Gold Rate Decrease : सोना, तू हसविणार की रडविणार रे ! जाणून घ्या, आणखी किती कमी होईल सोन्याचे दर !

Gold Rate Decrease : स्वतः जवळ सोन्या चांदीचे जवाहिरात असणे, सोन्यात पैसा गुंतवणूक करून भविष्यात याचे दर वाढण्याची अपेक्षित भरपूर सोना खरेदी करणे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र गेल्या काही काळात सोन्याच्या किमतीमध्ये कधी अचानक वाढ होते, तर कधी मोठी घसरण होत आहे.

सतत सोन्याच्या किमतीमध्ये होत असलेल्या चढउतारामुळे आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आणि सोने चांदी खरेदी करणारे ग्राहक चिंतेमध्ये आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

उल्लेखनीय म्हणजे वर्ल्ड गोल्ड मार्केटमध्ये नियमित असलेली अस्थिरता,सोन्या चांदीच्या व्यापारात सर्वात मोठा निवेशक आणि निर्यात करणारा देश असलेल्या अमेरिकेमध्ये बदललेली आर्थिक धोरणे,आणि आंतरराष्ट्रीय चलन विनिमय दरात झालेले बदल, या सर्व कारणांमुळे मागील दीड ते दोन वर्षात सोन्याचे किमतीवर विविध वेळी परिणाम होताना दिसत आहे.{Gold Rates In India}

आता भविष्यात सोन्याचे किमतीमध्ये किती वाढ होईल आणि किती घसरण होईल,सोने खरेदी करणे परवडणार की विकणे पडवडणार याबाबत सध्या संभ्रमाची स्थिती आहे.

त्यामुळे सोना आता भविष्यात रडविणार की हसविणार,याबाबत सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक चिंतेत दिसत आहे.चला तर पाहूया सोन्याचे दर आणखीन किती वाढतील की याची किंमती आणखी कमी होतील…आणि यात गुंतवणुकीत फायदा होणार की नुकसान? {Gold Rate Today}

सध्या जगभरात सोन्याच्या किमतीमध्ये अचानक होत असलेल्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि सोने खरेदी विक्री करणारे ग्राहक चिंतेत दिसत आहे.{Gold Investors}जागतिक बाजारात या संदर्भात आलेली मंदी आणि आंतरराष्ट्रीय धोरणात बदल झाल्यामुळे एकूणच सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम झाल्याचे या क्षेत्रातील विशेषज्ञ सांगत आहे.

विशेष म्हणजे 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय सोना दरावर नजर ठेवणारी स्पॉटगोल्ड ने 2 हजार942.70 US डॉलर प्रति औंस असा विक्रमी उच्चांक गाठला होता.

यामुळे सोन्याची किंमत 0.1 टक्क्यांनी घसरून 2 हजार 904.87 डॉलर प्रति औंसवर आली. या घसरणमुळे भारतीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात मोठा परिणाम दिसून आला आहे. 12 फेब्रुवारी 2025 रोजी देशात सोन्याचा दर तब्बल 650 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला होता.

हे आहेत सोन्याच्या दर घसरण्याचे प्रमुख कारण.

भारतात सोने चांदी खरेदी करणे विशेषकर सोन्यात गुंतवणूक करणे आवडले जाते,याचे कारण म्हणजे यापूर्वी सोन्याच्या दरात सतत होणारी थोडीफार वाढ हे गुंतवणूकदारासाठी फायद्याच सौदा ठरते.

मार्केट मध्ये सोन्याचे किमती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने चांदीच्या आयात निर्यात आणि त्याच्या किमती हे यासंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींवर अवलंबून राहते विशेष म्हणजे भारत देश हा जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे.

{Gold Import In India}याचे कारण म्हणजे भारतात सोन्याचे अंतर्गत उत्पादन फार कमी आहे.यामुळे देशात सोना विदेशातून आयात होते.मात्र जागतिक मार्केटमध्ये जर सोन्याच्या दरात थोडाही परिणाम झाला किंवा दरात घट झाली,तर याचा भारतात सोने मध्ये गुंतवणूकदार आणि सोने खरेदी विक्री करणाऱ्या ग्राहकांवर थेट परिणाम होतो.

सध्या अमेरिकन डॉलर भारतात मजबूत आहे त्यामुळे दुसरीकडे सोने गुंतवणूकदारांना भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या व्यवहारात नफा बुकिंग झाला आहे.

यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार ते भारतातील सोने मार्केट मध्ये सोन्याची किमती घसरताना दिसत आहे.अमेरिकन फेडरल रिझर्व इंटरेस्ट पॉलिसी मुळे इन्वेस्टर्स कॅश इन्व्हेस्टमेंट कडे वळले आहेत.

यामुळेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी सध्या कमी झाली असल्याचे बोलले जात आहे.यामुळे याच्या किमती घसरताच भारतातील या धोरणाचा परिणाम सोने किमतीवर दिसत आहे.

इंटरनॅशनल गोल्ड मार्केटमध्ये सोन्याचे किमती वर हे घटक टाकतात थेट प्रभाव.

इंटरनॅशनल गोल्ड मार्केटमध्ये सोन्याचे किमती वर अनेक असे घटक आहेत,जे थेट प्रभाव टाकतात. सोन्याचा जागतिक पुरवठा आणि सोन्याची मागणी यामधील आलेला बदल याच्या किमतीवर परिणाम टाकतात.वर्ल्ड मार्केटमध्ये जशी सोन्याची मागणी वाढली, तर सोन्याची किमती वाढत जातात.{World Gold Market}या उलट सोन्याचा पुरवठा जास्त झाला तरीही याच्या किमती घसरतात.

यामुळे भारतात सोने खरेदी विक्री व्यवहार आणि किमतीत फरक होऊन किमती घसरत जातात. भारतात डॉलरचा एक्सचेंज रेट हा महत्त्वाचा घटक मानला जातो. US डॉलर महाग झाला आणि रुपयाचे चलन कमकुवत असेल,तर इंडियन मार्केटमध्ये गोल्ड रेट वाढत जातात.या उलट जर डॉलरची किंमत घसरली आणि रूपया मजबूत होताच सोन्याच्या किमतीही कमी होतात. मात्र सध्या युएस डॉलर मजबूत असल्याने सोन्याच्या दरात चढ होताना दिसत आहे.

भारतात सोन्याच्या आयातीत कस्टम टॅक्सचा परिणाम.

उल्लेखनीय म्हणजे सोन्याच्या दरावर भारत सरकार कडून लागू करण्यात आलेले आयात शुल्क आणि इतर टॅक्स पॉलिसीचा स्थानिक सोने बाजारावर परिणाम होताना दिसतो.भारतीय सरकारने आयात शुल्क वाढवताच देशात सोने महाग होताना दिसते.जर शुल्क कमी झाला तर याच्या किमतीत घट होते.

याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे राजकीय आणि आर्थिक व्यवहार सुद्धा सोन्याच्या दरावर परिणाम करत असतात. मागील काही काळात जगात ‘रशिया युक्रेन युद्ध’तर दुसरीकडे ‘अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर’ यामुळे इन्वेस्टर पारंपरिक आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणुकीकडे वळत आहे.

यामुळे मागील काही काळात सोन्याचे किमती वाढल्या. मात्र जागतिक बाजारात स्थिरता येताच गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराकडे वळले तर सोन्याच्या किमती घसरतात असा गेल्या पाच वर्षाचा अनुभव आहे.

सगळ्या भारतात आहे इतके सोन्याचे दर.

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडीमुळे भारतात गेल्या काही काळात सोन्याच्या दरात चमकदार होताना दिसत आहे सध्या भारतीय बाजारात सोन्याचे दर खालील प्रमाणे आहे.{Gold Rate In India Toady}

24 कॅरेट सोने
प्रति 10 ग्राम 90 हजार 279

22 कॅरेट सोने
प्रति 10 ग्राम
83 हजार 162 रुपये

18 कॅरेट
सोने प्रति 10 ग्राम
68 हजार 42 रुपये.

14 कॅरेट सोने
प्रति 10 ग्राम
52 हजार 919 रुपये.

विशेष म्हणजे सोन्याचे हे दर सध्या इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन IBJA द्वारे जाहीर करण्यात आलेले आहे. मात्र भारतातील विविध शहरात लोकल टॅक्स आणि ट्रान्सपोर्टिंग खर्चानुसार किमतीत थोडाफार फरक पडतो.

Gold Rate Decrease : आता गुंतवणूकदार काय करू शकतात?

सोन्याच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणूकदारांसाठी भारतात पुढील काही आठवडे महत्त्वाची मानले जात आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणारे किटको मेटेलस् Kitco Metals चे विश्लेषक यांच्या मतानुसार सोन्याची किमती बाबत घसरण तात्पुरती आहे.गोल्ड इन्वेस्टरसनी नुकतेच अल्पकालीन नफा बुकिंग सुरू केल्यामुळे, बाजारावर याचा परिणाम दिसत आहे.{Profit Booking By Investors.}

यामुळे भविष्यात सोने किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे जागतिक स्तरावर महागाई दर आणि अमेरिकेकडून स्वीकार करण्यात आलेले व्याजदर धोरण हे सोन्याच्या किमतीवर प्रभाव टाकणारे असेल,असे मानले जात आहे.अमेरिकेमध्ये महागाई दर वाढला तर तेथील फेडरल रिझर्व्हला दर कपातीचा पॉलिसी स्वीकार करावी लागेल.यामुळे भविष्यात सोने किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

लॉंग टर्म इन्वेस्टर साठी गोल्ड Investment फायदेशीर ठरणार.

दरम्यान सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने लॉंग टर्म इन्वेस्टर साठी सोने किमतीमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा घेण्यासाठी हा निर्णय योग्य ठरणार आहे.{Profitable For Long Term Gold Investors}असे मानले जात आहे.

सध्या सोन्याची किंमत कमी असल्याने लॉन्ग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट लाभकारक संधी बनू शकते. मात्र गुंतवणूकदारांसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सतर्क राहणेही जरुरी आहे कारण सोन्याच्या किमतीमध्ये थोडीफार अस्थिरता short term investors नुकसानीत येवू शकतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.