Golden Shirt : कोट्यवधींचे सोनेरी शर्ट्स घालणारा हा व्यक्ती कोण ? अंबानी,अदाणी नव्हे हे घालतो जगातील सर्वात महागडे शर्ट.
Golden Shirt : तुम्हाला वाटत असेल जगात अब्जाधीश असलेले मार्ग मार्क झुकरबर्ग, जॅक मा, एलन मस्क,मुकेश अंबानी गौतम अदानी आणि इतर श्रीमंत लोक कोट्यावधींचे कपडे घालू शकतात, पण असे नव्हे भारतात एक असा व्यक्ती आहे जो “सोन्याच्या शर्ट मधील भारतीय माणूस”या नावाने ओळखला जातो त्याचे नाव आहे पंकज पारेख.
मेन विथ गोल्डन शर्ट.
देशात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहेत.ते कॉर्पोरेट टायकुन आहेत.त्यांचा जगात साम्राज्य पसरला आहे.”फुटबॉल विश्व चषकात गोल्डन बुट” प्रसिद्ध आहे,पण कोणी सुद्धा घालत नसतील एवढे महाग अन ते ही सोन्याने बनविलेले शर्ट पंकज पारेख यांच्याकडे आहेत.त्यांना आता अख्या जगात यामुळे ‘मॅन विथ द गोल्डन शर्ट’ म्हणून ओळखले जाते, आणि त्यांचा नावही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाला आहे.त्यामुळे ते भारतीयांसाठी अभिमानाचे प्रतीक बनले आहे.
महाराष्ट्रातील मोठे व्यवसायिक.
महाराष्ट्रात मुंबईत वास्तव्य करणारे पंकज पारेख हे मोठे व्यवसायिक आहेत पण त्यांना जगात सर्वाधिक महाग तसेच सोनेजडित वस्त्र घालण्याचा शौक आहे.पंकज पारेख यांच्याकडे जगातील सर्वात महागडे सोन्याने बनविलेले शर्ट आहे. हे सोने जडीत शर्ट परिधान केल्याने त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये सामील झाले आहे.
अबब 98 लाखांचा शर्ट.
त्यांनी 2014 ला सोन्याने लखलखता एक शर्ट घातला होता, या शर्टाची किंमत 98,35,099 तेव्हा होती,हे शर्ट 4.1 किलोग्रॅम शुद्ध सोन्यापासून बनविण्यात आले.आता सोन्याच्या किंमती वाढल्याने या शर्टची किंमत आता 2 कोटी रुपये झाली आहे.यावेळीच पंकज पारेख यांना मॅन विथ द गोल्डन शर्ट ही ओळख मिळाली.
पंकज यांनी अगदी कमी वयात मुंबईत व्यवसाय सुरु केला.पंकज पारेख यांची लोकप्रियता आज खूप आहे,पण आर्थिक कारणांनी त्यांना अगदी कमी वयात शाळा सोडावी लागली होती.त्यांनी आर्थिक मजबुतीसाठी कमी वयात गारमेंट फॅब्रिकेशन हा व्यवसाय सुरु केला. आणि याच कापड उद्योगामुळे पंकज यांचे नशीब चमकले.पंकज यांनी काही काळापूर्वी राजकीय महत्वाकांक्षा बाळगून पण व्यवसायाला सांभाळून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) मध्ये प्रवेश केला.राजकारणात सक्रिय राहून आपल्याला मोठे नेते व्हायचे ही त्यांची महत्वाकांक्षा आहेच.
सोनेरी शर्ट अन् प्रसिद्धी.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे आर्थिक शक्ती आहेच पण, पारेख यांनी आपल्या सोनेरी शर्ट बनवून आणि त्यांना घालून खूप प्रसिद्धी जमविली आहे.त्यांच्या या अनोख्या छंदाने आणि सोनेरी शर्टामुळे आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळून नाव गिनीज बुकात कोरले गेले आहे.