Edible Oil Prices : महागाईचा निर्देशांक वाढत असताना गृहिणींना सर्वात जास्त चिंता असते ती खाद्य तेलांच्या किमतीची. मात्र सर्वसाधारण नागरिकांनी गृहिणींसाठी मकर संक्रांतिपूर्वी चिंताजनक बातमी समोर येत आहेत.समोर येत असलेल्या माहितीनुसार,मकर संक्रांतिपूर्वी खाद्य तेलाच्या दरामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.आधीच महागलेल्या खाद्यतेलांचे दरांत पुन्हा वाढ होऊन लवकरच तेलांचे नवीन दर लागू होणार आहे.
मुंबई मध्ये एपीएमसी हा खाद्य तेल आयातीचा मोठा बाजार आहे.येथे मागील काही महिन्यात सोयाबीन मूंगफली, राईस ब्रँन, सूर्यफूल आणि पाम तेलासह इतर खाद्यतेलांच्या आयाती दरम्यान किमतीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कमी दर असलेले खाद्यतेल्यांचे भाव 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढले. खाद्यतेल्यांच्या किमती औसत प्रतिकीलो लिटर 135 ते 150 रुपये झाले होते.
मागील वर्षातील सुरुवातीपासून ते आता जानेवारी 2025 पर्यंत खाद्यतेलाच्या एका लिटर मागे किमान 25 रुपये वाढीव किंमत स्थिर होती. आता याच्या किमतीमध्ये प्रति लिटर पुन्हा वाढ होणार आहे.
केंद्र सरकारच्या 20% आयात शुल्कामुळे झाली वाढ.
तीन वर्षांपूर्वी खाद्यतेलाचे भाव देशात कमी होते,मात्र या दीड वर्षात याच्या दरात वाढ होऊन सर्वसामान्य नागरिकांना खाद्यतेलाची किंमत वाढल्याने आर्थिक चटके सोसावे लागत आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात झालेली वाढ तसेच केंद्र सरकारने सोयाबीन आणि यावर आधारित उत्पादनांवर 20% आयात शुल्क लावल्याने मागील काळात खाद्यतेलांच्या दरामध्ये जवळपास 30 टक्के वाढ झाली.
मागील काही काळापासून नवी मुंबई येथील राज्यातील प्रमुख तेल बाजारपेठ असलेले एपीएमसी बाजारात खाद्यतेलांचे दर वाढल्यानंतर मागील एक वर्षापासून हे दर स्थिर आहेत.गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.वर्तमान वेळेत एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर वाढलेले आहे. सध्या प्रति एक लिटर तेला मागे 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे 2023 दरम्यान देशात आर्थिक मंदी आणि महागाईची लाट दिसत होती विदेशातून इंधन तेल आयात होत असल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्या होत्या सोबतच देशात महागाईचा दर वाढला होता.यादरम्यान काही प्रमाणात खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली होती,मात्र सर्वसामान्यांना महागाईचा जास्त फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने आपल्या आयात निर्यात धोरणामध्ये बदल केला होता.
2023 दरम्यान केंद्र सरकारने देशात विदेशातून आयात होणारे पाम तेल आणि इतर खाद्यतेल आयात करण्याचे धोरण बनविले.यात आयात शुल्क कमी करण्याच्या धोरणामुळेच भारतात नंतर खाद्यतेल किमतीमध्ये कमी झाली होती.मात्र यानंतर पुन्हा केंद्राने हे धोरण बदलल्याने सध्या खाद्यतेल महाग झाला आहे.
मागणी वाढल्याने खाद्यतेलाची आवक झाली कमी.
नुकतेच केंद्र सरकारने देशात सोयाबीनचे दर वाढविले आहे,सोबतच सोयाबीन आणि यावर आधारित उत्पादनांवर 20 टक्के आया शुल्क आकारणी सुरू केलेली आहे. याचा असर मुंबईमध्ये वाशी येथील खाद्यतेलाचे मोठे बाजार असलेले एपीएमसी बाजारात पडताना दिसत आहे. या बाजारात दरमहा 8 हजार टन खाद्य तेलाची आयात होते.
मात्र सध्या खाद्यतेलांची मागणी वाढली पण याची आवक कमी झालेली आहे,ती 20% आयात शुल्क आकारणीमुळे.याचमुळे खाद्य तेल आणि पाम तेलाचा पुरवठा कमी झाल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. सध्या खाद्य तेलाचा पुरवठा कमी होत असल्याने याचे भाव 30 टक्क्यांनी वधारले आहेत,अशी माहिती वाशी येथील एपीएमसी मधील खाद्यतेल आयातकर्ते व्यापारी देत आहेत.