Farmer Scheme : केंद्र सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी योजनांची होणार घोषणा!

Farmer Scheme : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण नेमके काय म्हणाले?

देशातील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी आणि कृषी क्षेत्र अधिक समृद्ध व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमी नवनवीन योजना आणत असतात. आता केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध नवीन योजनांवर काम करीत आहेत, केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी नवीन आणि लाभदायी योजनांची घोषणा करू शकते. या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी सुद्धा माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शेतकऱ्यांचा कृषी उत्पादन आपल्या ठिकाणावरून इतर ठिकाणी आणि दुर्गम भागातही निर्यात व्हावा, त्यांना आपला कृषी उत्पन्न बाजारात पोहोचण्यासाठी मदत व्हावी,यासाठी केंद्र सरकार एका महत्त्वाच्या नवीन योजनेवर काम करीत असल्याचे कृषिमंत्री चव्हाण म्हणाले आहेत.नुकतेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (एईआरसी) च्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी या नवीन योजनेवर भाष्य केले.

सकल घरेलू उत्पादनात कृषी क्षेत्राचा 18 टक्के वाटा त्याला आणखीन मजबूत करण्यासाठी काम सुरू.

भारताच्या सकल घरेलु उत्पादनात (GDP) मध्ये कृषी क्षेत्राचा एकूण 18 टक्के वाटा आहे. जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा आणि उत्पादनाचा महत्त्वाची भूमिका आहे. आता शेती आणि शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती देवून कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी,केंद्र सरकार अनेक गोष्टीवर काम करीत असल्याचे कृषिमंत्री शिवराज चव्हाण म्हणाले आहे.

देशातील नैसर्गिक साधन संपत्ती वापरासाठी विवेक पूर्ण विचार आणि शेतीमध्ये घातक कीटनाशकांचा होत असलेला अंधाधुंद वापर थांबविण्यावर त्यांनी भर देताना म्हटले की,देशाला आता पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करावी लागेल.ही काळाचीही गरज झाली आहे.त्यामुळे नैसर्गिक शेतीला पूर्ण क्षमतेने पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

नदीजोड प्रकल्पांमुळे होणार शेतकऱ्यांना फायदा.

शेतीला पूरक सिंचन व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत याच उद्देशातून केंद्र सरकारने नुकतेच 25 डिसेंबरला देशात नदी जोड प्रकल्पांचा शुभारंभ केलेला आहे. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा होणार आहेत. वरील कार्यक्रमात कृषिमंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक सिंचनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन करताना म्हणाले की, शेती आणि सिंचनावर संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांचे काम आता शेतापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे.

त्यामुळे संशोधकांनी सुद्धा प्रयोगशाळपर्यंत मर्यादित न राहता ही दरी भरून काढण्याची गरज आहे.केंद्र सरकारच्या लक्षात ती आली आणि याचमुळे आता दूरदर्शनच्या किसान वाहिनीवर ‘आधुनिक कृषी चौपाल’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. हा असा एक व्यासपीठ आहे.जिथे शेतकरी, संशोधक,शास्त्रज्ञ एकत्र बसतात.त्यांच्यात,कृषी क्षेत्रामधील असलेल्या विविध समस्या आणि नवीन यात नवीन अश्या संधीं यावर विचारांची देवाणघेवाण होते. आता शेती आणि शेतकऱ्यांना संबंधात माहिती फक्त अंग्रेजी भाषेपुरते मर्यादित न राहता,देशातील वेगवेगळ्या भाषांमध्ये ती माहिती प्रकाशित करण्यात यावी, यावरही त्यांनी भर दिला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

three × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.