EVM SCAM : महाराष्ट्रात भाजपचे नेते आणि भाजप हाय कमांड म्हणजेच केंद्रीय मंत्री अमित शहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि इतर वरिष्ठ भाजप नेत्यांचे निकटवर्ती मानले जाणारे “मोहित कंबोज” यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याचा पराक्रम केलेला आहे.
निवडणुकांमध्ये ईव्हीएम सेटिंग चे मुख्य सूत्रधार भाजप नेते मोहित कंबोज हेच असल्याचा आरोप माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत कंबोज यांच्यावर ईव्हीएम मशीन सेटिंग करून भाजपच्या जागा वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली होती,असा थरारक चित्र निर्माण करणारी माहिती आमदार जानकर यांनी दिली आहे.
यापूर्वी महाराष्ट्रात निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा करून महायुती सरकारने जागा जिंकल्या असल्याचा आरोप आ.जानकर यांनी केलं आहे.यात महायुती संदर्भात निवडणूक पूर्वी जनतेमध्ये असलेली नकारात्मक चर्चा, निकाला संदर्भात ईव्हीएम मधून मतमोजणीवर स्वतच्या अभ्यासातून वास्तविकता काय आहे, महायुती आणि अजित पवार शिवसेना शिंदे पक्षाला किती जागा मिळणार होत्या,बाबत विविध गंभीर विधाने आणि ईव्हीएम सेटिंग झाल्याचे विधान करून मार्कडवाडी गावात पुन्हा बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय, पोलिसांची दडपशाही आदी मुद्द्यांवर आमदार जानकर यांनी मागील एक महिन्यात आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे.
आता महाराष्ट्रात मतदान आणि मतदान प्रक्रियेत. भाजपचे मोहित कंबोज हे मुख्य सूत्रधार असल्याचे थेट आरोप करून निवडणुकांमध्ये मोठा ईव्हीएम सेटिंग घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.यासंदर्भात आमदार जानकर यांनी एक विशेष व्हिडिओ जारी करून पूर्वीपेक्षा जास्त गंभीर असे आरोप केलेले आहे.सोबतच महाराष्ट्रात झालेले EVM घोटाळ्या संदर्भात सबळ पुरावे शोधून याचा पूर्ण पर्दाफाश करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
EVM SCAM : कोण मोहित कंबोज? त्यांना कसे माहीत होते भाजप 120 जागा जिंकणार? का म्हटले होते “बोला था ना 120 आयेंगे”
यासंदर्भात आमदार जानकर यांनी जारी केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये भाजपचे मोहित कंबोज यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मोहित कंबोज कोण आहेत? ते राजकीय आहेत का, ते कधीही आमदार किंवा मंत्री झाले नाही,तरीही यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कंबोज प्रत्येक ठिकाणी ओरडून सांगत होते की भाजप 120 जागांवर निवडून येणार. यातून महाराष्ट्राला काय संदेश देण्याचे प्रयत्न झाले.
निकालाच्या दिवशी कंबोज यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आता मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना वर उचलून आनंद व्यक्त करताना त्या दोघांना म्हटले होते, क्या बोला था 120 आयेंगे, एवढा आत्मविश्वास कंबोजला कसा होता,असा सवाल आमदार जानकर यांनी करताना निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन मध्ये सेटिंग करण्याची पूर्ण जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावर सोपविण्यात आली होती ती त्यांनी पार पाडली, असा आरोप केलेला आहे.
या ईव्हीएम घोटाळ्याचा पडदाफाश करण्यासाठी आपल्याला किमान चार महिने लागतील आणि महाराष्ट्र माझ्यासोबत उभा राहील,आणि हे सरकार पडणार कारण ही अचानक आभाळातून पडली आहे, असा टोलाही आ. जानकर यांनी या व्हिडिओत लावला आहे.
आमदार जानकर यांच्या विधानाचे काय अन्वयार्थ?
ईव्हीएम मध्ये सेटिंग झाल्यामुळेच मोहित कंबोज हे मतमोजणीच्या दिवशी असे दावे करीत होते का? त्यांना माहीत होते की ईव्हीएम मध्ये सेटिंग झाल्याने भाजपसाठी 120 जागा जिंकणे आणि महायुतीसाठी हे निकाल सहज शक्य आहे? असा अर्थ आमदार जानकर यांनी केलेल्या या दाव्यातून निघत आहे.
सोबतच आमदार जानकर यांनी कंबोज यांना ईव्हीएम सेटिंग मुख्य सूत्रधार म्हटलेले आहे, या संदर्भात ते देत असलेली माहिती म्हणजे त्यांच्याकडे आता1 टक्के पुरावा आहे, यासंदर्भात पुढे 99 टक्के पुरावे बाकी आहेत असेही ते म्हणाले आहे,त्यामुळे आमदार जानकर यांच्याकडे या संदर्भात आणखी पुरावे आहेत का ?
कोणत्या आधारावर त्यांनी ही माहिती दिली, याचा पुढे महायुती मधील नेते तपास करतील का, आता विरोधी पक्षांची याबाबत आणखीन काय भूमिका राहणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.