आता डिजिटल रुपात Pancard लगेच e-PAN Card डाऊनलोड करा.प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आणि बँकिंग संबंधी दस्तावेज म्हणजे परमनंट अकाउंट नंबर अर्थातच पॅन कार्ड (PAN CARD) आहे.टॅक्सव्यवहारात आणि बँकिंग कामकाजात हे अत्यंत गरजेचे असते.आता पॅन कार्ड बनविणाऱ्या राष्ट्रीय प्राधिकरण एनएसडीएल (NSDL) ने याला आधुनिक युगात डिजिटल स्वरूप दिले आहे.
काय आहे e-PAN Card कार्ड?
भारतात खूप वर्षापासून पॅन कार्ड एनएसडीएल कडून बनविले जाते. पॅन कार्ड बनविण्याचे अनेक फायदे असल्याने आता प्रत्येक जणाकडे आपला स्वतःचा पर्मनंट अकाउंट नंबर अर्थातच पॅन नंबर असतो.PAN Card बनविण्यापेक्षा आता पण असलेल्या डिजिटल e-PAN अधिक सोयीचे ठरणार आहे.पॅन कार्ड आता e-PAN या डिजिटल स्वरूपात सहज मिळवता येते.
असे e-PAN Card कसे डाऊनलोड करा ? ( e-PAN Card Download Link )
विशेष म्हणजे पूर्वीपासून पॅन कार्ड हार्डकॉपीमध्ये असतो. आता e-PAN कार्ड डिजिटल स्वरूपात आल्याने याला ऑनलाइन रित्या एन एस डी एल च्या वेबसाईटवर नोंदणी करून हे डिजिटल कार्ड डाऊनलोड करणे सर्वांसाठी सुविधा जनक आणि खूपच फायद्याचे बनले आहे.
आपल्या कार्ड ला आता कुणीही डिजी लॉकर (digilocker) madhye ठेऊ शकतो. डिजिटल पॅन डाऊनलोड करण्यासाठी NSDL या सरकारी प्राधिकरणाने आता सोपी आणि सुविधाजनक प्रक्रिया युजर्ससाठी उपलब्ध करून दिली आहे.ती पूर्ण करून e PAN Card मिळणार आहे.
- e PAN Card(ई पैनकार्ड ) बनविण्यासाठी सर्वात आधी एनएसडीएल (NSDL) या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे e-PAN डाऊनलोड करण्याचा पर्याय येईल,त्यावर क्लिक करून याला निवडा.
- एन एस डी एल पोर्टलवर ऑनलाईनरित्या डिजिटल पॅन कार्ड साठी रजिस्ट्रेशन करताना आपला आधार कार्ड क्रमांक पॅन कार्ड क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागेल.
- यानंतर स्क्रीनवर एक कॅपेचा (CAPATCHE)येईल. याला योग्यरीत्या भरून दिल्यानंतर आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या अटींना संमती दिल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा.
- यावेळी आपण पॅन कार्ड साठी नोंदणी केलेल्या मोबाईल किंवा ईमेल नंबर वर एक ओटीपी (OTP)येईल यानंतर मिळालेलं ओटीपी नंबर नमूद करून पुढील प्रक्रिया सुरू होईल.
- e-PAN बनविण्यासाठी संबंधितांना फक्त 8.26 रुपये जीएसटी (Included With GST) सह इतकीच शुल्क भरावा लागणार आहे यासाठी आपल्या ऑनलाईन सोयीचा पेमेंट पर्याय निवडून शुल्क भरू शकता.
- ऑनलाइन रित्या डिजिटल पॅन कार्ड साठी भरण्यात आलेल्या पेमेंटची प्रक्रिया यशस्वी होतास तुमच्या मोबाईल स्क्रीनवर किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर प्रोसेस यशस्वी झाल्याचा व्हेरिफाय मेसेज येईल सोबतच एक ट्रांजेक्शन रेफरन्स नंबर मिळेल(व्यवहार संदर्भाचा नंबर). यानंतर e PAN कार्ड डाउनलोड होईल.
हे आहेत e-PAN Card चे फायदे.
e PAN card चा हा मुख्य फायदा आहे की जर आपला पॅन कार्ड हरवला किंवा कोणत्याही घटनेत नष्ट झाला तर त्याच नंबरचा पॅन कार्ड पुन्हा परत मिळण्याची ऑनलाईन आता उपलब्ध झाली आहे.विशेष म्हणजे पॅन कार्ड ला ऑनलाइनरित्या तसेच याचे डिजिटल रूप आले आहे. पॅन कार्ड ला डीजे लॉकरमध्ये जतन केल्यास आणखी सुविधा होते.
सोबतच पॅन कार्ड हे डिजिटल स्वरूपात असल्याने, कुणालाही आपला कार्ड नेहमीच सोबत ठेवून वावरण्याची गरज नसते.भारतात टॅक्स संबंधी व्यवहार करताना याची नितांत आवश्यकता असते.सोबतच आपली सार्वजनिक किंवा सरकारी ओळख सादर करण्यासाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
नागरिकांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तावेज असतात,त्यामुळे ऑनलाईनरित्या कधीही आपला e-PAN (ई पॅन) डाऊनलोड करत असताना आपला पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक जवळ ठेवा. त्यामुळे ऑनलाईन प्रोसेसिंग करताना ते लवकरात नमूद करता येते.सोबतच सहजरित्या आणि जलद ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी एनएसडीएल पोर्टलचा वापर करून कुणीही आपला e- PAN कार्ड मिळवू शकतो.