असतानाही महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कॅबिनेट विस्तार मुख्यमंत्री पदाची निवड आणि विविध मुद्द्यांवर महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच झाल्यानंतर सरकार अस्तित्वात आलेले आहे.पण महायुतीमध्ये आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी पुन्हा रस्सीखेच होताना दिसत आहे.
भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे पालकमंत्री पदासाठी अनेक कॅबिनेट मंत्री आग्रही असल्याने,अनेक जिल्ह्यात राजकीय पेच निर्माण होताना दिसत आहे. विविध जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे पालकमंत्री पदावर दावे आहेत,तसेच ते का करण्यात येत आहे?राज्यातील ते कोणते जिल्हे आहेत ज्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये तेथे पालकमंत्री पदासाठी सध्या पेच दिसत आहे.ते आपण पाहूया.
पुण्यात पालकमंत्री पदासाठी एनसीपी अजित पवार गटाचा मजबूत दावा.
पुणे जिल्हा आणि येथील बारामती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठा प्रभाव आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्या वेळी शपथ घेतलेले अजित पवार हे आपल्या पक्षाला पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळावा यासाठी मजबूत दावा करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे गेली वीस वर्षापासून अजित पवार स्वतः पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत ते आपल्याकडेच पालकमंत्री पद राहावा यासाठी मजबूत दावा करीत आहे. ते आपला दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही ही वास्तविकता आहे.
हे समजूनच सध्या येथे भाजपने आपल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावा असा अधिकृत दावा केलेला नाही,त्यामुळे पुढचे पाच वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पुन्हा पुण्याचे पालकमंत्री राहतील,अशी शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.
ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पद कोणाला?.
मुंबई भागातील ठाणे जिल्हा हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गढ मानला जातो.मात्र येथे पहिल्यांदा पालकमंत्री पदावरून भाजप समोरासमोर आहे त्यामुळे येथे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गोटात या पदासाठी राजकीय स्पर्धा दिसत आहे. शिवसेनेचे हे गढ असल्याने आणि येथून स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे दुसरे 2 आमदार प्रताप सरनाईक असल्याने शिंदे गट पालकमंत्री पद आपल्याकडे राहावे यासाठी खूप आग्रही आहेत. मात्र येथे भाजपने आपले आमदार गणेश नाईक यांच्यासाठी पालकमंत्री पदावर दावा ठोकला आहे.
मागील सरकारात स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्याचा खूप विकास होताना दिसला. त्यामुळे आता ते उपमुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पद हा पुन्हा आपल्या पक्षाकडे राहिला तर समोर पुन्हा विकास साधता येईल अशी भूमिका त्यांचे आमदार सरनाईक यांनी मांडलेली आहे.
सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदावर राजघराण्याचा दावा.
सातारा जिल्ह्यात यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले येथे राजघराण्यातील शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपचे जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला असून,दुसरीकडे शिवसेनेचे शंभूराज देसाई हे सुद्धा पालकमंत्री पद मागत आहे.मात्र सातारा मध्ये भाजपकडे चार आमदार असल्याने आणि यात दोन मंत्री कॅबिनेटमध्ये असल्याने भाजपकडे पालकमंत्री पद राहिला हवे,असे आग्रह भाजप नेते करीत आहे.
विशेषत्वाने ही मागणी भाजपचे खासदार उदयनराजे यांनी लावून धरली आहे.साताऱ्यात राजघराण्याकडे पालकमंत्री पद रहावे,आणि यासाठी उद्यनराजे भोसले हे शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी भाजपमध्ये तगडी लॉबिंग करताना दिसत आहे.
बीड मध्ये धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठा पेच.
महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बीड हा महत्त्वाचा जिल्हा मानला जातो सध्या येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे राजकारण प्रचंड तापलेला आहे. या प्रकरणात मास्टर माईंड मानला जाणारा वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा खूप निकटवरती कार्यकर्ता मानला जात आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या होत असताना त्यांना बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पद कोणत्याही परिस्थितीत देण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे.
धनंजय मुंडे हे एनसीपी नेते अजित पवार आणि सीएम. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत.त्यामुळे बीडमध्ये सध्या तापलेले वातावरण पाहता मुंडे यांच्यासमोर पालकमंत्रीपदासाठी पेच आहे.सोबतच येथे पालकमंत्रीपदावरून महायुती मधील तिन्ही पक्षांमध्येही रस्सीखच सुरु आहे.त्यामुळे येथे चर्चेतून तिढा सोडवू, अशी माहिती महायुतीच्या गोटातून दिली जात आहे.
कोल्हापूर रत्नागिरी मध्ये पालकमंत्री पदासाठी मतभेद.
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ आणि दुसरे आमदार प्रकाश अमिटकर यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावर लढत आहे. दोघांपैकी महायुती मधील वरिष्ठ नेते कुणाची निवड करतात याकडे अख्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते उदय सामंत आणि भाजपचे योगेश कदम यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ दिसत आहे.
यवतमाळच्या पालकत्वासाठी महायुतीत रस्सीखेच.
महाराष्ट्रात यवतमाळ जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. येथे विकासाची खूप गरज असल्याने नव्या महायुती सरकारला यांना खूप लक्ष देण्याची गरज आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यात यश मिळाल्याने येथून महायुती मधील तिन्ही पक्षांना मंत्रीपद देण्यात आली आहे. मात्र यंदा पालकमंत्री पदासाठी यवतमाळ जिल्ह्यात महायुतीमधील या तिन्ही मंत्र्यात रस्सीखेच होताना दिसत.
यापूर्वी दोनदा पालकमंत्री राहिलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय राठोड हे या पदासाठी आग्रही आहेत. तर पहिल्यांदा मंत्री झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाचे इंद्रनील नाईक आणि भाजपचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री बनलेले अशोक उईके हे सुद्धा पालकमंत्री पदासाठी दावे करत आहे.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. सोबतच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे संजय शिरसाठ या दोघांमध्ये पालकमंत्री पदासाठी राजकीय स्पर्धा सुरू आहे. तर जळगाव मध्ये भाजपचे संजय सहकारी आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री पदावर आपला दावा ठोकलेला आहे.