Gangster Marriage: कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ काला जठडी आणि लेडीज डॉन उर्फ अनुराधा चौधरी यांचे लग्न मंगळवारी 12 मार्च 2024 रोजी प्रचंड अशा सुरक्षा तैनातीमध्ये पार पडले. सोशल मीडियावर या ट्रेंड करणाऱ्या लग्नात वराती पाहुणे दुसरे कुणी नसून पोलीस खुद्द होते, ज्यांनी काला जठडी याला गंभीर अपराधाखाली अटक केली होती आणि तो सध्या तिहार जेलात आहे. दिल्लीतील तिहार जेलपासून पासून 8 किलोमीटर दूर असलेल्या द्वारका सेक्टर मधील एका फार्म हाऊसवर त्यांचे लग्न संपन्न झाले.
तर कोण आहे हा काला जठडी?
याला वर्ष 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हत्या, वसुली, अपहरण, लूट, दारूची अवैध तस्करी यासारखे 76 गुन्हे दाखल होते आणि तो सध्या दिल्लीतील तिहार जेलमध्ये बंद आहे. नंतर त्याने लेडी डॉन अनुराधा चौधरी हिच्याशी लग्न करण्यासाठीचे आवेदन पत्र दिले. लग्नासाठी त्याला सहा तासाची मुभा देखील देण्यात आली होती.
आणि लेडी डॉन नवरी कोण?
अनुराधा चौधरी ही राजस्थान येथील लेडी डॉन उर्फ मॅडम मींझ म्हणून देखील ओळखली जाते. राजस्थानचा डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदपाल सोबत ही काम करायची. परंतु त्याचा एन्काऊंटर झाल्यानंतर आनंदपालाच्या कामाचे सगळे सूत्रे अनुराधाने सांभाळले.
सध्या ती जेलमधून बाहेर आली आहे, आणि संदीप जठडीच्या कुटुंबीयांसोबत ती सोनीपत येथे राहत आहे. 14 ते 15 गुन्हे असलेल्या लेडी डॉन ने दावा केला आहे की, ती आता एक सामान्य गृहिणी आहे आणि अपराधाशी तिचा काहीही संबंध नाही.
लग्नाची विशेष तयारी अशा प्रकारे होती:
सध्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या संदीपला दिल्ली न्यायालयाने त्याच्या लग्नासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजताची वेळ दिली होती. कला जठडी आणि मॅडम मींझ यांचा विवाह 250 होऊन अधिक पोलीस आणि हायटेक शस्त्रे बाळगणारे विशेष तंत्र कमांडो तैनात असताना पार पडला. कोणतीही चकमक टाळण्यासाठी किंवा कला जठडी कोठडीतून पळून जाण्याची शक्यता टाळण्यासाठी कडेकोट व्यवस्था करण्यात आली होती.
असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले की, कार्यक्रमाच्या प्रवेश बिंदूवर दोन डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते आणि लग्नातील प्रत्येक उपस्थितांना त्यातून चेक करण्यात आले होते.
लग्न समारंभात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व पाहुण्यांना कार्यक्रमास्थळी प्रवेश करण्यापूर्वी बारकोड बँड देण्यात आला होता. वैध प्रवेश पास शिवाय कोणत्याही वाहनाला पार्किंग मध्ये परवानगी दिली जाणार नव्हती. या शिवाय लग्न समारंभातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनही कार्यरत होते.
काला जठडी आणि लॉरेन्स बिश्नोई यांचे संबंध :
जानेवारी 2020 मध्ये संदीप उर्फ काला जठडीला हरियाणाच्या भोंडसी तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि त्याची पावले वेगाने अंडरवर्ल्डकडे वळत होती. यादरम्यान त्याच्या बालपणीच्या मित्राने त्याला लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहरा या गुंडांशी भेट करावून दिली.
काला जठडी हा त्यांच्या कामाचा माणूस निघाला म्हणून पुढच्याच महिन्यात लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहरा यांनी त्याला फरिदाबाद कोर्टात हजर करण्यासाठी नेले असता पोलिसांपासून कालाची सुटका केली. काला जाठडी आता लॉरेन्स बिश्नोईसाठी खास बनला होता. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असताना काला जठडीने बिष्णोई टोळीचे नेतृत्व करत दिल्ली, राजस्थान आणि हरियाणातील काही भागात आपली सत्ता स्थापन केली.
गँगस्टरच्या आगामी लग्नाच्या बातमीने सुरक्षेच्या जोखमी बद्दल आणि कडक दक्षतेची गरज याविषयी चर्चा रंगली आहे. विशेषत: कडेकोट सुरक्षा, व्यवस्था आणि संभाव्य धोकांच्या प्रकाशात हाय प्रोफाईल गुन्हेगाराला पॅरोल मंजूर करण्याच्या परिणामाबद्दल अनेकांनी चिंता दर्शवली आहे.