बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब
राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बाभुळगाव तालुक्यातील गणोरी येथे शंभर हून अधिक युवकांचा दि. 1 डिसेंबर रोजी गणोरी येथे झालेल्या एका उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला. भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदी व राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन गणोरी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश केला.
यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या युवकांमध्ये सुमित धारणे,पराग खुणकर,चेतन डडमल,चेतन फोफसे, मनोज नगतोडे,नरेश डडमल, शंकर कोडापे, तन्मय गोटे, हिमांशु फोफसे,तुषार फोफसे,पंकज आखरे, अनिकेत पिंगळे,सचिन फोपसे,करण गुघाने, प्रवीण बोबडे, आनंद मडावी,चेतन फाले,चेतन राऊत,पंकज घोडमारे,मनोज राऊत,प्रवीण पिंगळे,शुभम मिर्झापूर,धीरज जांभूरे,दिपेश कुंभेकार, साहील शेख, बबलू पठाण, सोहेल शेख, तेजस आखरे, गोलू कंगाले आदींचा समावेश आहे.
यावेळी आमदार अशोक उईके राळेगाव विधानसभा व प्रमुख, कृ उ.बाजार समितीचे संचालक.सतीश मानलवार, भा.ज.यू.मो.तालुका अध्यक्ष नितीन परडखे, भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अनिकेत पोहोकार, भाजपा कार्यकारणी सदस्य अजय वाकेकर,संजय राठी,किशोर दामेधर,सरपंच गणोरी सौ. रोशनी काळे, हनुमंतराव जगताप, सरपंच वरूड सदाशिव उरकुडे.
मनोज शेळके,अमोल अजमीरे, सरपंच पंचगव्हण सुभाष धोटे, संगीत काळे, गोपाल घोडमारे, सुरेश बोथरा, गुणवंत जांबूरे, निलेश माकोडे,चंद्रशेखर अलोने,देविदास राणे, अभिषेक लांबे ,अमन इंगोले, राणे,अक्षय शेळके,अक्षय चांदेकर, गितानंद बनकर, सोनु शर्मा शहर उपाध्यक्ष, योगेश चौधरी,सर्वेश मडावी, भाजपा तालुका प्रमुख सुमित इंगोले हे उपस्थित होते.