GST Summons Fraud : आधुनिक युगात डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीमुळे सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉडच्या घटना घडत आहेत. आता जीएसटी या टॅक्सच्या प्रणालीत जीएसटी समस्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड फंडा अमलात आला आहे.
जीएसटी समन्स GST Summons नावाखाली मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड होत असून,जीएसटी कर तपास नावाखाली पाठविण्यात येणाऱ्या फेक मेसेजमुळे आतापर्यंत अनेक सुशिक्षित लोकही याचे शिकार बनले असून,त्यांचे बँक खाते या फ्रॉडमुळे रिकामे झाले आहे.
त्यामुळे काय आहे जीएसटी एसएमएस GST Summons SMS.आणि या मेसेजमुळे कसे फसविण्यात येत आहेत याबाबत जाणून घेणे आवश्यक झाले आहे.
हल्लीच्या काळात जीएसटीच्या नावावर नवीन सायबर फ्रॉड होत आहे. विविध ठिकाणी ठगबाजांनी जीएसटी समन्स म्हणून फेक मेसेज पाठवून अनेकांना आर्थिक शिकार बनविले आहे.
यामुळेच आता ट्राय आणि शासनाकडून सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांना सावध करण्याचे उद्देशाने प्रत्येक मोबाईलवर सतत त्याची कॉलर ट्यून एकायला मिळत आहे.मात्र सरकारी उपाययोजना झाल्यानंतर ही अनेक लोक जीएसटी फ्रॉडचा शिकार होत आहे.
नेमका हा GST Summons Fraud घोटाळा आहे तरी काय ?
उल्लेखनीय म्हणजे या फसवणुकीत स्केमर्सच्या Scammers.जाळ्यात अडकणारे 70 ते 80 टक्के लोक हे सुशिक्षित आहेत.यामुळेच आता सर्वांनी जीएसटी SMS नावाखाली होत असलेल्या फ्रॉड पासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
बाजारात हा नवीन जीएसटी समन्स घोटाळा उघडकीस आला आहे.जीएसटी सारख्या शासकीय अप्रत्यक्ष करांचे मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या जीएसटी कौन्सिल GST Council.सीमाशुल्क मंडळ CBIC यांनाही लोकांना यापासून सतर्क राहण्याचे आवाहन करावे लागत आहे.
त्यामुळे नेमका हा जीएसटी समन्स घोटाळा आहे तरी काय? लोक याला कस बळी पडतात?याबाबत आपण जाणून घेऊया…..
GST म्हणजे “वस्तू आणि सेवा कर” आहे. भारतामध्ये पूर्वी प्रचलित असलेल्या अनेक अप्रत्यक्ष करांच्या जागी भारतात एक नवीन प्रकारचा कर GST लागू आहे. GST हा एक बहुस्तरीय आणि सर्वसमावेशक करप्रणाली आहे, ज्यामध्ये काही राज्यातील काही टॅक्स4 वगळता बहुतांश अप्रत्यक्ष करांचा यात समावेश आहे.
अशी होते GST Summons पाठवून फसवणूक?
उल्लेखनीय म्हणजे देशात सर्व व्यवसायिकांना शासनाने निर्धारित केलेल्या गुडस अँड सर्विस टॅक्स अर्थातच जीएसटी कर Goods And Service Tax.सरकारकडे जमा करावा लागतो. प्रत्येक महिन्याला जीएसटी रिटर्न व्यवसायिकांना भरावा लागतो.आता याच गोष्टींचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्यावसायिक आणि लोकांना बनावट जीएसटी SMS पाठवायला सुरुवात केलेली आहे.
- यात जीएसटी संदेश नावाने मोबाईलवर किंवा ऑनलाईन प्रणालीवर मेसेज पाठविला जातो.
- सिबिकच्या CBIC द्वारे संचालित इंटेलिजन्स डायरेक्टर जनरल DGGI किंवा CGST जीएसटी कौन्सिल कार्यालयातर्गत सुरू असलेल्या जीएसटी टॅक्स इन्क्वायरीचा एक भाग म्हणून हा मेसेज पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात येतो.
- महत्त्वाचे म्हणजे जीएसटी कडून आपणास समन्स मिळाला आहे,हे पाहूनच अधिकांश व्यावसायिक घाबरतात,भले ते सुशिक्षित असो.
- यानंतर हे बनावट जीएसटी समन्स पाठविणाऱ्यांकडून संबंधितांकडून त्यांच्या बँक खात्याची संवेदनशील अशी माहिती विचारली जाते.
- यादरम्यान अनेकदा माहिती घेतली जात असताना ओटीपी पाठवून त्या ओटीपी ची माहिती घेऊन त्याच्या मदतीने बँक खात्याची रक्कम रिकामे करण्यात येत आहे.
त्यामुळे आता सरकारने अशा फेक जीएसटी समन्स वर नियंत्रण आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलत असतानाच,सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांना यापासून स्वतःचे बचाव करण्यासाठी सतर्कता संदेश देवून आणि सार्वजनिक जनजागरण सुद्धा सुरू केलेले आहे.
जीएसटी समन्स फ्रॉड सुरक्षित रहा…..
जर कुठल्याही प्रकारचा जीएसटी समन्स किंवा या संदर्भात इतर कोणताही संदेश मिळाला, तर अधिकृतरित्या तो तपासल्याशिवाय जीएसटी कर GST Tax भरण्यासंदर्भात किंवा बँक खाते डिटेल्स देण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेऊ नका.याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधून माहिती घ्या.
- सिबिक CBIC या अधिकृत शासकीय पोर्टल जा.
- esanchar.cbic.gov.in/DIN/DINSearch विभागात क्लिक करून समोरील माहिती घ्या.
- Verify CBIC-DIN विंडो वर जा.
- येथे तुम्हाला मिळालेल्या जीएसटी समन्स संदेश संबंधित मेसेज खरा आहे किंवा खोटा आहे,याची अधिकृत माहिती मिळेल.
जर बनावट GST Summons Fraud मिळाले तर तात्काळ हे कारवाई करा.
- सर्वात आधी DGGI किंवा CGST ऑथॉरिटी सोबत तात्काळ संपर्क साधा.
- फसवणूक करणाऱ्या एसएमएस किंवा इतर संशयास्पद घडामोडींची संबंधित प्राधिकरणाला तात्काळ माहिती द्या.
- बनावटी जीएसटी समन्स असल्याच्या संशय येताच,आपली व्यक्तिगत माहिती किंवा आर्थिक माहिती अथवा बँकिंग डिटेल्स शेअर करणे टाळा.