Electric Bill : AC चा भरपूर थंडावा घ्या आणि वीजबिल खर्चही कमी करा.ट्रिक जाणून घ्या !

Electric Bill : उन्हाळ्याच्या दिवसात इतर ऋतू पेक्षा जास्त घरगुती वीज वापरात येते. याचे प्रमुख कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवशी जास्त उकाळा होतो आणि तापमान ही वाढलेला असतो.यामुळे घरात आणि इतर ठिकाणी एअरकंडिशनर,पंखे आणि इतर थंडावा देणारे इलेक्ट्रॉनिक उपक्रम मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

त्यामुळे उन्हाळ्यात सर्वसामान्य दिवसांच्या तुलनेत जास्त युनिट खर्च होत असल्याने इलेक्ट्रिक बिल सुद्धा जास्त येते.उन्हाळ्याच्या दिवसात तर घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये एसी वापरणे सर्वसामान्य बाब झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

परंतु यामुळे मोठ्या प्रमाणात विज बिल वाढल्याने ही लोकांसाठी आर्थिक समस्या होऊन जाते. मात्र एअर कंडिशनर वापरत असताना,जर तुम्हाला विज बिल ही कमी करायचा असेल, तर यासाठी काही सोप्या टिप्स आहे….

हे Tips फॉलो करून विज बिल खूप कमी करता येते,तर जाणून घेऊया यासाठी काय उपाय आहेत…….?

जास्त तापमान-उन्हाळ्याच्या दिवसात सूर्यप्रकाश तीव्र असतो,यामुळे तापमान जास्त वाढतो आणि उकाडाही खूप होतो साधारणतः रात्री आणि दिवसात तापमान वाढलेलेच असते.

त्यामुळे गर्मीपासून वाचण्यासाठी एअर कंडिशनर वापरला जातो. मात्र यामुळे विजेचे युनिट सुद्धा वाढते आणि महिन्याच्या शेवटी जास्त बिल येते,यामुळे इतर दिवसांपेक्षा जास्त आर्थिक भार उन्हाळ्याच्या इलेक्ट्रिक बिल्समुळे येतो.

पण AC ही चालवायचा आणि वीज बिल ही कमी करायचे असेल,तर यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरून विज बिल कमी करता येतो.

AC सेट करा-घरात किंवा कार्यालयात असलेला एसी चा तापमान सेट केल्यानंतर विज वापर युनिट कमी करता येते. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या एसीचे तापमान किमान 25 ते 27 अंश सेल्सिअस डिग्रीवर सेट करा. कारण यामुळे प्रत्येक अंश कमी झाल्यास विजेचा वापर 6 टक्क्यांनी वाढू शकतो.

AC सुरु असताना Door,Windows बंद ठेवा-एअर कंडिशनर सुरू असताना आपल्या हॉलचे, बेडरूमचे आणि कार्यालयात असाल तर खिडकी,दरवाजे व्यवस्थितरित्या बंद ठेवाव्या.यामुळे आत मध्ये एसी सुरू असताना त्यातून निघणारी थंडी हवा बाहेर पडत नाही, आणि एसी कमी वीज दाबात एअर प्रेशर बनविण्यासाठी आणि थंड हवा देण्यासाठी काम करते.

पंखा सुरु असताना AC मधील हवा फिरते,वीज वापर होतो कमी- एसी सोबतच एखादा पंखा सुरू असल्यास एसी मधून निघणारी थंड हवा वेगाने त्या परिसरात फिरत जाते. यामुळे एअर कंडिशनर कमी Pressure मध्ये काम करते.आणि यातून विजेचा वापरही कमी होतो.

AC फिल्टर वेळोवेळी क्लीन करा-एसी मधील एअर फिल्टर स्वच्छ ठेवल्यास सुद्धा एसी कमी वीज दाबात जास्त काम करते. डर्टी एअर फिल्टर असल्याने एयर कंडीशन ची कार्यक्षमता कमी होऊन विजेचा वापर वाढतो.हे कारण पाहता आपल्या एअर कंडिशनरचा फिल्टर नियमित स्वच्छ करत रहा.

शक्य असल्यास Inverter AC सोबत जोडा-आपल्या घरात एसी वापरत असताना, डायरेक्ट वीज कनेक्शन न देता Invertor च्या माध्यमाने एअर कंडिशनर वापराल, तर पारंपरिक वीज खर्च पेक्षा कमी वीज खर्च होतो.एसी इन्वर्टरने जुळला असल्याने त्याचा तापमान स्थिर असतो,आणि तो एसीला वारंवार बंद किंवा सुरू करत नाही,यामुळे विजेची बचत होऊ शकते.

सूर्यप्रकाश कमी करा-घरात किंवा कार्यालयात एअर कंडिशनर सुरू असताना, हवा तेवढा सूर्यप्रकाश कमी केल्याने विज खर्च कमी होतो.उन्हाळ्यात दिवसामध्ये हॉल बेडरूम किंवा कार्यालयात हवा तेवढा सूर्यप्रकाश कमी करा, यासाठी खिडकी दरवाज्यावर पडद्यांचे वापर करा.एसी सुरू असताना यामुळे वातावरणात थंडावा असतो.यामुळे एसी कमी प्रेशर ने काम करते.

घरातील इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा-एअर कंडिशनर चालू असताना गरज नसेल, तर इतर सुरू असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद केल्याने एसी कमी प्रेशर मध्ये काम करते,कारण एसी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरू असताना यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्या परिसरात उष्णता काही प्रमाणात निर्माण करतात,यामुळेही एसीला अधिक काम करावे लागते.

AC ची नियमित सर्विस करा-एअर कंडिशनरची अबाधित सेवा आणि योग्य प्रमाणे थंडावा घेण्यासाठी एसीची नियमित सर्विस केल्याने त्याची कार्यक्षमता वाढते, आणि यातून विजेचा वापर कमी होण्यास मदत मिळते.

गरज नसताना जास्त वेळ एसी चालवू नका-जेव्हा एसी सुरू असते आणि थोड्या काळानंतर तेथील वातावरण थंड होऊन जाते, त्यावेळी एअर कंडिशनर काही वेळेसाठी स्विच ऑफ करू शकता.यामुळे जोपर्यंत वातावरण थंड आहे, आणि या दरम्यान एसी बंद असल्याने विज बिल आणि वीज युनिट खर्च कमी होण्यास मदत मिळते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

8 − 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.