Fire Accident: पुसद शंहरात अग्नितांडव दुकाने जळून खाक!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)*

Fire Accident: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी अं. ४ ते ५ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये तेथील ९ दुकाने जळून खाक झाली. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उत्तर दिशेला असणारी मसाला, हॉटेल, अंड्याची दुकान व इतर काही दुकाने यांना आग लागली व यामध्ये ९ दुकाने जळून खाक झाली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आग लागल्यानंतर तेथील नागरिकांनी त्वरित नगर.परिषद पुसद येथे याबाबत माहिती आणि माहिती मिळताच नगर परिषद पुसद येथील दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि तरी सुद्धा सदर आग आटोक्यात न आल्याने दिग्रस येथून सुद्धा अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. या आगीमध्ये ९ दुकाने पूर्णत: जळून खाक झाल्याने दुकान मालकांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे समजले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.