Gold Smuggling: 19 कोटींचे सोने जप्त, सोने तस्करीचे मुंबई, वाराणसी कनेक्शन.

Gold Smuggling: 19 कोटींचे सोने जप्त, सोने तस्करीचे मुंबई, वाराणसी कनेक्शन.

नागपूरच्या सराफा ‘किंग’ सह 11 अटकेत, मोठे सराफा व्यापारी डीआरआयच्या रडारवर.

Gold Smuggling: सोने तस्करीचे रॅकेट देशभर पसरले असून नागपूरही यात मागे नाही. नागपुरात आजवर सोने तस्करीचे अनेक प्रकरणे उघडकीस आली. आता पुन्हा डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) ने नागपूर, मुंबई आणि वाराणसी येथून एकूण 19 कोटी रुपयांचे 31.7 किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी डीआरआयने नागपूरच्या सराफा किंगला अटक केली असून हा किंग एका संघटनेचा पदाधिकारी आहे.

तस्करी करून सराफा व्यवसायात अल्पावधीत कोट्यधीश होणारे काही मोठे व्यवसायीसुद्धा डीआरआयच्या रडारवर आहे. डीआरआयच्या माहितीनुसार आरोपी बांग्लादेशहून भारतात सोने पाठवून मुंबई, नागपूर आणि वाराणसी सारख्या शहरांमध्ये पुरवठा करीत होते. संयुक्त कारवाईत 5 तस्करांना मुंबईत, दोघांना वाराणसीत आणि चौघांना नागपुरातून अशा 11 जणांना अटक करण्यात आली.

विदेशी मार्क असणारे गोल्ड: डीआरआयच्या नागपूर टीमने शुक्रवारी सायं. कोलकाताहून नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या एका एक्स्प्रेसमधून उतरताच दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8.5 किलोग्रॅम विदेशी मार्क असणारे सोने जप्त करण्यात आले. चौकशीनंतर सोने तस्करी करणाऱ्या आणखी दोघांची ओळख करून त्यांनाही पकडण्यात आले.

आरोपी राहुल (36) आणि बालूराम (41) दोघेही नागपूरचे रहिवासी आहे. यासोबतच भूपेशलाही अटक करण्यात आली. भूपेश किंगसाठी काम करीत होता. त्यामुळे किंगलाही अटक करण्यात आली. डीआरआयने या तस्करीच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी विविध टीमचे गठन केले आहे. चारही आरोपींची सखोल चौकशी केली असता हे नेटवर्क मुंबई आणि वाराणसीपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले. यानंतर डीआरआयच्या वेगवेगळ्या टीमने वाराणसी आणि मुंबईत एकसोबत छापेमारी केली.

हॅण्डब्रेकखाली बॉक्समध्ये लपविले होते सोने.

वाराणसीत एजन्सीच्या टीमने 3 तास कारचा पाठलाग केला. जंगलात चौकशी अभियानानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्य दोन आरोपींना अटक केली. या दोघांकडूनही 8.5 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले. हे सोने कारमध्ये हॅण्डब्रेकच्या खाली तयार करण्यात आलेल्या एका बॉक्समध्ये लपविले होते. तर मुंबईची टीमसुद्धा पाच आरोपींना पकडण्यात यशस्वी ठरली. हे पाचही आरोपी 4.9 किलोग्रॅम सोन्यासह वाराणसीहून रेल्वेने प्रवास करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − 6 =