Fraud: दुग्ध उद्योजकाची 7 लाख 21 हजाराची फसवणुक.
Fraud: औरंगाबाद येथील ब्रोकरसह मुंबई येथील मिल्क सलायर्सवर उमरखेड पो स्टे ला गुन्हा दाखल.
उमरखेड प्रति: येथील नमस्कार अॅग्रो इंडस्ट्रिज या दुध उद्योजकाकडून वसई मुंबई येथील शिमला डेअरी इंडस्ट्रीज करीता दुध विक्रीचा करार केल्यानंतर उमरखेड येथून पाठविलेले दुधाचे टँकर दुसऱ्याच निखील मिल्क सप्लायर वसई मुंबई या डेअरीवर परस्पर विक्री करून सुमारे 7 लाख 21 हजार रुपये किंमतीचे दुध विक्री करून संबंधिताकडून नगदी रक्कम घेतली.
संबंधित दलाल उमेश देशमुख व निखील मिल्क सल्लायर यांनी संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार उमरखेड येथील नमस्कार अँग्रो इंडस्ट्रिजचे संदीप भट्टड यांनी पोलीस स्टेशनला दिल्यावरून दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील उमेश देशमुख नावाचा दुध दलाल याने उमरखेड येथील नमस्कार अँग्रो इंडस्ट्रिज या ठिकाणी जाऊन दि. 16 नोव्हेंबर रोजी दुध विक्रीबाबत चौकशी केली.
त्यानुसार 6 1. 10 लिटर प्रमाणे दर निश्चित केल्यानंतर दि. 19 नोव्हेंबर रोजी दुधाचे टँकर वसई मुंबई येथील शिमला डेअरी इंडस्ट्रिज येथे पाठविण्यास सांगीतले तेथे दुधाचे टँकर खाली झाल्यानंतर दुधाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
असे सांगीतले त्यानुसार दि 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजताचे दरम्यान उमरखेड येथून सिमला डेअरीसाठी दुधाचा टँकर क्र. एमएच -10 डीआर 2o20 या टँकरमध्ये पहिल्या कप्प्यात 19 हजार 904 लिटर दुध याची किंमत 7 लाख 21 हजार 224 रुपये किंमतीचे तर दुसऱ्या कप्प्यात 10 हजार 430 लिटर दुध किंमत 6 लाख 37 हजार 273 या किंमतीचे दुध पाठविले होते. दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता सदर टँकर मुंबईत पोहचले.
त्यानंतर संबंधित दलालाने कुठलीही माहिती न देता सिमला डेअरी इंडस्ट्रिज ऐवजी निखील मिल्क सप्लायर वसई मुंबई येथे टँकरचा पहिला कप्प्यातील 7 लाख 21 हजार रुपये किंमतीचे दुध खाली केले. सदर दुध हे माझ्या स्वतः च्या डेअरीकडून विक्रीस आणले आहे तेव्हा हा प्रकार टँकर चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने सदर निखील मिल्क सप्लायरला शिमला कंपनीच्या बिलाची प्रत दिली.
असता विक्री केलेल्या दुधाची रक्कम आम्ही नगदी स्वरूपात दलाल उमेश देशमुख यास दिली असल्याचे निखील मिल्क सप्लायरचे मालक निखील कदम यांनी सांगीतले तेव्हा नमस्कार अँग्रो इंडस्ट्रिजचे मालक यांनी संबंधित दलाल उमेश देशमुख यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने मोबाईल बंद केला.
तेव्हा आपली 7 लाख 21 हजार रुपयांची संगनमताने दलाल उमेश देशमुख औरंगाबाद व निखील मिल्क सप्लायरचे मालक निखील कदम वसई मुंबई या दोघांनी फसवणूक केली असल्याने त्यांचे विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करावी अशी तक्रार नमस्कार अँग्रो इंडस्ट्रिजचे चे मालक संदिप भट्टड यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात एपीआय भरत चपाईतकर करीत आहेत.