Gold Rate Today : सोन्याचे भाव लवकरच लाखाचा टप्पा ओलांडणार! जाणून घ्या सोने भाव वाढीची कारणे?

Gold Rate Today : देशात सोन्याच्या भावाने नवी पातळी गाठली आहे.मंगळवार 18 मार्च रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सोन्याच्या भावाचा अचानक मोठी वाढ झाली.मंगळवारी सकाळी दिल्ली सराफा बाजारमध्ये ठेवण्याचे शुद्ध सोन्याचे नवीन भाव जाहीर करण्यात आले आहेत.यानंतर  देशात मंगळवारी प्रति 10 ग्राम 24 Carat सोने दरात एकूण 1300 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात अचानक चढउतार होत असतानाच मोठ्या प्रमाणात मंगळवारी  दिल्ली गोल्ड मार्केट मध्ये सोने दराने  उसळी घेताच देशात याचे भाव वाढले. दरम्यान यामुळे देशात सोन्याच्या मागणीमध्ये परिणाम दिसत असल्याचे गुंतवणूक क्षेत्रात बोलले जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सोमवारी 17 मार्च रोजी सोन्याच्या दर काही प्रमाणात कमी झाले,मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी याच्या दरात वाढ झाल्याने देशात ज्वेलर्स मार्केट आणि सोने खरेदी विक्रीचे व्यवहार स्थिर होइल अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

18 मार्च रोजी राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ झालेली आहे.दिल्ली सराफा बाजार कडून शुद्ध सोन्याचे नवे भाव मंगळवारी जाहीर करण्यात आले.

सोन्याच्या भावात 1300 रुपये प्रति 10 ग्राम वाढ झाली असून,चांदीच्या दरातसुद्धा प्रत्येक किलो 1300 रुपयांची भाव वाढ झाली आहे.एकूणच 18 मार्च रोजी या दोन्ही शुद्ध धातूंच्या किमतीनी किमतीचा नवा असा रिकॉर्ड या दोन महिन्यात बनविला आहे.

ही आहेत  भाव वाढ होण्यामागे कारणे.

देशात अचानक सोन्याचे किमतीत भाव वाढ होण्याची मुख्य कारणाने आता समोर आलेली आहे.{US New Financial Policy And Tariff }.यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे नवे आर्थिक धोरण आणि युएस टेरिफ संदर्भात अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व द्वारे अमेरिकन डॉलरचे  चलन धोरण शिथिल करण्याची मागणी, आणि अपेक्षा, सोन्याचा भाव वाढी मागे कारण मानली जात आहे.

दरम्यान या क्षेत्रातील तज्ञांच्या मते येणाऱ्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतात सोन्याच्या स्पॉट किमतीमध्ये आणखीन वाढ होणार आहे.{Gold Spot Rates} यामुळे लवकरच सोन्याचे भाव 1 लाखांचा टक्का ओलांडू शकतात,अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान भारतात सोन्याचे फ्युचर्स मार्केट आणि कमोडिटी एक्सचेंजमध्ये तसेच न्यूयॉर्क येथील फ्युचर्स मार्केट आणि Commodity Exchange वर गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे या आर्थिक वर्षात आतापर्यंत सोने किमतीत14 टक्के पेक्षा अधिक अर्थातच प्रती 10 ग्राम  11 हजार 360 रुपये पेक्षा जास्त किमती वाढल्या आहेत.तर दुसरीकडे भारतात वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत तब्बल 14 टक्क्यांनी वाढ झाली.

मागील 3 वर्षात Gold Investors आणि गोल्ड कंपन्याना  सोन्याने गुंतवणुकीत वार्षिक स्तरावर सरासरी 17 टक्के इतका रिटर्न मिळवून दिलेला आहे.आता या परिस्थितीत आता सोन्याचे भाव 1 लाख रुपये पर्यंत पोहोचेल किंवा नाही हे आता पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेचे असेल.

देशात 99.9% शुद्ध सोने किमती सतत चार दिवसात वाढल्या. 

मंगळवार 18 मार्च रोजी दिल्ली येथील सराफा बाजारमध्ये  सोने चांदीच्या भावात मोठी वाढ झाली असून प्रति 10 ग्राम सोने 1 हजार 300 रुपयांची वाढ झाली.या दरवाढीने सोने किमतीने नवा रिकॉर्ड कायम केला आहे.

दरम्यान ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते देशात गेल्या 4 दिवसात 99.9% शुद्ध सोने किमती सतत वाढल्या आहेत.मंगळवारी शुद्ध सोन्याची किंमत 1 हजार 300 रुपयांनी वाढली असून प्रति 10 ग्राम 90 हजार 750 रुपये या किमतीवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यात गुरुवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव हा 89 हजार 450 रुपये प्रति 10 ग्राम इतकाच होता.आता यात 1300 रुपयांनी वाढ होऊन  प्रति 10 ग्राम 90 हजार 350 रुपये या रेकॉर्ड किमतीवर पोहोचली आहे.

Gold Rate Today : या वर्षात इतके झाले सोने महाग?

गेल्या पंधरा वर्षात सोन्याचे भाव सतत वाढत आहे. यामुळे एकंदरच सोने खरेदीदार आणि गोल्ड इन्वेस्टर साठी सोन्यात गुंतवणूक ही नेहमी नफा देणारी ठरलेली आहे वर्तमान काळात सुद्धा सोन्यात गुंतवणूक फायदा देणारी ठरत आहे दरम्यान मागील एका वर्षात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे आर्थिक वर्ष 2023 24 ते आता 2025 च्या या तिमाहीत सोन्याचे भाव तब्बल 14.31 टक्क्यांनी वाढले आहे अर्थ एका वर्षात सोन्याचे प्रति 10 आमदार हे अकरा हजार 360  इतके वाढले आहे.

गेल्या आठवड्यात देशात होळी तेव्हा दरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी बंद असल्याने थोडी मंदी होती एकूणच सराफा बाजार बंद असल्याने सोने चांदीच्या किमती स्थिर राहिल्या मात्र यानंतर सराफा बाजार चे कामकाज सुरू होतात सर्वात आधी प्रत्येक किलो चांदीचा भाव तेराशे रुपयांनी वाढून आता एक लाख 2500 रुपये प्रत्येक किलो झाला आहे एकूणच त्यांनी आतापर्यंतचा सर्वात जास्त उच्चांक गाठलेला आहे मागील आठवड्यात गुरुवारी सराफा बाजारात चांदीचा भाव हा प्रत्येक किलो एक लाख एक हजार दोनशे रुपये या दरावर बंद झाला होता मात्र आता  यात मोठी वाढ झाली आहे.

देशात का वाढले सोन्याचे दर.

भारतात गेल्या एक वर्षात आणि वर्तमान काळात सोन्याचे दर सतत वाढत आहेत.देशात वाढत्या सोन्याचे किमतीवर गोल्ड इन्वेस्टर आणि या क्षेत्रातील तज्ञ नजर ठेवून आहेत.एचडीएफसी सेक्युरिटी ज्येष्ठ विश्लेषक सौमेल गांधी {HDFC Securities} सोन्याच्या दरवाढ संदर्भात म्हणाले आहे की,

  • देशात सोन्याच्या दरवाढी मागे अनेक घटक आहेत,यामुळेच या मौल्यवान धातूंच्या किमत वाढीत त्यांनी हातभार लावलेला आहे.
  • यात प्रमुखपणे मध्यवर्ती बँकांची सोने खरेदी आणि जागतिकी स्तरावर दिसत असलेली आर्थिक स्थिरता हे सोन्याचे किमतीवर परिणाम टाकणारे ठरलेले आहे.
  • याव्यतिरिक अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासन सत्तेत येतात अमेरिकन ट्रेड पॉलिसी आणि आर्थिक धोरण यामुळे आता सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी सोन्याची मागणी वाढलेली आहे.

यामुळे सोन्याच्या किमतीत आता वाढवताना दिसत आहे.

दरम्यान या संदर्भात Abance फायनान्शिअल सर्विस लिमिटेडचे CEO चिंतन मेहता यांच्या मते, सध्या अमेरिकन डॉलरची चलन किमत काही प्रमाणात घसरली आहे,तर दुसरीकडे अमेरिकन रिझर्व फेडरलद्वारे व्याज दरात काही कपात होण्याची शक्यता आहे,अशी अपेक्षा सुद्धा गुंतवणूकदारांना आहे.यामुळे मागील काही दिवसात सोन्याच्या किमती नवे रिकॉर्ड कायम करीत आहे.

जगात ग्लोबल रिस्क दिसत असल्याने सुद्धा सोन्याचे किमतीत वाढ होताना दिसत आहे.यामुळे येणाऱ्या काळात आणखी अस्थिरता दिसली तर, सोन्याचे दर हे एक लाख  रुपयांची किंमत ओलांडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen + one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.