Free Flour Yojana Maharashtra : महाराष्ट्रात महिलांना मिळणार मोफत पिठगिरणी,जाणून घ्या पूर्ण माहिती.

Free Flour Yojana Maharashtra : महाराष्ट्रात महिलांना आर्थिक निर्भर, स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी विविध योजना आखण्यात आले आहेत. राज्यात शेतकरी विद्यार्थी बेरोजगार उद्योजक यांच्यासाठी विविध योजनेसह महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांवर राज्य सरकार लक्ष देऊन त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून ही यंदाच्या बजेटमध्ये महिला आणि तरुणांसाठी व्यवसाय उभारण्यात मदत व्हावी यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

केंद्राकडून बेरोजगारांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देतानाच आता महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावा, यासाठी पीठ गिरणी सुरू करण्यासाठी विशेष अर्थसहाय योजना सुरू केली आहे.अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब महिलांना स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आता मोफत पिठाची गिरणी योजना (Free Flour Yojana) राबविणे सुरू केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यामुळे असता महिला आपल्या घरातून पीठ गिरणीचा व्यवसाय करू शकणार आहे. सरकारकडून ही योजना शंभर टक्के अनुदानावर महिलांसाठी राबवली जात असून पिठ गिरणी व्यवसायासाठी गिरणी मशीन खरेदी करण्यासाठी लाभार्थी महिलेला एक रुपयाही खर्च करण्याची गरज राहणार नाही. यासाठी संपूर्ण आर्थिक मदत सरकार करणार आहे.

सरकारचा मोफत पिठगिरणी योजनेचा हा उद्देश.

  • महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे.
  • ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • स्वयंपूर्ण भारताच्या उद्दिष्टांतर्गत कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावणे.

राज्यात ग्रामीण आणि  शहरी भागात लाखो सुशिक्षित महिला आहेत, पण त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही तर दुसरीकडे आर्थिकरित्या सक्षम नसल्याने ते स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे महिलांची आर्थिक स्थिती दयनीय राहते.गरिबीत असल्याने महिलांना आपल्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करणे महिला शेतात जाऊन काम करणे दुसऱ्याच्या घरी जाऊन कपडे भांडी धुण्याचे काम करावे लागते.पण सरकारच्या या महिला आर्थिक सक्षमीकरण योजनेमुळे महिलांना लाभ मिळत आहेत.

पीठ गिरणी आर्थिक सहाय्य योजना हा त्याचाच एक भाग आहे.मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकणार आहेत. मोफत पीठ गिरणी योजना महिला बाल कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविली जात असून यासाठी महिलांना सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आहेत अटी व शर्ती.

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक निर्भर बनविण्यासाठी मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली असून यातून शहरी ग्रामीण भागातील आर्थिक रित्या दुर्बल महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी व शर्ती, योजनेमध्ये पात्रता आणि अर्ज प्रक्रिया ठरविली आहे. हे पूर्ण करून कोणतीही महिला योजनेचा लाभ घेऊ शकते.

ही आहे पात्रता (Scheme Eligibility)

ज्या महिलांना मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने काही पात्रता ठरवून दिले आहे. त्यानुसार योजनेत फक्त महिलाच अर्ज करू शकते.यात ग्रामिण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल.विशेष म्हणजे यात फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना लाभ दिला जात आहे.

या आर्थिक स्थितीमधील महिलांना लाभ

  • जी महिला यासाठी अर्ज करत आहे,त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या मर्यादेत (सामान्यतः 1 ते 2.5 लाख रुपये दरम्यान उत्पन्न असावा).
  • ती महिला स्वयं-सहायता गट (SHG) सदस्य असायला हवी.अर्थातच अर्जदार महिला बचत गटाची सदस्य असल्यास त्याला प्राधान्य दिले जाते.
  • अर्जदार महिलेकडे आधार कार्ड आणि शासकीयरित्या मिळालेला रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असेल.

या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे अर्ज स्वीकारल्या जाईल.संबंधित जिल्हा किंवा ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर महिलाना आपला अर्ज सादर करता येतो.अर्ज करताना सोबत आधार कार्ड, रहिवास प्रमाणपत्र, आर्थिक स्थितीचे प्रमाणपत्र,आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागते.आणि ऑफलाइन अर्ज हे स्थानिक पंचायत कार्यालय किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयातन अर्जाचे नमुने घेऊन त्याला भरून द्यावे लागते.अर्जासोबत पासपोर्ट साईज द्यावा लागतो.

अशी होते समोर कारवाई.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज केल्यानंतर महिलांना मोफत पीठ गिरणी योजनेतून आर्थिक लाभ देण्यापूर्वी विवेक पातळीवर अर्जाची सत्यापन प्रक्रिया केली जाते यात

  1. अर्जदारांची कागदपत्रे आणि आर्थिक स्थितीची सत्यता तपासणी
  2. पात्र महिला निवडण्यासाठी संबंधित समिती कडून चौकशी.
  3. अर्जदार महिला अनुसूचित जाती जमाती किंवा दुर्बल घटकातून असल्यास,
  4. तिच्या जात प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर ते प्रस्तुत करावे लागते.
  5. स्वयं-सहायता गटाचा (SHG) सदस्य असल्याचा पुरावा द्यावा लागते.

लाभ असा मिळणार?.

अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शासकीय स्तरावर त्याची सत्यता तपासून त्रुटी दूर करून लाभार्थी महिलांची निवड केली जाते.

अर्जदार महिलेच्या पात्रतेचे मूल्यांकन केल्यावर निवड करून मोफत पिठाची गिरणी पुरवली जाईल.

महिलांना गिरणीसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य दिले जाईल.
काही प्रकरणात पीठगिरणी खरेदीसाठी आर्थिक अनुदान किंवा अधिक रकमेची गरज भासल्यास अश्या महिलांना कर्ज सुविधा दिली जाते.

हे आहेत योजनेचे वैशिष्ट्य.

मोफत पीठ गिरणी योजनेमार्फत महिलांना मोफत पीठ गिरणी दिल्या जाते मात्र काही ठिकाणी यासाठी नोंदणी शुल्क महिलांना भरावा लागते.गावपातळीवर महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी मदतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.अर्जदार महिलांना आपल्या गावात किंवा नजीकच्या ठिकाणी पीठ गिरणी सुरू करण्याचा सल्ला यात दिल्या जाते.यापूर्वी योजनेत महिला लाभार्थीची निवड ग्रामपंचायत स्तरावर अर्जाची छाननी केल्यावर,तेथील गरजू,आर्थिक दुर्बल महिलांना यात प्राधान्य दिले जाते.

ग्रामपंचायत कडून अर्जांची छाननी आणि पात्र महिलांची निवड झाल्यानंतर पुढील मंजुरीही योजनेच्या जिल्हा समितीकडून देण्यात येते. गरजू महिलांना याचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालय येथे आवश्यक ती शासकीय आणि तांत्रिक माहिती पुरविली जाते.तेथून यासाठी संबंधित सरकारी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याची माहिती सुद्धा देण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five × three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.