देशभरातील शेतकऱ्यांना आता Farmer Digital ID मिळणार ! जाणून घ्या पूर्ण माहिती ?

देशभरातील अकरा कोटी शेतकऱ्यांना आता युनिक डिजिटल आयडेंटिटी ( Farmer Digital ID ) मिळणार!

  • जाणून घ्या काय आहे फॉर्मर युनिक ओळखपत्र
  • एका क्लिकवर शेतकऱ्यांची ही कामे होणार.

भारताची कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे, देशातील सात टक्के ग्रामीण जनता आहे ग्रामीण भागात राहून शेतीवर आधारित उद्योग आणि शेती करते. देशाची अर्थव्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषीवर आधारित आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

जगात भारताकडून कृषी उत्पादन निर्यात आणि आणि देशात कृषीवर आधारित उद्योग आणि कृषी क्षेत्र,शेती करणारे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरावा,यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध वेळी शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान सबसिडीच्या योजना आणत असते.

11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार Farmer Digital ID कार्ड देशभरातील .

आता केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी 2025 या नवीन वर्षात महत्त्वाचा उपहार शेतकऱ्यांना देणार आहे. आता देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड सारखा 12 अंकी युनिक डिजिटल शेतकरी कार्ड मिळणार आहे.

या कार्डचे नाव आहे “फार्मर युनिक आयडेंटिटी कार्ड” ( Former Unique Identity Card ). देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना हा डिजिटल शेतकरी ओळखपत्र मिळणार आहे.केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची यामुळे डिजिटल ओळख निर्माण करण्यात येणार आहे.

देशातील प्रत्येक शेतकरीची डिजिटल ओळख आणि त्यांना सरकारी शेतकरी कृषी योजना,शेतकरी अनुदान आणि कृषी वर आधारित सबसिडी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी हा महत्त्वाचा कार्ड ठरणार आहे.या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी, शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यांसारखी अनेक कामं केली जातील.केंद्र सरकारने नुकतेच राज्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशात अनेक ठिकाणी फार्मर युनिक डिजिटल आयडेंटिटी कार्ड शेतकऱ्यांना देण्याची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात सुद्धा झालेली आहे.

Farmer Digital ID Card आधार सोबत जोडलेला असेल.

केंद्र सरकारकडून दिल्या जाणार युनिक आय कार्ड हा शेतकरी ओळखपत्र त्यांच्या आधारसोबत जोडलेली डिजिटल ओळख आहे. यात शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, तपशील, शेतात पेरणी केलेल्या पिकांची माहिती,शेत जमिनीच्या मालकीचा समावेश असेल.

या कार्डने शेतकऱ्यांची जमीन, गुरंढोरं आणि पेरलेल्या पिकांची माहिती नोंद होणार आहे. या कार्डमुळे कृषी मालाची बाजारात आणि सर्जरी किमान आधारभूत किंमत (MSP) आणि शेतकरी क्रेडिट कार्डसारख्या योजनांकरिता अर्ज करताना चौकशी आणि पडताळणीची प्रक्रिया सहज होण्यात मदत होईल.

Farmer Digital ID Card मुळे हे होणार शेतकऱ्यांना फायदे.

देशातील शेतकरीसाठी फार्मर युनिक आयडेंटिटी कार्ड हा डिजिटल आयडी म्हणून वापरात येणार आहे. विविध शेतकरी कृषी योजनांचा फायदा शेतकऱ्यांना सहज सोप्या पद्धतीने मिळावा,शेतकरी अनुदान,कृषी आणि यासाठी लागणाऱ्या साहित्याची सबसिडी, कर्जमाफी,शेतकरी कर्ज योजनांचा लाभ,विविध कृषी अनुदान पारदर्शीपणे शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये डीबीटी प्रणालीने मिळविणे सोपे होईल.सोबतच या युनिक डिजिटल आयडेंटिटी कार्ड मुळे शेतकऱ्यांची शेतीसाठी पीएम किसान योजना, पीक कर्ज योजना सहजरीत्या मिळविणे सोपे होईल.

एका क्लिकवर सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांची माहिती.

फॉर्म युनिक आयडेंटिटी कार्डाची विशेषता म्हणजे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांची माहिती एका क्लिकवर सरकारकडे येणार आहे. देशातील विविध राज्यात एकूण किती शेतकरी आहेत,याची आकडेवारी, त्यांच्याकडे असलेली एकूण शेती,राज्यातील एकूण कृषी क्षेत्र,शेत जमीन, शेत जमिनीचे दोष,विविध राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेला शेतकरी अनुदान लाभ,विविध सवलती, सबसिडी जमिनीचा पोत,खतांचा सप्लाय आणि खत अनुदान याची माहिती सरकारकडे अपडेट राहणार आहे.

पिकांवर रोगराई आणि हवामान बदलाची माहिती शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी महत्त्वाचा कार्ड.

फार्मर युनिक आयडेंटिटी कार्ड मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर आलेला रोग, कृषी कार्यालयासोबत या संदर्भात कनेक्टिव्हिटी,कृषी अनुसंधान लाभ आणि शेतकऱ्यांना मिळालेले कृषी अधिकारांचा त्यांना फायदा मिळावा, देशभरात कोणत्या राज्यात कसा हवामान आहे, हवामानात काय बदल होत आहेत,शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी,याची माहिती तात्काळ त्यांना मिळणार आहे.

सोबतच देशभरात जे लोक बोगस शेतकरी म्हणून सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेतात त्यांच्यावर या डिजिटल कार्डमध्ये आळा बसणार असून, शेतकरी योजनांमध्ये अधिक पारदर्शिता येणार आहे.ह्या सर्व बाबी पाहता एकूणचशेतकऱ्यांसाठी हा युनिक डिजिटल आयडेंटिटी कार्ड फार महत्त्वाचा राहणार आहे.

तीन टप्प्यात 11 कोटी ओळखपत्र शेतकऱ्यांना मिळणार.

केंद्र सरकार 2025 ते 2027 अशा तीन टप्प्यात देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना फार्मर युनिक डिजिटल आयडेंटिटी कार्ड देणार आहे.यात पहिल्या टप्प्यात 2024 -25 दरम्यान 6 कोटी शेतकऱ्यांना तर 2025-26 या दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी शेतकऱ्यांना तसेच 2026 -27 या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 2 कोटी, असे एकूण 11 कोटी शेतकऱ्यांना हे युनिक डिजिटल कार्ड देण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर Farmer Digital ID Card देण्याचे काम सुरू.

केंद्र सरकारने फार्मर युनिक डिजिटल आयडेंटिटी कार्ड शेतकऱ्यांना मिळावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये काम सुरू केले असून तेथील शेतकऱ्यांना हे डिजिटल कार्ड देण्यात येत आहेत लवकरच आसाम छत्तीसगड आणि इतर राज्यात यासाठी काम सुरू होणार आहे.

महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना हे कार्ड देणे सुरू झाले असून सोबतच उत्तर प्रदेश मध्ये फररुखाबाद, गुजरात मधील गांधीनगर हरियाणा मध्ये यमुना नगर तामिळनाडूमध्ये वीरेंद्र नगर पंजाब मध्ये फत्तेगड साहेब येथील शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर फार्मर युनिक डिजिटल आयडेंटिटी कार्ड वाटप करण्यात येत आहे.

 

 

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 + 11 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.