आता शेतीत Electric Tractor ,ई-पॉवर टिलर आणि ई-कटर. जाणून घ्या, सरकारचे नवे धोरण आणि शेतकऱ्यांचा फायदा! 

Electric Tractor : महाराष्ट्र सरकारने लोकतेच्या इलेक्ट्रिक मोटर वाहन धोरणात मोठा असा बदल केलेला आहे. त्यामुळे आता शेतीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारचे वाहनांना इलेक्ट्रिक वाहन बनविण्यात येणार आहे, सोबतच शेतीसाठी वापरात येणारे उपकरण सुद्धा लिथियम आयन बॅटरीवर चालणारे असेल.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि वेळेची बचत तर होईलच सोबतच शेतीचा काम सुद्धा सुलभ होणार आहे.या नवीन EV  धोरणामुळे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर इलेक्ट्रिक फवारणी यंत्रासह आता Battery वर चालणारा कटर आणि Electric पॉवर टिलर तसेच इतर इलेक्ट्रिक वाहन मिळू शकणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना शेती कामासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे.यावर त्यांना इंधन खर्च आणि इतर मेंटेनन्स खर्च कमी होण्याचे अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.महाराष्ट्र सरकारने नुकतेच पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून इलेक्ट्रिक वाहन  आणि उपकरणे शेती क्षेत्रासाठी कसे उपयोगात येईल,यावर विचार मंथन करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

प्रदूषण कमी करण्यात इलेक्ट्रिक वाहने महत्त्वाची भूमिका 

विशेष म्हणजे  देशात आणि महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यात येत आहे.वातावरणात कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक वाहने महत्त्वाची भूमिका अदा करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे.

विविध प्रकारचे इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावर धावत असताना आता शेतकऱ्यांसाठी शेती कामात लागणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर,टिलर आणि गटात सुद्धा आता इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी असेल.

यावर पर्यावरण मंत्री आणि सरकारने विचारपूर्वक आपल्या धोरणात शेती क्षेत्रासाठी वाहन आणि उपकरणांचा वापर करण्यासाठी या बाबींचा समावेश  केलेला आहे. सरकारकडून या संदर्भात आधीच्या शासन निर्णयात शुद्धिपत्रक सुद्धा  काढण्यात आले आहे.

Electric Tractor : Electric उपकरणांमुळे हे मिळणार शेतकऱ्यांना फायदे.

  • आता पुढे शेती कामासाठी शेतकऱ्यांकडून इलेक्ट्रिक वाहनांचा आणि उपकरणांचा समावेश केल्यास त्यांचा इंधन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊन पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभाव टाळता येणार आहे.
  • ग्रामीण भागात वातावरणात इंधन वाहनामुळे वायू प्रदूषणात घट आणण्यात आणि शेतकऱ्यांना सुद्धा  अशा उपकरणांचा वापर केल्याने आर्थिक फायदा होणार आहे.
  • इलेक्ट्रिक वाहने आणि उपकरणे यांच्यावर देखभाल खर्च कमी आणि कमी खर्चात ते जास्त वेळ चालत असल्याने EV वाहने आणि Electric Battery आधारित शेती उपकरणे वापर करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
  • महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार आता बॅटरीवर चालणाऱ्या वाहन आणि उपकरणांना खरेदी करणाऱ्या  शेतकऱ्यांना प्रोत्साहन स्वरूपात सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे धोरण राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
  • राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात आता बदल केल्याने आणि त्यात शेतकऱ्यांना समाविष्ट केल्याने आपल्या शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर, कटर आणि इतर इलेक्ट्रिक  उपकरणांचा वापर करण्यासाठी सरकारी स्तरावर आर्थिक मदत सुद्धा मिळेल.
  • यासंदर्भात राज्य सरकारकडून सबसिडी आणि अनुदान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.

ग्रामीण भागात शेतीसाठी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांमध्ये  स्वीकृती  वाढणार

सरकारच्या  मते इलेक्ट्रिक वाहन धोरणात आता शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक पद्धतीने चालणारे असल्याने आणि इतर शेती उपकरण इलेक्ट्रिक  बॅटरीवर आधारित असल्याने असे वाहन आणि उपकरणांमुळे वाहन प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल,सोबत स्वच्छ वायू मिळेल. 

या धोरणामुळे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने  वापरण्याची आवड निर्माण होऊन ग्रामीण भागात शेतीसाठी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांमध्ये  स्वीकृती  वाढणार आहे.

सरकारच्या इलेक्ट्रिक  वाहन धोरणात आता शेती क्षेत्राचा समावेश केल्याने, शेती कामात इलेक्ट्रिक वाहनांचा आणि इतर उपकरणांचा वापर वाढून शेतकऱ्यांना सुलभतेने आणि मिळून त्यांना आर्थिक फायदा तर मिळणारच आहे,सोबतच पर्यावरणाला सुद्धा लाभ होईल असे मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.