Dr Babasaheb Ambedkar रांच्या स्मारका जवळील वाईन शॉप हटवण्यासाठी आजपासून आमरण उपोषण.

Dr Babasaheb Ambedkar रांच्या स्मारका जवळील वाईन शॉप हटवण्यासाठी आजपासून आमरण उपोषण.

DHULE : Dr Babasaheb Ambedkar रांच्या स्मारका जवळील वाईन शॉप हटवण्यासाठी आजपासून आमरण उपोषण.गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज आंदोलन करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मात्र प्रशासन या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नाही म्हणून आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेले वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात तीव्र विरोध करीत आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे पक्ष संघटना आंदोलने करीत आहेत.

मात्र जिल्हा प्रशासन या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत नाही, म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वीच आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी या दुकानाची नेमप्लेट फोडून जोरदार आंदोलन केले होते. मात्र तरी देखील प्रशासनाने अद्याप पर्यंत हे वाईन शॉप हटवले नाही म्हणून आता आझाद समाज पक्ष पुन्हा आक्रमक झाला आहे.

सदरील विनोद वाईन शॉपी येत्या काही दिवसात हठवा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आझाद समाज पक्षाने दिला होता, मात्र तरी देखील त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. म्हणून आंदोलनाची पुढील दिशा म्हणून आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे हे आज पासून जोपर्यंत हे विनोद वाईन शॉप बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून हटवत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेऊ असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − ten =