Drone Didi Yojana : ताई तुम्हीही Drone दीदी बना आणि 8 लाख रुपये मिळवा ! जाणून घ्या काय आहे “ड्रोन दीदी योजना”?

Drone Didi Yojana : केंद्र सरकारकडून (Central Government) द्वारे भारतातील सर्व महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध योजना आखण्यात येत आहे. सध्या केंद्र सरकारकडून महिलांना सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू आहे यात आता केंद्र सरकारने महिलांसाठी महत्त्वकांशी अशी ड्रोन दीदी योजना सुरू केलेली आहे.

यातून महिलांना पात्रता अनुसार आठ लाख रुपये सरकारकडून देण्यात येते.केंद्र सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जात आहे.तर चला जाणून घेऊया…केंद्र सरकारची “ड्रोन दीदी” योजना नेमकी काय आहे आणि यासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे.(Union Government “NAMO DRONE DIDI”Scheme)

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ग्रामीण महिलांना आधुनिक तंत्रज्ञानसोबत जोडणार.

सरकारच्या या  ‘ड्रोन दीदी’ (Drone Didi Scheme)  योजनेतून महिलांना केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक मदत तर मिळणारच आहे,मात्र विशेषकर या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडून जोड  त्यांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे.

या योजनेतून ग्रामीण भागात शेतीसाठी विविध काम मुख्यतः शेती सिंचन,फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग वाढवून सरकार महिलांना आर्थिक अनुदान देत यातून रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे आपण ही योजना नेमकी काय आहे, याविषयी जाणून घेवू…..

केंद्र सरकार आपल्या या ड्रोन दीदी योजनेमध्ये देशभरातील स्वयंसहाय्यता गटांमधील (SHG) महिलांना सहभागी करणार आहे.या योजनेतमार्फत केंद्र सरकार ग्रामीण भागातील महिलांना शेतीसाठी ड्रोन वापरण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देईल.

महिलांना कृषी क्षेत्रात आधुनिक ड्रोन प्रणालीचा प्रभावी वापर करता यावा यासाठी महिलांना प्रोत्साहन केले जाणार आहे.शेतीत कीटकनाशके आणि नॅनो-खते फवारणीसाठी देशात चलणात आलेला ड्रोन शेती मध्ये उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे Drone Didi Yojana महिलांसाठी आणि शेतीच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल.

Drone Didi Yojana : असा मिळते सरकारी अनुदान आणि आर्थिक मदत.

  • Drone Didi या योजनेत सरकार महिलांना शेती कामासाठी ड्रोन रोजगार म्हणून याच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करीत आहे.
  • केंद्र सरकार कडून महिलांना ड्रोन खरेदीसाठी 80% सबसिडी देत असून अर्जदार पात्र महिलांना यात  जास्तीत जास्त म्हणजेच 8 लाख रुपयांपर्यंत मिळविता येते.{80% Subsidy By Central Government}
  • यात सरकार महिलाना 80 टक्के अनुदान आणि उरलेली 20 टक्के शिल्लक रक्कम भरण्यासाठी महिलांना
    Central Agriculture fundamental Facilities Fund (AIF) योजनेअंतर्गत 3 % व्याजदराने कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • यात लाभार्थी महिलांना 15000/- रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाते.

Drone Didi Yojana : https://www.india.gov.in/spotlight/namo-drone-didi

योजनेत ड्रोन किटमध्ये नेमके काय मिळणार?

Droneया योजनेत सहभागी झालेल्या महिलांना आधुनिक ड्रोन यंत्रणा, चार बॅटरी, चार्जिंग हब आणि ड्रोन नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपकरणे दिली जाणार आहेत. त्यामुळे महिला शेतकरी आधुनिक शेतीचा लाभ घेऊ शकतील.{Drone Kit}

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

  • अर्जदार महिला भारतीय असावी.
  • स्वयंसहाय्यता गटाचे (SHG) सदस्यत्व आवश्यक आहे.
  • महिलांच्या नावावर स्वतःची शेती असणे आवश्यक आहे.
  • वय 18 ते 37 वर्षे दरम्यान असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज प्रक्रियेसाठी महिलांनाआधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • फोन नंबर आणि ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आणि SHG ओळखपत्र जमा करावे लागेल.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

19 − 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.