Fadnavis Shinde Rift : CM Fadnavis यांचे कोणते आहेत ते 3 निर्णय ? ज्यामुळे बिघडले शिंदे सोबत सबंध.

Fadnavis Shinde Rift : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेपासून ते आतापर्यंत महायुती मधील प्रमुख नेत्यांमध्ये नाराजी नाट्य संपण्याची चिन्हे दिसत नाही.

नुकतेच विविध जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी महायुती मधील शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती.यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र Fadnavis यांच्या त्या 3 निर्णयामुळे CM Fadnavis आणि DCM एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची दरी खूप वाढलेली दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या गृहगावी दरेगाव येथे निघून गेल्याची चर्चा रंगली होती.मात्र एकूणच Fadnavis यांचे ते 3 निर्णय कोणते आणि शिंदे यांच्यानाराजीनाट्य मागे नेमकी inside story काय आहे,हे जाणून घेणे सर्वांसाठी उत्सुकतेचा मुद्दा ठरला आहे.

महाराष्ट्रात भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष यांची माहिती सरकारात येऊन एकूण दोन महिने झाले आहे, मात्र या दरम्यान महायुतीच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद आणि नाराजी सार्वजनिक होताना दिसत आहेत.

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील पालकमंत्री पदांची नावे घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री Fadnavis आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान पालकमंत्री पदांच्या नियुक्ती वर नाराजी दिसून आली.

राजकीय स्तरावर अशी चर्चा होते की उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजी आणि आक्षेपनंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्यात आली.

दावोस दौऱ्यावर असताना या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या पद नियुक्तीवर स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री Fadnavis यांच्यावर आली.कारण राज्यात जिल्ह्यातील पालकमंत्री पदांवर नियुक्ती करताना मुख्यमंत्री Fadnavis यांचे निर्देश आणि यानुसार पालकमंत्र्यांची यादी बनविण्यात आली होती.

यानुसार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे यांचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र यापूर्वी भाजप आणि एकनाथ शिंदे गटात विविध जिल्ह्यात पालकमंत्री पदांवर दावा केला जात असताना कुणाला कोणत्या जिल्ह्यातील पालकमंत्री पद हवा यासाठी खूप चर्चा झडल्या होत्या. आणि या दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्तीनंतर ही नाराजी सार्वजनिक होताना दिसली.

Fadnavis Shinde Rift : मुख्यमंत्र्यांचे विविध निर्णय बनले शिंदे यांच्या नाराजीचे कारण?

महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेल्या विविध निर्णयामुळे महायुतीमध्ये असलेले शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे.

2019 च्या निवडणुकीनंतर थेट भाजपसोबत हात मिळवणी करून शिवसेनेत बंडखोरी माजविणारे एकनाथ शिंदे सध्या भाजप पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सोबत जास्त सक्रिय असल्याचे दिसत आहे.ही बाब शिवसेना एकनाथ शिंदे गटातील इतर नेत्यांसाठी सुद्धा अस्वस्थ करणारी असल्याची चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांच्या विरुद्ध नाराजी येत्या काळात भाजपला सुद्धा जड जाऊ शकते अशी राजकीय चर्चा आता सुरू झालेली आहे.

शिंदे यांच्या नाराजी मागे मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिक्षण मंत्रालय परिवहन मंत्रालय आणि भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा हे तीन प्रमुख मुद्दे असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी शिक्षण मंत्री असलेले शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये असताना सर्व सरकारी शाळांमध्ये गणवेश पुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

तो निर्णय नव्या महायुती सरकार स्थापित होताच मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतला.जुना निर्णय फिरवून गणवेश खरेदीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री यांच्या अधिकारातून त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या या निर्णयावर स्थगिती दिली.

तर दुसरीकडे नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र परिवहन मंत्रालयाच्या एका निर्णयासंबंधात आपला नवा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळासाठी 1310 एसटी बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय शिंदे यांच्या मुख्यमंत्री काळात झाला होता.

मात्र एसटी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय झाल्यानंतर याच्या ठेके देण्याच्या संदर्भात अनियमितता झाल्याची शंका व्यक्त होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या या निर्णयावर स्थगिती दिली आहे.

या सोबतच शासकीय रुग्णालयांसाठी नवीन 900 रुग्णवाहिका खरेदी करण्याचा शिंदे सरकारच्या कार्यकाळात निर्णय झाला होता यातही बदल करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

सध्या महायुतीमध्ये असलेले एकनाथ शिंदे गोटात अशीही चर्चा आहे की मुख्यमंत्री फडणवीस या प्रकारे जर एकतर्फी निर्णय घेत आहेत.

सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा होत नाही,शिंदे सरकारातील निर्णय अशा प्रकारे एकतर्फी बदलले जात असेल,तर यातून जनतेमध्ये शिवसेने संदर्भात चुकीचा संदेश जात आहे.अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांची भावना असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय क्षेत्रामध्ये अशी चर्चा आहे की 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन मतभेद निर्माण झाले होते. त्यावेळी महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेला सामील करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे समोरासमोर होते.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत सत्तेत सामील न होता भाजपसोबत राहावे यासाठी त्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप आग्रही होते. पण या घडामोडीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध छान झाले होते.

शिंदे आणि फडणवीस यांच्यात संबंध बिघडल्याची चर्चा

शिवसेनेत 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून फडणवीस यांच्या मदतीने मुख्यमंत्री बनण्यात यश मिळविले. यानंतर मात्र शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा वापर सुरू केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यात संबंध बिघडल्याचे बोलले जात आहेत.आता फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री असून शिंदे यांच्या पेक्षा ते अजित पवार यांच्यासोबत जास्त सक्रिय आहे.

तर दुसरीकडे फडणवीस हे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील मागील निर्णय मागे घेत असल्याने महायुतीमधील या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये नाराजीचे नाट्य कसे संपेल किंवा राजकीय स्तरावर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी नवी घडामोडी तर होणार नाही?ना या शक्यतेवर राजकीय स्तरावर आता चर्चा होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

ten + 11 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.