Govinda : Actor आणि शिवसेना नेते Govinda यांना लागली बंदुकीची गोळी.जाणून घ्या कशी आहे प्रकृती.
Govinda : Actor आणि शिवसेना नेते Govinda यांना लागली बंदुकीची गोळी.जाणून घ्या कशी आहे प्रकृती.
कशी लागली अभिनेते गोविंदा यांना बंदुकीची गोळी.
प्रसिद्ध फिल्म अभिनेते गोविंदा हे आज बंदुकीतून झालेल्या फायर मधून गंभीर जखमी झाले.मंगळवारी सकाळी त्यांच्या घरात निघताना आणि गाडीत बसताना ही घटना घडली.त्यांना तात्काळ क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.या घटनेनंतर जुहू पोलिसांनी त्यांच्या घरी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे.विशेष म्हणजे अभिनेता गोविंदा हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत.त्यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागण्याची माहिती सकाळी समोर आली.त्यानंतर अभिनेते गोविंदा यांचा हालचाल घेण्यासाठी,प्रशंसक, समर्थक आणि नेत्यांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली होती.
कसा झाला फायर.
सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेते गोविंदा यांनी सकाळी स्वतःजवळ असलेली लायसेन्सी बंदुक साफ केली होती. यानंतर आपल्या गाडीत बसताना त्यांच्या खिश्यात असलेल्या पिस्तुलाचा ट्रिगर अनावधानाने दाबला गेला, त्यातून बंदुकीची गोळी सुटून अभिनेते गोविंदा यांच्या पायाला गोळी लागली. जखमी झालेल्या गोविंदांना जवळच्या जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या पायावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे.त्यांची प्रकृती सुद्धा स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर दिली.या घटनेची माहिती जुहू पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी पोहोचुन त्यांची बंदूक ताब्यात घेतली आणि अभिनेते गोविंदा यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून पोलिसांनी घटनेबाबत विचारपुस करीत पुढील तपास सुरू केला आहे.
काय करीत होते गोविंदा.
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना नेते गोविंदा यांच्याकडे स्वतःची लायसनची पिस्तूल आहे.घरी नियमित काम आटोपून सकाळी ते आपल्या गाडीने बाहेर निघत होते.यापूर्वी त्यांनी स्वतः ची पिस्तूल साफ करून खिश्यात ठेवली होती.यानंतर गाडीत बसताना नेमक्या त्याच वेळी त्यांच्या खिशात असलेल्या पिस्तूलचा ट्रिगर दबला,त्यामुळे गोळी गोविंदांच्या पायात शिरली. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे शिवसेना शिंदे गटापर्यंत राजकीय प्रवास.
उल्लेखनीय म्हणजे आधी काँग्रेसचे खासदार राहिलेले अभिनेता गोविंदा यांनी मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हजेरीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे.मात्र यापूर्वीपासूनच गोविंदा राजकारणात सक्रिय आहेत.2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अभिनेते गोविंदा उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकले होते.या निवडणुकीत त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव करीत लोकसभेत प्रवेश केला होता.पण 2009 नंतर अभिनेता गोविंदा राजकारणापासून दूर होते आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये नवीन इनिंग सुरू केली होती.या सेकंड मिनिंग मध्ये अपयशी झालेल्या गोविंदांनी पुन्हा या वर्षात राजकारणात पुन्हा प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महायुती सरकारच्या विकास कामांचा प्रचार करणे सुरू केले आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदा यांनी महाराष्ट्रात महायुतीचा प्रचार केला होता.