Electricity Bill : घरगुती वीजग्राहकांना मोठा धक्का महावितरणने आणले नवे नियम !

Electricity Bill : महाराष्ट्रात आयटी सेक्टर मध्ये काम करताना वर्क फ्रॉम होम करणाऱ्या इंजिनियर्स, आयटी क्षेत्रातील इतर सर्व तंत्रज्ञ,डॉक्टर वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि इतर व्यवसायिक उद्योजकांसाठी महावितरणने चिंतेची बाब समोर आणली आहे.या सर्व क्षेत्रातील लोकांना वर्क फ्रॉम होम करताना कमर्शियल इलेक्ट्रिसिटी बिल देण्याचा निर्णय घेण्याची महावितरण तयारी करीत आहे.

यासाठी महावितरण नवीन नियमावली तयार केलेली आहे.सोबतच घरगुती टीओडी मीटर लावण्या संदर्भातही महावितरण नवे धोरण आणि नियमावली अशा वीज ग्राहकांसाठी लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते.मात्र महावितरणचे ही पाऊले सोलर पावर आधारित वीज पुरवठा करणाऱ्या क्षेत्रासाठी आणि याचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांसाठीही मोठी आर्थिक अडचणीची मानली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

एकीकडे केंद्र सरकार आणि पंतप्रधान सोलर पावर आधारित सूर्यघर योजना आणून सोलर पावर मधून वीज निर्मिती आणि विजेची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करून,सर्व क्षेत्रातील लोकांना आर्थिक दिलासा आणि पर्यावरण सुरक्षा देण्यासाठी पावले उचलत आहे,तर दुसरीकडे महाराष्ट्रात महावितरण कंपनी विजेचे दर महाग करून करणाऱ्या लोकांना आर्थिक चिंतेत टाकत आहे.

यामुळेच आता महावितरणच्या या निर्णय लागू होण्यापूर्वीच द सोलर सिस्टम इंटिग्रेटर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने विरोध सुरू केलेला आहे.महावितरण कंपनीचे असे धोरण केंद्र सरकारचे पंतप्रधान सूर्यघर योजनेसारखे सर्वसामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या बाबींवर हरताळ फसण्यासारखे आहे,असा आरोप वरील संघटनांनी केलेला आहे.

Electricity Bill : महावितरणच्या या नवीन नियमावलीला का होत आहे संघटनांचा विरोध.

महाराष्ट्रात महावितरण कडून आता प्रीपेड वीज मीटरची योजना बाजूला करून नवे स्मार्ट नेट मीटर वीज ग्राहकांना बसवून देण्यात येत आहे.सोबतच घरगुती आणि व्यवसायिक वीज ग्राहकांना टाइम ऑफ डे मीटर (T.O.D.)देऊन नवीन निकष लागू होणार आहे.+

यामुळे सर्व प्रकारचे वीज ग्राहकांना महावितरणच्या या नवीन वीज मीटर प्रणालीमुळे मोठा आर्थिक फटका बसणार असल्याची शक्यता विज क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि ग्राहक संघटना वर्तवित आहे.{Mahavitran TOD Meter Policy}

टीओडी मीटर प्रणालीमुळे वीज ग्राहकांचे विज बिल शून्य न होता आणि युनिट प्रमाणे कोणती सवलत न मिळता नेहमीप्रमाणेच विज बिल भरावे लागणार आहे,अशी भूमिका आता घेण्यात येत आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या सूर्यघर योजनेच्या मूळ उद्देशाला टीओडी मीटर लावण्याचा निर्णय महावितरणने घेतल्यानंतर मोठा धक्का बसत आहे.या टीओडी मीटर मुळे वीज ग्राहकांना सोलर पावर आधारित वीज आणि त्यावर सवलत मिळणे कठीण होईल,अशी भूमिका दि सिस्टिम इंटिग्रेटर्स असोसिएशनने घेतलेली आहे.

या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन वरील दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या या धोरणाचा विरोध करीत यामागील कारणेही स्पष्ट केलेली आहे.महावितरण कडून कमर्शियल इलेक्ट्रिसिटी बिल देण्यासंदर्भात आखण्यात आलेले धोरण आणि नवीन नियमावलीत नव्या जाचक अटी लादण्यात आलेले आहे.

या विरोधात न्यायालयात याचीका सुद्धा दाखल करण्यात आली असून येत्या 26 फेब्रुवारी पासून या याचिकेवर नाशिक पुणे मुंबई येथे सुनावणी सुद्धा होणार आहे.मात्र महावितरण कडून या सुनावणीत सहभागी होण्यासाठी वेबसाईट सुद्धा ऍक्टिव्ह करण्यात आली नाही,अशी माहिती या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

त्यामुळे आता महावितरणच्या या नव्या धोरणाविरुद्ध लवकरच मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस CM And Power Minister Devendra Fadnvis}उपमुख्यमंत्री अजित पवार {DCM Ajit Pawar}यांना भेटून निवेदन देत चर्चा करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eight − 7 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.