Fake Currency व्यवहारात चालविणाऱ्या दोघांना अटक.

दारव्‍हा: १०० व दोन हजाराची Fake Currency व्यवहारात चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई तालुक्यातील बोरी अरब येथे शनिवारी करण्यात आली. अजय ज्ञानेश्वर सोळंके (२२), किशोर अशोक भनारकर (२८) दोघेही रा. हातगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बोरी अरब येथील जयस्वाल वांच्या पानटपरीवर १०० रुपयांची व दोन हजारांच्या नकली नोटा आरोपीकडे मिळून आल्या.

पोलिसांनी तपासणी करून नकली नोटा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जप्त केले. आरोपींनी नकली नोटा जवळ बाळगून व्यवहारात उपयोग केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींनी नकली नोटा कोठून आणल्या, याचा तपास लाडखेडचे ठाणेदार स्वप्निल निराळे करीत आहे. ही कारवाई ठाणेदारांसह एलसीबीचे एपीआय गणेश वनारे, शालीक लड़के, उमेश शर्मा, रंजित गुरुनुले यांनी केली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

11 + eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.