Farmers Protest, Bharat Bandh: शेतकरी संघटनेकडून ग्रामीण भारताला आज हॉलिडे!
शाळा, हॉस्पिटल, बँक सुरू राहणार की बंद.
Farmers Protest, Bharat Bandh: केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात याकरिता दिल्लीच्या सीमेवर असलेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने आज ग्रामीण भारत बंदचा आवाहन करण्यात आले आहे. बंद सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. या बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. राज्यभरात रास्ता रोको मोर्चा आणि बंद भारत आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी माहिती महाराष्ट्राच्या किसान सभेचे सरचिटणीस राजन शिरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. भाजप प्रणेते नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी विषयक धोरणातून शेतकरी उध्वस्त होत आहेत, कॉर्पोरेट कंपन्यांचं मात्र उखळ पांढरे होत आहे. अनेक दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलनात शेतमालाच्या हमीभावाचा हक्क देण्याचा कायदा पारित करण्याचा आश्वासन फक्त हवेत उरले आहे. उलट विदेशी शेतमालाची करमुक्त आयात करून कापूस, सोयाबीन शेतमालाचे भाव पाडले आहेत.
हमीभावाची किंमत शेतकऱ्यांना का मिळत नाही या सगळ्या प्रश्नांविरुद्ध भारतातील 542 पेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी एकजुटीने बनवलेल्या संयुक्त किसान मोर्चाद्वारे आज ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचा आवाहन करण्यात आलेलं आहे. शेतकरी संघटनांमुळे फक्त सरकारची डोकेदुखी वाढणार नसून सामान्य जनतेला देखील याचा सामना करावा लागणार आहे. कोणत्या प्रकारच्या सेवा सुरू राहणार आणि कोणत्या नाही याचा संभ्रम आजही सामान्य जनतेच्या मनात आहे.
भारत बंद मुळे वाहतूक सेवा खोळंबणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमुळे शाळा सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागातील संपूर्ण दुकाने बंद असतील तर मेडिकल स्टोअर सुरू असणार आहे. हॉस्पिटल आणि बँकांवर भारत बंदचा फारसा परिणाम होणार नाही. आज होणाऱ्या आंदोलनात वाहतूक चक्काजाम करण्याची घोषणा देखील दिली आहे. यामुळे फळ, भाजीपाला आणि दूध या व्यवसायांवर देखील परिणाम होण्याची आशंका आहे.
सिंधू आणि इतर बॉर्डरवरील व्यापार वर्गांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसणार आहे. फॅक्टरीतील मजुरांच्या रोजीत घट होणार आहे. काल चंदीगड मध्ये शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मध्ये तिसरी बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी संघटनांचे 14 नेते सहभागी होते तर सरकारकडून केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासमेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि इतर अधिकारी सहभागी होते.
या आधी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये दोन बैठका झाल्या परंतु त्यातून तोडगा निघालेला नव्हता. तिसऱ्या बैठकीतून मार्ग निघणार कि नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना तिसऱ्या बैठसकीतून देखील मार्ग मिळाला नसल्याची माहिती पंजाब मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. समोरची बैठक रविवारी होणार असून यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाणार आहे.