Gold Rate Gudi Padwa : आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केट आणि अमेरिकन आर्थिक धोरण बदलल्याने सोन्याच्या दरात अख्या जगात आर्थिक परिणाम होताना दिसत आहे.भारतात तर गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात रिकॉर्ड कायम करीत दरवाढ झालेली आहे.{Gold Price In India}.देशात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत असतानाचा सोने खरेदीदार ग्राहकांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.
तर आधीच Gold मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या इन्व्हेस्टरना सध्या फायद्याचे दिवस दिसत आहे.दरम्यान सोन्याच्या किंमतमध्ये वाढ होत असताना आता गुढीपाडवा आणि इतर सण त्योहार येणार आहेत.जर या दरम्यान ग्राहक सोन्याचांदीची खरेदी करण्याचा विचार करीत असेल तर पुढे सोन्या-चांदीच्या मार्केटमध्ये किमती संदर्भात नवे अदाज बांधले जात आहे.
देशात सोन्याच्या किमतीत मागील 2 महिन्यात मोठी वाढ झालेली आहे.भारतात दिड दशकात सोन्याच्या किमती सतत वाढत राहिल्या,यादरम्यान सध्या सर्वाधिक वाढ 2024- आणि 2025 च्या या आर्थिक तिमाहीत पाहायला मिळत आहे.
मात्र यामुळे आता सोन्याची नवीन खरेदी करावयाची आहे,अश्या ग्राहकांना या सोने दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसत आहे.मागील एकाच महिन्यात 24 Carat सोन्याची प्रति 10 ग्राम किमतीत 2 हजार 30 रुपयांची वाढ झाली आहे.
यामुळे सोने खरेदीदारांना हा आर्थिक झटका आहे.त्यांना सध्या सोने खरेदी करणे महागाचे ठरताना दिसत आहे.
आता सोन्याची किंमत झाली इतकी.
सोने चांदीच्या खरेदीविक्रीत महत्वाची भूमिका ही बुलियन मार्केटची असून 23 मार्च 2025 रोजी बुलियन मार्केटनुसार भारतात 24 carat सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 88 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहे.{Bullion Market}.
तर दुसरीकडे सोने दागिने 22 कॅरेट गोल्ड मध्ये बनविले जात असताना,सध्या 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रती 10 ग्राम 80 हजार 850 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
चांदीचे दरही झपाट्याने वाढत आहेत.
आता पुन्हा एकदा चांदीच्या किमतीमध्ये सुद्धा प्रतिकिलो वाढ झाली आहे.मागील काही काळात चांदीच्या गुंतवणुकीत इन्व्हेस्टर्सना मोठा फायदा झाला, ते याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे.
आता चांदी दरात पुन्हा वाढ होऊन प्रतिकिलो चांदीचा दर हा 98 हजार 80 रुपये वर पोहोचला आहे.विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी चांदीचा दर सध्याच्या तुलनेत कमी होता,पण मागील 2 महिन्यात याच्या किमतीत तेजी आलेली आहे.दरम्यान चांदीच्या दरात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सध्या सोने आणि चांदी खरेदीदार ग्राहकांनी योग्य वेळ साधून खरेदी आणि गुंतवणूक करण्याची वेळ आहे.
महाराष्ट्रात प्रमुख शहरात सध्याचे सोन्याचे दर.
भारतात तुम्ही चांदीच्या घरात वाढ होत असताना,आता महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये सुद्धा सोन्याचे किमतीत वाढ पाहायला मिळत आहे.राज्यात नागपूर,नाशिक,पुणे आणि मुंबई आणि इतर काही प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास सारखेच दिसत आहे.
सध्या महाराष्ट्रात या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 80 हजार 703 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 88 हजार 40 रुपयांवर पोहोचलेला आहे.मात्र सराफा मार्केटचे अनुमानानुसार प्रमुख शहरात या किमतीत काही अंतर असू शकतात.एकूणच या आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने महागाई दरात वाढ पाहायला मिळत आहे.
फेब्रुवारी महिन्यात झाली सोने किमतीत वाढीची सुरुवात.
सुरू असलेल्या या आर्थिक वर्षात सोन्या-चांदीच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजाराचा खूप फरक पडलेला आहे.WORLD GOLD MARKET मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक थांबली असताना,याचा थेट परिणाम भारतात दिसून आला. यामुळे भारतात सोने आयात कमी झले आहे.त्यामुळे एकूणच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सोन्याचे किमतीत मोठा बदल होताना दिसून आला.
- फेब्रुवारी 2024 च्या सुरुवातीला भारतात 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्राम 83 हजार 230 रुपयांवर पोचले होते.
- आता मार्च 2025 संपण्यात जमा असताना तब्बल एका महिन्यात सोने किमतीत प्रती10 ग्राम 2 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळत आहे.
- 23 मार्च 2025 दरम्यान 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 88 हजार 200 रुपये वर आलेली आहे .
- ही वाढ सोने चांदीचे खरेदीदार ग्राहक तसेच गुंतवणूकदारांसाठी जास्त खर्चिक झालेली आहे.
- दरम्यान दर आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच येणाऱ्या काही दिवसात याच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता सराफा मार्केटमध्ये वर्तुविल्या जात आहे.
Gold Rate Gudi Padwa : 22 कॅरेट सोन्यात दागिने बनविणेही महाग.
उल्लेखनीय म्हणजे 24 कॅरेट सोने हे 99.90% शुद्ध असल्याने याची खरेदी प्रामुख्याने गोल्ड इन्वेस्टमेंट साठी केली जाते.सोन्याचे दागिने तयार करताना मात्र सराफा मार्केटमध्ये ज्वेलर्स सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना 24 कॅरेट शुध्द सोन्यापेक्षा 22 कॅरेट सोन्यात दागिने बनविण्याच्या सल्ला देतात.
मात्र सध्या 22 कॅरेट सोन्याचे किमतीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे.{22 Carat Gold Price}त्यामुळे एकूणच सोन्याचे दागिने बनविण्यासाठी सोने दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसा खर्च करावा लागत आहे.
मात्र सध्याचे सोन्याचे दर हे भविष्यात स्थिर राहिल्यास किंवा यात वाढ झाल्यास एकूणच हे फायदा देणारे ठरणार असल्याचे आर्थिक क्षेत्रात बोलले जात आहे.
सोन्यात गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरणार?
दीड दशकात भारतात सोन्याचे किमतीत मोठी वाढ झाली आहे.यामुळे देशभरात गोल्ड इन्वेस्टर्स यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.{Gold Investors In India}.सोबतच गोल्ड इन्वेस्टमेंट कंपन्यांची चांदी होताना दिसत आहे.{Profit Of Gold Investment Companies}.
सध्या ग्लोबल इकॉनोमिक सिस्टम मध्ये आलेली अस्थिरता,अमेरिकन डॉलरच्या किमतीत येणारे चढ-उतार {US Dollars} आणि महागाई दर या कारणामुळे सोन्याच्या एकूणच सोने किमतीवर परिणाम होताना दिसत आहे.
याचे दर स्थिर राहिले किंवा याच्यात आणखी वाढ झाली तर दीर्घकालीन गोल्ड इन्वेस्टमेन्टसाठी ही योग्य संधी मानली जात आहे.कारण सतत दरवाढ ही सोने खरेदी आणि यात इन्व्हेस्टमेंटसाठी फायदा देणारे ठरणार आहे.