कोरोना काळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड योध्याच्या रूपात सेवा देण्याचे योगदान दिले – MLA. Dr. Ashok Uike
आरोग्य विभागातील आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या वीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन सुरू आहे उच्च न्यायालय चे आदेशानुसार ज्यांना 10 वर्ष सेवा झाली त्यांच्या सेवा नियमित करावे. मिळणारे मानधन मध्ये 100% वाढ करावी इतर भौतिक सोयी सुविधा नियमित कर्माचारी प्रमाणे लागू कराव्या या मागण्यांसाठी साठी आंदोलन करीत आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी रक्ताचे नातेवाईक जवळ नव्हते तेव्हा कंत्राटी असलेले आपले आरोग्य कर्मचारी सेवा देत होते. कोरोना काळात राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कर्मचारी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. जीवाची व स्वतःच्या कुटुंबीयांची पर्वा न करता प्रामाणिकपणे आरोग्य सेवा बजावली आहे. आपले मागण्या रास्त आहे आपल्या मागण्यांबाबत नक्कीच भारतीय जनता पार्टी सकारात्मक आहे.
शासन दरबारी याबाबत प्रामुख्यानं पुढाकार घेयुन मान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांचे शी संपर्क करून तुमचे प्रश्न लवकरच सोडविनार असल्याचे ग्वाही राळेगाव-कळंब-बाभूळगाव विधानसभा क्षेत्रातील MLA. Dr. Ashok Uike यांनी दिले. आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कश्या प्रकारे शासन सेवेत घेता येईल याबाबत सुद्धा चर्चा करण्यात येईल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत समान काम समान वेतन मिळाल पाहिजे.
याबाबत अधिवेशन मध्ये हा मुद्दा प्रकर्षाने मांडणार आहे असे ही मत व्यक्त केले कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्याच्या अस्तित्वासंबंधी विषय लवकरात लवकर मार्गी लावावे असे समायोजन क्रुति समिती च्या वतीने मांडण्यात आले यावेळी बाभूळगाव तालुका अध्यक्ष सतीश मानलवार,प्रहार जनशक्ती पार्टी चे बिपिन चौधरी उपस्थित होते आंदोलन स्थळी असंख्य कंत्राटी डॉक्टर ,आरोग्य सेविका यासह विविध संवर्गातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.