Gold Rate Today In India : 7 जानेवारी रोजी देशात सोन्याची किमतीमध्ये अचानक घसरण झाल्याने सोने चांदीच्या मार्केटमध्ये खरेदी विक्रीमध्ये अचानक अंतर आल्याचे पाहायला मिळाले. सोन्याची किंमत अचानक कमी होण्यामागे अमेरिका येथील शेअर मार्केट कॉमॅक्स CMax आहे. मंगळवार 7 जानेवारी रोजी अमेरिकन कॉमिक्स मध्ये सोन्याची किंमत प्रती औंस 2. 638.30 डॉलर झाली तर या दरम्यान चांदीची किंमत 30.06 डॉलर प्रति औंस झाली.
यादरम्यान अमेरिकन मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची किंमत 76 हजार 934 प्रति दहा ग्राम तर चांदीची किंमत एकूण 89 हजार 284 रुपये झाली आहे.मागील काही आर्थिक वर्षांपासून भारतीय सोने चांदी, जड जवाहीर मार्केटमध्ये सोने चांदीच्या किमती वाढत असताना 2024 मध्ये प्रत्येक महिन्यात वाढ होताना दिसली. मात्र नव्या वर्षात या महिन्यातच आता सोन्याच्या किमतीला अचानक ब्रेक लागला असून 7 जानेवारी रोजी प्रति 10 ग्राम सोन्याचा किमतीत 400 रुपयांची घसरण झाली.
सोबतच आंतरराष्ट्रीय सोने खरेदी विक्री बाजारात ही सोने चांदीच्या किमती मागील काही दिवसात वधारलेले आहेत तर दुसरीकडे यामुळे अमेरिकन सेंसेक्समध्ये डॉलर निर्देशांक आणि युएस उत्पन्नात वाढ झाल्यानंतर आणि सोने आणि चांदीच्या किमती जास्त किंमत असतानाही अस्थिरता दिसत आहे.
7 जानेवारी रोजी अमेरिकी शेअर मार्केट असलेल्या सिमॅक्स वर सोन्याची किंमत 2638.30 डॉलर प्रति आखण्यात आली या सोबतच चांदीची किंमत ३०.०६ प्रती डॉलर औंस वर आली होती. तर अमेरिकन मल्टी कमोडिटी एक्सचेंज CoMax वर सोन्याची किंमत 76 हजार 934 प्रति दहा ग्राम आणि चांदीची किंमत 89 हजार 200 रुपये प्रति किलो इतकी झाली.
दिल्लीत मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव झाले कमी.
देशात अमेरिकन सिमेक्स वर सोने चांदीचे भाव वधारताच 24 कॅरेट सोन्याचे भाव कमी होताना दिसली भारताची राजधानी दिल्लीमध्ये 7 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 76 हजार 910 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 501 रुपये प्रति 10 ग्राम होती तर चांदीची किंमत 89 हजार 60 रुपये प्रति किलो वर आली होती.
पाहूया देशातील इतर राज्यांमध्ये 7 जानेवारीला सोन्याचे भाव काय होते.(22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम)
- मुंबई -70,638 रुपये
- पुणे-70,638 रुपये
- नागपूर -70,638 रुपये
- कोल्हापूर-70,638 रुपये
- जळगाव-70,638 रुपये
- ठाणे-70,638 रुपये
भारतातील प्रमुख शहरात (24कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम) इतके भाव झाले कमी.
- (मंगळवार 7 जानेवारी आणि सोमवार 6 जानेवारी मध्ये दरांचे अंतर)
मुंबई 77,060रुपये -77,570 रुपये
पुणे 77,060रुपये -77,570 रुपये
नागपूर 77,060रुपये -77,570 रुपये
कोल्हापूर 77,060रुपये -77,570 रुपये
जळगाव 77,060रुपये-77,570 रुपये
ठाणे 77,060रुपये-77,570 रुपये.
भारतातील या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 7 जानेवारी रोजी प्रती 10 ग्रॅम तब्बल 510 रुपयांपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळाले.