Girish Mahajan यांनी सुरू केले C.D. मधील खुलासे,मलाअडकविण्यासाठी होता S.P वर सत्ताधाऱ्यांचा दबाव ?
राज्याचे कॅबिनेट मंत्री Girish Mahajan यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत एक मोठा खुलासा केला आहे. आपणास कायद्यात अडकाविण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्या निकटवर्तीयांसोबत गोपनीय माहिती काढण्याठी चर्चा केली होती,सोबतच जळगाव एसपी वर देशमुखांनी मोठा दबाव आणला होता. यासंबंधात त्यांच्या हाती आलेल्या सी.डी.मधील माहिती आता महाजनांनी सार्वजनिक केली आहे,त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ आहे.अनिल देशमुख यांनी महायुतीच्या नेत्यांमागे जासुस तसेच दबावतंत्र तर वापरले नाही ना अशी चर्चाही या निमित्ताने होत आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्यावर सीबीआयद्वारे बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्या वर गिरीश महाजन यांनी त्यांना मिळालेल्या सी. डी.चा संदर्भ देत लावला होता. या संपूर्ण प्रकरणात सीबीआयची चौकशी दरम्यान आता अनिल देशमुख यांच्यावर नवा मामला दाखल करण्यात आला.या निमित्ताने कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अनिल देशमुख यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव रचला होता त्यामुळेच आपणावर जळगाव जिल्ह्यातील निंभोरा येथे खूप दीर्घ काळानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते, असा खुलासासुद्धा मंत्री महाजन यांनी केला आहे.
सी. डी.मध्ये काय.
कॅबिनेट मंत्री देश महाजन यांनी त्यांना मिळालेल्या सीडी मध्ये असलेल्या माहितीचा संदर्भ देत माध्यमांना ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. महाजनांनी सी.डी.चा संदर्भ देत म्हटले आहे की,अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांचे पी.पी.प्रवीण चव्हाण म्हणाले होते की,जरी अनिल देशमुख जेलेमध्ये गेले, तरी त्यांना रेडकार्पेट ट्रिटमेंट मिळते. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका,फक्त देवेंद्र फडणवीस,गिरीश महाजन यांच्याविरोधात काही मामले असेल तर सांगा असं प्रवीण चव्हाण ने जळगाव चे पोलीस अधीक्षकांना विचारले होते,यामुळे गिरीश महाजन वर अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना धास्ती टाकण्याचा प्रयत्न तर करीत नव्हते ना? असा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आहे.
दबावामुळेच माझ्यावर तीन वर्षानंतर गुन्हे दाखल केले.
सी डी.तील माहिती नुसार मंत्री गिरीश महाजनांनी म्हटले आहे की,यामुळे अनिल देशमुख आणि त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केलं हे सिद्ध होताना दिसत आहे.या दरम्यान माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे तेव्हा गुन्हा दाखल करत नव्हते.महिनाभर थांबले. पुण्यात घटना घडली असताना 3 वर्षानंतर जळगाव जिल्ह्यात 650 किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबोरा येथे गुन्हा कसा नोंदवायचा हा प्रश्न एस.पी.समोर होता.यासाठी ते तयार नव्हते पण त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
खूप दडपण आणल?
“अनिल देशमुखांनी यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर खूप दडपण आणत त्यांच्यासोबत देशमुखांनी खूप खालच्या भाषेत वार्तालाप केला. त्यामुळे एसपी प्रवीण मुंडे आपणास याबाबत बोलले होते, त्यांच्यावर खूप दडपण आणलं जातय, निलंबित करण्याची धमकी दिली जातेय असे एसपी.मुंडे म्हणाले होते.असा दावा गिरीश महाजन करीत आपण स्वत: या संदर्भात अनिल देशमुख यांची तेव्हा भेट घेतली तेव्हा अनिल देशमुख यांनी स्वतःच हतबल असल्याचे आणि त्यांच्यावर पक्षाच्या व तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा दडपण असल्याचे म्हणाले होते.या संदर्भात कुणीही आता अनिल देशमुखांनी हे विचारू शकतात की, आपण किती वेळा देशमुखांना भेटले होते? त्यांनी सांगितलं होत की,याबाबत तुम्ही पवारसाहेबांना भेटा तरच मी तुमची काही मदत करु शकेन” असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी यावेळी केला.
दडपशाही कोणाची?
या संदर्भात गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा हवाला देत या प्रकरणात एकनाथ खडसे आणि शरद पवार यांचं नाव घेतलं आहे. एकनाथ खडसे वारंवार शरद पवारांकडे जात होते. त्यांनीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तेव्हा दबाव आणला” असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं अनिल देशमुख मला म्हणाले होते. त्यावर आपण म्हणाले होते की, “दडपशाही कोणाची आहे याची माहिती द्या.सोबतच आता अनिल देशमुख यांचे स्पेशल पी.पी.असलेले प्रवीण चव्हाण यांची सीडी समोर आल्याने यात त्यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करत आहेत, तर माझ्यावर गुन्हे दाखल व्हावे यासाठी दिलीप वळसे पाटील ऐकत नव्हते,अशी माहितीसुद्धा प्रवीण चव्हाण यांनी मला दिली असल्याची माहिती गिरीश यांनी सार्वजनिक केली आहे.