जाणून घ्या कोणत्या मुगल सम्राटाच्या कबर देखभालीसाठी सर्वाधिक पैसा खर्च होतो ? | Expenses on the Tombs of Mughal Emperors

Expenses on the Tombs of Mughal Emperors : भारतात सध्या छावा  या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि मुगल भाषा औरंगजेब याचे ऐतिहासिक  पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चा सुरू आहे.एकंदरच भारतात मुघल काळामध्ये इसवी सन 1600 ते 1700 दरम्यान मुगल सम्राट आणि आलमगीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगजेब बादशाहने भारतात हुकूमत केली होती.

यादरम्यान दक्षिण भारत आणि दख्खन प्रांतात आपले साम्राज्याचे विस्तार करताना औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापित केलेल्या मराठा साम्राज्यात वर्चस्वाचा प्रयत्न मराठा साम्राज्याने हाणून पाळला होता.औरंगजेबाची क्रूरता आणि छत्रपती संभाजी राजे यांना ठार मारल्याने औरंगजेब हा देशात आक्रांता मुघल बादशाह म्हणून परिचित आहे.त्याचा मृत्यू तत्कालीन दख्खन आणि वर्तमान महाराष्ट्रात झाला होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्याच्या इच्छेनुसार औरंगजेब आलमगीर ची कबर आजही छत्रपती संभाजी  नगर शहरापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या खुलताबाद येथे अस्तित्वात आहे.{Tomb Of Aurangzeb In Khuldabad}.सध्या औरंगाबादच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्याची कबर आणि त्याच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चबाबत सुद्धा खूप चर्चा चांगली आहे.

त्यामुळे आतापर्यंत मुगल सम्राटापैकी कोणत्या मुघल सम्राटाच्या कबरीवर ASI {Archaeology Survey Department Of India}सर्वाधिक पैसा खर्च करण्यात येते याबाबत आपण या माध्यमातून जाणून घेऊया….

ऐतिहासिक  वास्तू आणि स्मारकांसाठी आर्किऑलॉजी सर्वे डिपार्टमेंट कडून देखभाल.

भारतात ऐतिहासिक वारसे,ऐतिहासिक  वास्तू आणि स्मारकांसाठी आर्किऑलॉजी सर्वे डिपार्टमेंट{ASI}कडून देखभाल केली जाते.आतापर्यंत खुलदाबाद येथील औरंगजेबच्या  कबरीच्या देखभालसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याची माहिती एका धार्मिक संघटने ने माहिती कायद्यानुसार काढली आहे.

या RTI नुसार वर्ष 2021 22 या वर्षात खुलदाबाद येथील औरंगजेबच्या मगबऱ्याच्या देखभालीवर 2 लाख 55 हजार 160 रुपये आणि 2022 आणि 2023 या आर्थिक वर्षात 2 लाख 6 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अर्थातच एकूण 3 वर्षात औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीवर एएसआय कडून 6 लाख 50 हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहे.

Expenses on the Tombs of Mughal Emperors : औरंगजेबाच्या कबरीसाठी 3 वर्षात साडेसहा लाख रुपये खर्च

सध्या महाराष्ट्रात मुगल सम्राट औरंगजेबच्या खुलताबाद येथील कबरीसंदर्भात वाद सुरू आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी काही सामाजिक आणि धार्मिक संघटना करीत आहेत,तर दुसरीकडे औरंगजेब हा क्रूर असा शासक मानला जातो,त्यामुळे या शासकाच्या कबरी व देखभालीसाठी सरकारने दरवर्षी मोठा खर्च केल्याचे आरटीआय मधून माहिती समोर आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे एसआय द्वारे भारतात  संरक्षित इमारतींची देखभाल कायद्यानुसार करणे या विभागाची जबाबदारी आहे,त्यानुसार या संदर्भात खर्च झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.उल्लेखनीय म्हणजे याच आरटीआय मध्ये असे सुद्धा उघड झाले आहे की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी ASI कडून देखभालीसाठी दर महिना 250 रुपये अदा करण्यात येतात.

केंद्र सरकारचे भारतीय ASI विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीसाठी 3 वर्षात साडेसहा लाख रुपये खर्च केल्याची बाब  आयटीआय मुळे समोर आलेली आहे.या आयटीआय माहितीनुसार अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे की,वर्ष 2021 आणि 22 या आर्थिक वर्षात औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीवर 2 लाख 55 हजार 160 रुपये आणि 2022 मध्ये 2 लाख 636 रुपये खर्च करण्यात आले आहे,मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि देशाची शान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या देखभालीसाठी दर महिन्यांनी फक्त 250 रुपये दिले जात आहेत.

आता आपण जाणून घेऊया,वास्तूंचे कोणत्या मुघल सम्राटच्या मकबरा आणि स्मारकांसाठी एएसआय कडून सर्वात जास्त पैसा खर्च करण्यात येते.

भारतात मुघल काळात अनेक ऐतिहासिक इमारती बांधण्यात आलेले आहेत.देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुघलकालीन इमारतींचा पुरातत्त्व खात्याकडून जतन केले जात आहे.या ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी दरवर्षी मोठा खर्च करण्यात येतो.

यात अनेक मुघल सम्राटांच्या कबरीचे देखभालीसाठी ASIकडून देखभाल खर्च होतो.

शेकडो वर्ष जुने असलेल्या ह्या वास्तू आणि मकबरे चांगल्या स्थितीत राहावे, यासाठी लक्ष देण्यात येते.यांच्या भिंतीमध्ये भेगा किंवा दुरुस्तीचे काम असले,तर दरवर्षी रंगरंगोटी आणि मरमतीचे काम केले जाते.यासाठी एएसआय कडून निधी पुरवला जातो.

  • आग्रा मध्ये जगप्रसिद्ध ताजमहल सोबतच आग्रा नजीक सिकंदरा येथे मुगल सम्राट अकबर  बादशहाची कबर आहे. तर जहांगीरची कबर रावी नदीच्या काठावर शहादा शहरात आहे.
  • याशिवाय मुगल सम्राट मयूंची कबर दिल्लीमध्ये
  • आणि औरंगजेब ची कबर महाराष्ट्रात संभाजीनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे अस्तित्वात आहे.

भारतात या मुगलसम्राटाच्या कबरीसाठी केला जातो सर्वात जास्त खर्च.

सध्या ASI द्वारे भारतात मुगल सम्राटांच्या कबरीच्या देखभालीवर एकूण किती खर्च झालेला आहे याची अधिकृत आकडेवारी सध्या उपलब्ध नसल्याची माहिती RTI द्वारे समोर आली आहे.{ASI Historical Tomb Maintenance Expenses}मात्र एका अंदाजा नुसार आतापर्यंत भारत सरकारने ASI द्वारे जगप्रसिद्ध वास्तू ताजमहलच्या संरक्षणावर सर्वाधिक जास्त निधी खर्च केला आहे.

दुसरीकडे आग्रा मध्ये मुगल सम्राट शहाजहान आणि त्याची बेगम मुमताज यांच्या कबरी आहेत. ताजमहलच्या संवर्धनासाठी एएसआय कडून दरवर्षी लाखो रुपये खर्च होत आहेत.

ASI च्या मागील काही खर्च रिपोर्टनुसार 2015-16 ते 2017-18 या वर्षादरम्यान आग्रा मध्ये ताजमहलच्या संवर्धन आणि सुरक्षितता तसेच पर्यावरण विकास कामासाठी या ठिकाणी 12 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्यात आले.

तर देशात इतर मुगल बादशाहच्या कबर आणि स्मारकांच्या देखभालीसाठी दरवर्षी सुद्धा लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen + eighteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.