ईरथळ येथे एका तरुणावर केला रानडुकराने हल्ला.
**चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी**
दारव्हा तालुक्यातील ईरथळ येथील, ८ डिसेंबर रोजी विनोद रतन जाधव हे शेतात, बकरीसाठी पाला अनन्यासाठी शेतात गेले असता भर शेताच्या मधात अचानक रानडुकराने यांच्यावर प्राणघात हल्ला करून त्यांना मोठ्या प्रमाणात जखमी केले व त्या हल्ल्यात त्यांच्या पायाला ११ टाचे पडले तर डोक्याला व हाताला डुकराने चावा घेतला.
यावेळी जखमी तरुण व्यक्ती विनोद जाधव यांनी ओरडण्याची हाक दिली, त्या हाकेला स्वार घेऊन त्यांच्या जवळ असलेला कुत्र त्या डुकरांच्या माघे सुहार झाला, तेव्हा रानडुकरा पासून सुटका झाली.व लगेच त्यांच्या बाजूच्या शेतात असलेले त्यांचे पुतणे अरविंद विश्वनाथ जाधव यांनी माहिती देऊन लगेच त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन गेले.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी शेतकरी व शेतमजुराची धास्तीचे वातावरण असुन रानडुकराच्या हल्ल्यामधील जखमींना तात्काळ वन विभागाका कडून आर्थिक मदत मिळण्यात यावी मधून वनविभाग यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतमजूर व शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.