Govt Employees Attendance : राज्यात सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी सरकारने QR CODE आधारावर हजेरी आणि पगार अनिवार्य केले आहे.राज्यभरात हा मुद्दा गाजत असताना जानेवारी महिन्याचा पगाराचा मुद्दा गाजत असताना फेब्रुवारीपासून QR CODE आधारीत हजेरी आणि याच्या आधारावरच सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा पगार करण्यावर सरकार ठाम आहे.
दरम्यान जानेवारी महिन्याचा थांबलेला पगार लवकरच अदा करण्यात येतील.फेब्रुवारी महिन्यापासून ज्या कर्मचारी, शिक्षकांची QR CODE नुसार हजेरी नसतील त्यांच्या पगार कपातीस सुरुवात होणार आहे.या निर्णयावर सरकार आणि शिक्षण मंत्रालय ठाम असून या संदर्भात नुकतेच पत्र जारी करण्यात आले आहे.राज्य सरकारने आपल्या सर्व विभागात लोकाभिमुख प्रशासन आणि कामे गतिमान करण्यासाठी पाऊले उचलली आहे.
राज्य सरकारी विभागात गटशिक्षणाधिकारी,BDO,बालविकास प्रकल्प अधिकारी,जिल्हा परिषद मधील सर्व प्रकारचे आणि विभागांतर्गत काम करणारे अधिकारी,कर्मचारी,शिक्षक अभियंता,उपअभियंता,तहसील आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय अधिकारी आणि सर्व विभागातील,अधिकारी, कर्मचारींना त्यांच्या निर्धारित कार्यालयात वेळेत उपस्थित राहून आणि नागरिकांना त्यांची कामे निर्धारित वेळेत आणि जलद करून देण्याच्या मुद्द्यावर सरकार भर देत आहे.
यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात निर्धारित वेळेत वेळेवर उपस्थित राहण्यासाठी आणि उपस्थितीची नोंद करण्यासाठी सरकारकडून आता क्यू आर आधारित सिस्टम (QR Based Attendance And Salary System) सर्व ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे.सरकार आणि प्रशासनाची हे प्रणाली स्वागत योग्य असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि जनप्रतिनिधींकडूनही याची प्रशंसा केली जात आहेत.
विशेष म्हणजे राज्यात नवे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या ॲक्शन प्लान मध्ये क्यूआर बेस्ड हजेरी आणि या आधारावर पगार या उपक्रमावर शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहे.यात सरकारचा हा निर्णय विशेष प्राधान्यक्रम असलेल्या उपक्रम मानला जात आहे.
जानेवारी महिन्यात पूर्वीप्रमाणे मात्र पुढे QR CODE हजेरीवरच मिळणार पगार.
दरम्यान जानेवारी महिन्यापासून राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना किंवा आधारित हजेरी आणि शासकीय कामकाजावर अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली होती. या आधारावर जानेवारी महिन्याचा पगार काढण्याची निर्देश होते,आणि हा मुद्दा राज्यभरात गाजत होता.
मात्र अनेक विभागात आणि जिल्हा परिषद मध्ये क्यू .आर.आधारित हजेरी प्रणाली पूर्णतः स्थापित न झाल्याने हजेरी आणि पगार या संबंधात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
यासाठी सरकार आणि प्रशासनिक स्तरावर झालेल्या चर्चेत आणि सरकारकडून प्राप्त निर्देशानुसार आता क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात ही कार्य प्रणाली तात्काळ सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे.
यासाठी जानेवारी महिन्याचा पूर्ण कालावधी देण्यात आला. यामुळे आता अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांचे जानेवारी 2025 चे पगार हे मागील प्रणालीनुसार काढले जाणार आहे.
मात्र फेब्रुवारी पासून अधिकारी कर्मचारी शिक्षकांना निर्धारित वेळेत कामावर हजर राहण्यासाठी आणि पगारासाठी QR CODE हजेरीपट प्रणालीचे कडेकोट पालन करावे लागणार आहे,अन्यथा सरकारकडून पगार कपात होणार हे निश्चित झालेले आहे.{QR Based Attendance System For Government Employees}
उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत जानेवारी महिन्याचा पगार प्रशासनाकडून थांबविण्यात येत असल्याने, शिक्षक संघटना आणि कर्मचारी संघटनांनी यावर आपला आवाज बुलंद केलेला होता.त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा पगार नियमित प्रणालीने दिल्यानंतर,फेब्रुवारी महिन्यापासून QR आधारित हजेरी आणि पगार या निर्णयावर अंमलबजावणी होणार आहे.
Govt Employees Attendance : QR CODE वरूनच ऑनलाइन हजेरी नोंदविणे अनिवार्य.
आता सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या एक्शन प्लान मध्ये हा उपक्रम प्राधान्य क्रमाने अंमलबजावणीसाठी समोर असल्याने यावर फेब्रुवारीपासून कडक असा अमल होणार आहे.
क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षकांनी आपली दैनंदिन कार्यालयीन आणि शाळांमध्ये उपस्थिती ही QR Code वरूनच नोंदविणे अनिवार्य करण्यात आली आहे.
फेब्रुवारी 2025 पासून या आधारावरच हजेरी आणि कर्मचारी अधिकारी शिक्षकांचे पगार या प्रणालीतील उपस्थिती रिपोर्ट आधारावरच निघणार आहे.