Google Pay Voice Feature : आजकाल डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन पेमेंटचा जमाना आहे यासाठी मोठ्या प्रमाणात विविध पेमेंट अप्लिकेशन वापरले जातात यात गुगल पे हा डिजिटल पेमेंटचा सर्वात जास्त वापरण्यात येणारा पर्याय आहे.(Google Pay Digital Payment System In India)आता गुगल पे वर पेमेंट करताना आणि हा App वापरताना कोणताही आकडा आणि पर्याय टाईप करण्याची गरज राहणार नाही.
गुगल पे मधून आर्थिक व्यवहार करताना Google Pay वर थेट बोलून पेमेंट करता येणार आहे.यासाठी गुगल पे नवीन फीचर लॉन्च करेल.आता Google Pay Voice Feature आता पेमेंटसाठी कामी येणार आहे.यामुळे गुगल पे वर पेमेंट संबंधात बोलून डिजिटल पेमेंट करणे अगदी सोपे होणार आहेत.तर चला जाणून घेऊया या नवीन फीचर्स विषयी……
थेट बोलून समोर पेमेंट करता येणार.Google Pay Voice Feature.
भारतात विविध राज्यात विविध भाषा बोलणारे कोट्यावधी लोक दररोज आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल पेमेंटचा महत्वाचा पर्याय असलेला गुगल पे अप्लिकेशन वापरतात.आता या गुगल पे वर थेट बोलूनच पेमेंट करता येणार आहे.यासाठी गुगल पे वर व्हॉइस ओवर द्यावा लागेल,यानंतर तुमचे पेमेंट ऑटोमॅटिक सेंड होईल.यासाठी गुगल पे कडून नवीन फीचर आणल्या जात आहे.यात थेट बोलून समोर पेमेंट करता येणार आहे.
यामुळे पेमेंट करण्यासाठी आता काहीही टाईप करण्याची गरज राहणार नाही.भारतात अनेक राज्यात विविध भाषा बोलल्या जातात.त्यामुळे गुगल पे चा हा नवीन feature भारतातील सर्व राज्यातील नागरिकांना उपयोगी पडणार आहे.
पीआय पेमेंट एप्लीकेशन सिस्टम मध्ये नवीन तंत्रज्ञान
मागील एका दशकात देशात बँकिंग सेक्टर मध्ये आर्थिक व्यवहार करताना यूपीआय पेमेंट एप्लीकेशन सिस्टम मध्ये नवीन तंत्रज्ञान आले आहे.यात आता google पे ॲप्लिकेशन मध्ये हे मोठा तांत्रिक बदल होत आहे. आता गुगल पे आपल्या युजरसाठी सुविधाजनक Voice Features सादर करणार आहे.
भारतात गुगल पे चे संचालन करणाऱ्या कंपनीचे Lead Products Management चे अधिकारी शरथ बुलुसू यांनी नुकतेच या संदर्भात माहिती दिलेली आहे.गुगल पे मध्ये आलेले आहे नव्या व्हॉइस फीचर्स मुळे आता युजर्सना आपले ऑनलाइन पेमेंट करणे अगदी सोपे होईल.
मात्र सध्या हा Google Pay Voice Feature कसे काम करेल याबाबत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पण लवकरच युजर्सना गुगल पे वर थेट बोलूनच ऑनलाइन पेमेंट करता येणे शक्य होणार आहे. हे फीचर्स लॉन्च होताच, देशात विविध भाषांचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी आता गुगल पे वर पेमेंट करताना आकडे टाईप करण्याऐवजी थेट बोलूनच पेमेंट पाठविण्यासाठी हा फीचर एका प्रकारे डिजिटल ऑनलाइन पेमेंट माध्यमात गेम चेंजर ठरू शकते,ही शक्यता आहे.
याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध भाषा बोलणारे लोक तर आहेच,पण अनेक लोकांना गुगल पे वापरता येते मात्र त्यात टाईप करणे त्यांना अडचणीचे ठरते,अशा लोकांची खूप मोठी संख्या असल्याने गुगल पेमेंट वर व्हॉइस फीचर्स हा त्यांचा काम अगदी आसान करणार आहे.{New Technology InGoogle Pay App.}
फीचर्सच्या लॉन्चिंग ची घोषणा किंवा निश्चित तारीख जाहीर नाही.
गुगल पे वाईस टाईप फीचर्स संबंधात नुकतेच आर्थिक क्षेत्रात कव्हरेज करणारी इकॉनॉमिक्स टाईम्स ने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार गुगल पे लवकरच हा वाईस फीचर लॉन्च करणार असल्याची माहिती दिलेली आहे.
मात्र google कडून अद्यापही या फीचर्सच्या लॉन्चिंग ची घोषणा किंवा निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.मात्र या रिपोर्टनुसार गुगल यासाठी भारत सरकारच्या या संदर्भात प्रकल्पात काम करीत आहे.
हे पिक्चर लॉन्च झाल्याने भारतातील नागरिकांना आपल्या स्थानिक भाषेत गुगल पे वर बोलून पैशांचे आर्थिक व्यवहार करण्यास मदत मिळणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार गुगल पेमेंट सिस्टम संचालन करणाऱ्या गुगलच्या प्राधिकरणाकडून सध्या याची मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर गुगल कंपनी वेगाने काम करीत आहे.
एआय आणि मशीन लर्निंग च्या मदतीने डिजिटल पेमेंट करताना ऑनलाईन फ्रॉड आणि इतर फसवणुकीचे प्रकार होणार नाही,यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सिस्टम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असा कंपनीचा विश्वास आहे.
महत्वाचे म्हणजे गुगल पे साठी भारत एक मोठी ऑनलाइन पेमेंट बाजारपेठ आहे.त्यामुळे कंपनी भारतात अशा नव्या इनोव्हेशन आणि सुविधांसाठी यात इन्व्हेस्टमेंट करण्यास तयार आहे.
सध्या भारतात गुगल पे आणि फोन पे चा वर्चस्व.
भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटल ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात आणि याच्या तंत्रज्ञानात मागील एक दशकात भारतात नवी डिजिटल क्रांती झाली आहे.सध्या डिजिटल पेमेंट साठी भारतात सर्वात जास्त गुगल पे आणि फोन पे या पेमेंट एप्लिकेशन्सचा वापर होतो.
- नोव्हेंबर 2024 मध्ये भारत सरकारच्या एका रिपोर्टनुसार देशात यूपीआय पेमेंट सिस्टम मध्ये गुगल पेमेंटचा एकूण 37% तर फोन पे चा 47.48% वाट आहे.
- अर्थातच देशात फोन पे नंतर Google Pay सध्या सर्वात जास्त वापरल्या जातो.भारतात UPI पेमेंट क्षेत्रात गुगल पे,फोन पे,आणि तिसरी महत्त्वाची कंपनी पेटीएम या तीन डिजिटल पेमेंट सिस्टम आणि हे एप्लीकेशन संचलन करणाऱ्या कंपन्यांचेच वर्चस्व आहे.
- दरम्यान भारत सरकारने डिजिटल पेमेंट मध्ये सक्रिय अशा इतर काही कंपन्यांचे डिजिटल पेमेंट मध्ये वर्चस्व कमी करण्यासाठी 30 टक्के मार्केट कॅप लावण्याचा प्रस्ताव समोर केला होता,मात्र देशात ऑनलाइन पेमेंट सिस्टम मध्ये कोणतीही अडचण अचानक येऊ नये, म्हणूनच याची डेडलाईन सरकारने आता 2026 पर्यंत वाढविली आहे.