*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*
Election Results: आज देशामध्ये तीन राज्याचा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या बाजून जनताजनार्दनांनी कोल दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय झाला त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा पवार यांच्या समर्थकांनी नायगाव शहर येथे हेडगेवार चौकात भाजपा शहराध्यक्ष माधव शंकरराव पा. कल्याण यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवून घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.
त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघा तर्फे तिन्ही राज्याच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करून धन्यवाद देण्यात आले. यावेळी नायगाव तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे, श्रीहरी देशमुख, देविदास पा. बोमनाळे, बाबासाहेब हंबर्डे, प्रकाश पा. हेंडगे, राजु अप्पा बेळगे, गंगाधर पा.कल्याण, अवकाश धुपेकर, धनंजय पा. जाधव, जुनैद पठाण, दत्ता पा.नारे, प्रदिप देमेवार, ओमकार पांचाळ व भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.