Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी?

विधानसभा निवडणुकीत मागील आमदारांपेक्षा जास्त आमदार जिंकल्यानंतरही भाजपच्या संख्याबळ पाहता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला महायुती 2.0 सरकारात मुख्यमंत्री पदा समोर नांगी टाकावी लागली आहे. भाजपकडे 132 आमदार संख्या असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्यापूर्वी महायुतीत असलेले आणि पूर्वी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडून उप मुख्यमंत्री पद स्वीकारले आहे. मात्र या सरकारात आपल्या पक्षाला महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आटोकाट प्रयत्न करीत आहे. यात आता डीसीएम एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील पाच नवीन आमदार चेहऱ्यांना घेऊन नवीन राजकीय खेळ मांडणार असून मंत्रिमंडळ विस्तारात या पाच आमदारांना मंत्री पदाची संधी देऊन नवा डाव आखणार आहे. यात यात शिवसेना पक्षाला महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नवीन राजकीय डावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही राज्यात पूर्ण कॅबिनेट अर्थातच संपूर्ण मंत्रिमंडळ गठन झाले नाही. या दरम्यान महायुतीमध्ये तिन्ही पक्षात असलेले आमदारांनी वरिष्ठ नेते, या पक्षातील विधान परिषद असलेले सदस्य सुद्धा मंत्रिपद मिळावा यासाठी आपल्या राजकीय गॉड फादर कडे लॉगिन करताना दिसत आहे.

यात महायुती सरकारात महत्त्वाचे पक्ष असलेले शिवसेना पक्षाचे नेते आणि नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन राजकीय डाव मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान भाजप समोर टाकू शकतात. यासाठी एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून पाच नवीन आणि युवा आमदारांना मंत्रिपदाचा मोका देण्यात येणार आहे. अद्याप शिवसेनेकडून या नावांची सार्वजनिक घोषणा झाली नाही मात्र येत्या 14 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे यावेळी हे नवीन चेहरे कोण आहेत हे समोरील.

गेल्या रात्रीच्या बैठकीत काय घडलं.

महायुतीमध्ये तिन्ही पक्षात खाते वाटप आणि मंत्रीपदावरून जोरदार आणि गरमागरम चर्चा आणि राजकीय लागेबांधे वापरून मंत्रीपद घेण्यासाठी आमदारांमध्ये स्पर्धा दिसत आहे. 14 डिसेंबरला कॅबिनेट एक्सटेंशन होणार आहे यापूर्वी 9 डिसेंबरच्या रात्री सीएम देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही डीसीएम एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कुणाला कोणते मंत्रीपद आणि कुणाला खाते यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली यात मंत्रिमंडळ आणि खात्याच्या वाटपावरून तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर आली आहे. यानुसार मंगळवारी सुद्धा महायुतीच्या नेत्यांमध्ये खातेवाटप संबंधात बैठकी झाल्या मात्र यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात समावेशातून डच्चू मिळणार हे पक्के झाले. त्यांच्या जागी एकनाथ शिंदे यांनी नवीन निवडून आलेल्या पाच आमदारांना मंत्रीपद देण्यासाठी निर्णय घेतले आहे. मात्र सध्या ते आमदारांची नावे शिवसेना शिंदे गटाकडून समोर आली नाही. मात्र तिने त्यामध्ये गेल्या रात्री झालेल्या बैठकीत या आमदारांना मंत्री करण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती ही राजकीय सूत्रांनी दिली आहे.

संभाव्य मंत्री म्हणून या नावांची चर्चा.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मागील पेक्षा जास्त आमदार मिळाले आहे त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात काही नव्या आमदारांची वर्णी लागणार आहे. तर यापूर्वी म्हणजे राहिलेले अनेक लोकांचा पत्ता यंदा करणार आहे यात वादग्रस्त विधाने आणि अनैतिक आचरण संदर्भात आरोप झाल्याने यासंदर्भात भाजप हाय कमांडच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे हे माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करणार नाही ही पुरेपूर शक्यता असल्याची चर्चा आहे. नव्या मंत्रिमंडळात आधीच्या सरकारात मंत्री असलेले शिवसेना शिंदे गटातील गुलाबराव पाटील,उदय सामंत शंभूराजे देसाई दादाजी भुसे,तानाजी सावंत दीपक केसरकर हे पुन्हा मंत्री बनू शकतात यांच्यासोबतच आता या पक्षातील भरत गोगावले संजय शिरसाट, अर्जुन खोतकर,प्रताप नाईक, आणि विजय शिवतारे या आमदारांना मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

यात शिंदे यांचा नवा डाव कोणता?.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात यावेळी अनेक नवे आमदार निवडून आले आहे. पक्षाचे भरत गोगावले हे कोकणातील प्रमुख नेते आहेत, त्यामुळे कोकणात शिवसेना शिंदे पक्ष वाढविण्यासाठी त्यांना यावेळी मंत्रीपदाचा लाभ देण्यात येईल,तर दुसरीकडे अर्जुन खोतकर आणि संजय शिरसाठ हे मराठवाड्यातील शिंदे गटाचे नेते आहेत, पक्ष विस्तारात मराठवाड्यामध्ये हे नेते महत्त्वाची मदत करू शकतात.तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील विजय शिवतारे हे प्रमुख नाव आहे.आणि प्रताप सरनाईक हे ठाणे भागात शिवसेना शिंदे गटातील प्रभावी नेते आहेत.हे आमदार म्हणून आता विधानसभेत असताना त्यांना मंत्रिपदासाठी मोका देऊन एकनाथ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाला त्यांच्या भागात मजबूत करण्यासाठी नवा राजकीय डाव मंत्रिमंडळाच्या विस्तारातून करताना दिसत आहे.

तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता शिवसेना शिंदे पक्ष यासाठी आपला संघटन मजबूत करतानाही दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेवर आपल्या पक्षाचा वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा आवाहन आहे.त्यामुळे सत्तेत असताना मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री शिंदे हे आपल्या पक्षातील मुंबई भागातील कोणत्याही एका आमदाराला मंत्रीपद देऊ शकतात,यातून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करताना दिसत आहे.अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.