Domestic Cylinder वापर करणाऱ्या आस्थापनांवर पुरवठा विभागाचे छापे.

Domestic Cylinder वापर करणाऱ्या आस्थापनांवर पुरवठा विभागाचे छापे.

Domestic Cylinder: यवतमाळ हॉटेल व्यवसाय करण्यासाठी घरगुती गॅसचा सिलिंडरचा वापर करण्यास बंदी असली तरी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. त्यातूनच जिल्हा पुरवठा विभागाने १८ पथके गठीत करून शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी शहरातील आस्थापनांची चौकशी केली. या कारवाईत २७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा अवैध वापर सर्रासपणे करण्यात येत आहे. याशिवाय गॅसवरील वाहनांमध्ये देखील घरगुती सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस भरण्याचा गंभीर प्रकार घडत आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या कराचे नुकसान होते.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात घरगुती गॅसचे चालणारे अनधिकृत नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला कामी लावले. घरगुती गॅसचा वापर होत असल्यास कारवाईचे आदेश पुरवठा निरीक्षकांना दिले होते. त्यावरून गठीत केलेल्या अठरा पथकांनी विविध भागात काही हॉटेल, रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी केली. या तपासणीत तब्बल २७ घरगुती सिलिंडर व्यावसायीक कामासाठी वापरत असल्याचे आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − five =