Free Solar Chulha Yojana : महिलांना मिळणार 12 हजार रुपयांचे मोफत सोलर चुल्हा.

Free Solar Chulha Yojana : महिलांना मिळणार 12 हजार रुपयांचे मोफत सोलर चुल्हा.जाणून घ्या पूर्ण माहिती.देशात महिला सक्षमीकरणासाठी तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षण व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून सोलर पॅनल वर आधारित सौर चुल्हा योजना राबविण्यात येत आहे. केंद्राची ही खूप महत्त्वाची योजना असून देशातील घरेलु महिलांच्या जीवनात या निर्णयामुळे बदल होणार आहे. महिलांना 12000 रुपये पर्यंत मोफत सोलर चुळा या योजनेतून मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे देशात जुन्या काळापासून भारतीय महिला आपल्या स्वयंपाक घरात लाकडी आणि भुसा  जाळून स्वयंपाक बनवितात. यामुळे पर्यावरणाला नुकसान होतो.सोबतच  पारंपरिक इंधनाचा वापर करून  स्वयंपाक बनविताना महिलांना आरोग्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.पारंपरिक चुलींमधून निघणारा धूर हा महिलांच्या आरोग्यासाठीही घातक ठरतो. तसेच श्वसनविकार, डोळ्यांचे आजार आणि इतर अनेक आरोग्य समस्या चुळीतून निघणाऱ्या धुरामुळे होतात. शिवाय लाकूड आणि कोळसा  इंधनांचा वापर पर्यावरणाला हानिकारक ठरतो. त्यामुळे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सरकारने देशात सौर चुल्हा योजना सुरू केली आहे.यामुळे देशात पारंपरिक इंधनांचा स्वयंपाकासाठी वापर कमी होईल, सोबतच पर्यावरणाला पोचणारा नुकसान थांबेल असे केंद्र शासनाचे ही योजना सुरू करण्यामागे मानस आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सौर चुल्हा  एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सौर इंधन.

केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी सौर चुल्हा योजना  अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून यात चुळा हा सौर ऊर्जेवर चालणार उपकरण आहे. यात सौर ऊर्जा आणि विजेचा एकत्रित वापर केला जावू शकतो. विशेष म्हणजे सूर्यप्रकाश असताना सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो मात्र सूर्यप्रकाश नसतानाही विजेचा वापर करता येतो. ही या सौर उपकरणाची विशिष्टता असून दुहेरी ऊर्जा स्त्रोत मिळाल्यामुळे महिलांना स्वयंपाक करणे अधिक सुविधा जनक आणि  सुरक्षित होणार आहे. याव्यतिरिक्त सौर चूल सुलभतेने पेटवायला कमी वेळ लागतो,आणि हा पर्यावरण पूरक आहे.यामुळे वायू प्रदूषण ही टाळता येतो त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संरक्षणात वाढ होते याशिवाय जंगलतोडीतून मुक्तता मिळेल.

एकूणच देशातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात या योजनेचे योगदान राहणार असून गॅस सिलिंडर किंवा इतर इंधनांवर होणारा खर्च या चुल्ह्यामुळे वाचणार. सौर ऊर्जेचा वापर मोफत होत असल्याने कुटुंबाचाही आर्थिक भार कमी होवून यातून वाचलेला पैसा हा शिक्षण, आरोग्य आणि कुटुंबाची  इतर कामांसाठी वापरता येवू शकणार

महिलांचा श्रम ही वाचणार.

केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या या सौर चुल्हा योजनेमुळे महिलांचा वेळ आणि श्रम दोन्हीची वाचणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी लाकूड तोडणे, गोळा करणे, वाहून आणणे, चूल पेटवणे या कामांसाठी बराच वेळ जातो..या सर्व कामांतून मुक्तता मिळाल्याने महिलांना स्वतःच्या विकासासाठी अधिक वेळ देता येईल.वाचलेल्या श्रम आणि वेळेचा उपयोग महिला शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात करू शकणार.

योजनेचा लाभ घेण्यासाठी सुलभ अर्ज प्रक्रिया.

केंद्र शासनाच्या या सौर चूल्हा योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.यासाठी इंडियन ऑईल या शासकीय कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडून ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी महिलेचा आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला फक्त इतक्या  कागदपत्रांची आवश्यकता असते. विशेष म्हणजे देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने या सौर चूल्हा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे.देशात सर्व जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

महिलांमध्ये वळत आहे आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जागरूकता.

केंद्र शासनाच्या सौर चूल्हा योजनेमुळे महिलांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढताना दिसत असून सौर ऊर्जेसारखे नवे तंत्रज्ञान वापर करण्याची संधी महिलांना मिळत आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या अधिक सक्षम बनत असून पर्यावरणपूरक असा हा सौर तंत्रज्ञान वापर देश विकासाच्या नवीन दिशेकडे जात असल्याचे प्रदर्शन या योजनेतून होत आहे.

केंद्र सरकार योजनेचा विस्तार करणार.

या सौर ऊर्जा आधारित प्रकल्पाचा केंद्र सरकार  विस्तार करून देहातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत याला पोहोचवून महिलांना फायदा पोहोचवण्याचे प्रयत्न करीत आहेत. यात भविष्यात सौर चुल्ह्यांची गुणवत्ता आणखी वाढवणे,किंमत कमी करून  देखभाल सेवा सुलभ करणे या दिशेने प्रयत्न होत आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four − four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.